नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

सत्यदृष्टांत

शब्दभावनां,मौनात आता सत्यही, अंतरीचे कोंडलेले वैखरीही, जाहली निःशब्द सुरही, संवादांचे बावरलेले बेचैनी घुसमट जीवाजीवांची नेत्री अश्रु,उदास ओघळलेले. कुणी कुणाला कसे सावरावे उराशी, हातही घट्ट बांधलेले उध्वस्त मने, बंधने वास्तवाची सर्वत्र भितीपोटी राक्षस जागले आज अस्वस्थ, बेजार स्पंदने क्षण! भेटीचेही धास्तावलेले ऋतूऋतुही, जाहले बेभरोसी आकांत, इथे साऱ्या जीवांचा वास्तव, जगती सारे अस्वस्थ चिंतेत सारेच जग अडकलेले सारीपाट […]

काव्य एक चिंतन

शब्दा सहज वेचुनी फक्त लिहावे झटपट, हवेतसे मुक्त गुंफीत जावे काव्य म्हणुनी शब्दां उधळीत जावे सत्यार्थ! जीवनाचे कुणी सांगावे. काव्याभ्यास! वाचन,चिंतन, मनन साधना आत्मचिंतनी सद्भाव असतो शुकासारखे वैराग्य,वशिष्ठापरी ज्ञान तिथे वाल्मीकी जैसा कवी जन्मतो ज्ञाना, तुका, नामा, नाथा, कबीरा समर्थ रामदासा,सांगा कोण वाचतो धर्म ग्रंथांचा सांगा अर्थ कोण जाणतो मूलमंत्र! मानवतेचा कोण जाणतो मन प्रांगण! शब्दाक्षरी […]

चैतन्यात्मा

नयनमनोहर सृष्टी वैभव निरवताच ही शांत सुंदर जीव! जिथे जातो गुंतुन ओघळतो, लोचनी ईश्वर सभोवताली रम्य परिसर साक्षी गगन सरीतासागर लोभस अलौकिक नजारा हृदयी सुखद अमृती पाझर अगम्य हा ब्रह्मांड रचियता चैतन्यात्मा चराचरी निरंतर वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ९५. २७ – ३ – २०२२.

खरेखुरे समाधान

मी, मीच एक, सारेच माझे मीच आहे म्हणुनी सारे आहे मी सर्वज्ञ,सारेच मला कळते मीच फक्त जगी प्रज्ञावंत आहे हाच अहंभाव कशाला फुका जिथे मीत्व ते सारे व्यर्थ आहे चौदा चौकडयाचेही राज्य गेले उमज मनी, तूच रे कोण आहे सोडूनी द्यावे, मनीचे हेवे दावे त्यातची खरेखुरे समाधन आहे वाचे नम्रत्वे वदुनी जगी जगावे कृतज्ञता! जगतीच श्रेष्ठ […]

उलघाल स्पंदनांची

साऱ्या प्रश्नांची, उत्तरेच निःशब्दी मौनात रुतलेल्या अव्यक्त भावनां पावित्र्य! भावनांचे बंद पापण्यात निर्माल्याचा गंध गंधाळतो स्मृतींना शांत महासागर अथांग मनांतरीचा प्रतिक्षेत दंग, व्याकुळ प्रीतभावनां झांकोळलेले सावळबाधी नभांगण अव्यक्त! अंतरिच्याच दग्ध वेदनां आता स्पंदनांची, असह्य उलघाल या सांध्यपर्वात तुलाच शोधिताना सांग कसा उमजू अर्थ जीवनाचा मी मग्न तुझ्यात तरी मला कळेना — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. […]

संस्कार

अनेक जन्मानंतर मानवी जन्म मिळतो असे म्हणतात. सृष्टितील सर्व जीवसृष्टित मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवी जन्म मानला जातो परमेश्वराने माणसाला विवेकबुद्धी, वाचा, स्मरणशक्ती, श्रद्धा, भक्तिप्रीती, वात्सल्य, जिव्हाळा, निःस्पृहता, निर्मलता, विश्वास, त्याग, कृतज्ञता, नम्रता, परोपकार, साहस अशा अनेक सुसंस्कारी संस्कारशक्ती जन्मताच प्रदान केल्या आहेत. त्याच संस्करण होण म्हणजे संस्कार!! संस्कार हे करून होत नाहीत ते घडावे लागतात […]

ब्रह्मानंदी टाळी

मी तुका चाललो पंढरीला पायी लोचनी ब्रह्म ते विठ्ठल रखुमायी।।धृ।। वेचुनिया संतांच्या सद्गुणी गुंफितो मी भावफुलांची वेणी ।।१।। रांगलो, खेळलो, धावलो पाऊली या साऱ्याच , विश्वाच्या अंगणी ।।२।। नुमजली मजला संसाराची खेळी मी अज्ञानी ऐकितो संतांची वैखरी ।।३।। लावूनी टिळा गंध अबीर कपाळी मी दंगतो भारूडी,अभंगी, कीर्तनी ।।४।। मी रचिता गाथेत जीवनाची भैरवी मजला लागते ती […]

चैत्रशुद्ध प्रतिपदा

गुढीपाड़वा, चैत्र शुध्द प्रतिपदा उत्सव हा चैतन्यदायी संकल्पाचा स्मरण, त्या शालिवाहन शकाचे उत्सव नव्या नव्या संकल्पनांचा सरो विश्वातील, सारेच अमंगळ उभारूया ध्वज, चैतन्य गुढीचा कलियुगी, अंमल जो विध्वंसक करु निर्दालन साऱ्या दुष्प्रवृत्तिंचा वरदान मांगल्यमयी श्रीरामकृपेचे मनी, जागवु शंखनाद हिंदुत्वाचा जळो, सारेच अंतरीचे ते हेवेदावे मुलमंत्र, नित्य जपुया मानवतेचा गुढी पाड़वा, चैत्र शुद्ध प्रतिपदा उत्सव हा चैतन्यदायी […]

देवत्व

देवा दाव रे, दाव रे, दाव रे देवरूप तुझे ते संचारलेले।।धृ।। संतजन सारे तुझेच उपासक असुरांचा, एकची तू संहारक अराजक, अनितीचे जीवघेणे सार दूर जे इथे नित्य माजलेले।। तूच निधर्मी, निष्पाप रे उद्गाता तूच रे बुध्द, येशू, ईश्वर अल्ला उखड, उखड रे सारेच निर्दयी धर्मांधीबीज जगती अंकुरलेले।। कर निर्दालन त्या साऱ्या दुष्टांचे वाजीव रे डमरू, सौख्यशांतीचे […]

आयुष्य

सरतेच आहे आयुष्य सारे तरी मी कोण कळले नाही धावलो, मी मृगजळापाठी कां? कसा ते कळले नाही लाभली नाती ऋणानुबंधी ओढ कधी जाणवली नाही भावनां, साऱ्याच कोरड्या मनांतर कधी भिजले नाही जगणे सारेच भोग भाळीचे मी त्यास कधी टाळले नाही जे लाभले ते निमूट भोगीले त्रागा कधीच मी केला नाही सत्संगास मी सदा भुकेलेला तो मार्ग […]

1 22 23 24 25 26 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..