नवीन लेखन...

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ४ – सावरकरांची गुण ग्राहकता

सुमारे १९२७ मधील गोष्ट. श्री जोशी यांचा पेपरमिंट गोळ्यांचा कारखाना होता. ते त्या गोळ्या घेऊन सावरकरांकडे  गेले. गोळ्यांचे विविध प्रकार बघून सावरकरांना हर्ष झाला.त्यांनी विचारले ” या  पावसाळ्यात चिकट बनतात का ?”जोशी म्हणाले “ हो, कारण विदेशी पेपरमिंट मध्ये  जिलेटीन असते,ते विदेशी म्हणून आम्ही वापरत नाही.” सावरकर म्हणाले “ तुम्ही गोळ्या तर विदेशातून मागवत नाही आहात फक्त एक घटक विदेशी वापरल्याने गोळी विदेशी होत नाही तुम्ही ते जरूर वापरा असं केल्यानी तुम्ही विदेशी उद्योजकांशी स्पर्धा करू शकाल “

सावरकरांनी १९२९ साली सन्यस्तखड्ग नाटकावर पुण्याच्या श्री. वि.ना. कोठीवाले यांनी टीकात्मक लेख लिहिला तो वाचून सावरकरांनी त्यांना भेटीसाठी बोलावले. व म्हणाले “ तुम्ही माझ्या भाषेतल्या दोषावर टीका केलीत ती बरोबर आहे.पण मराठी नाटके बहरत असताना मी अंदमान येथे तुरुंगात होतो,त्यामुळे मला सद्यस्थितीतिल नाटकाची  भाषा अवगत नाही, मी मराठी नाटकेही मी पहिली नाहीत,पण नाटकाच्या नावाचे जे विवेचन केले आहे ते अगदी योग्य आहे. व लोकापुढे मांडून माझं ध्येय साध्य केले आहे.”

१९२४ला सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते. प्रसिद्ध चित्रकार श्री द. धों. रेगे त्यावेळी तेथे होते व केवळ १२ वर्षाचे होते. ते माणूस पाहून त्याचे चित्र काढीत. सावरकर फिरायला जात. रेगेनी त्यांचे तीन दिवस निरीक्षण केले, व त्याचं  चित्र काढले आणि एका दुकानात दर्शनी भागात ठेवले. सावरकरांनी ते पहिले व त्यांना बोलावले. त्यांचे कौतुक करून १० रुपये बक्षीस दिले व म्हणाले “तू मोठा चित्रकार होशील.”  रेगेंच्या आजोबांची बदली झाली आता सावरकरांची  यांची भेट होणार नाही म्हणून रडू लागले. सावरकर म्हणाले “अरे रडू नकोस, चित्रकलेत लक्ष घाल तू भारताचं नाव चित्रकला क्षेत्रात मोठे करशील”   प्रसिद्ध हिंदुत्ववादी लेखक श्री.ज.द.जोगळेकर यांनी “हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व“ पुस्तक १९५०मध्ये लिहिले व सावरकरांना भेट दिले. सावरकरांनी त्यांची पोच देताना म्हटले, ”हिंदुराष्ट्राचे मूलतत्व पुस्तकात यथार्थ वर्णन केले आहे.”

— रवींद्र वाळिंबे.

संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई.)

 

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..