नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

मुखवटा

मुखवटेच सारे रंगबिरंगी खेळ, लीलया भावनांचा भेटतात मुखवटे पांघणारे हा अनुभव या जीवनाचा। अनभिज्ञ, सारीच मनांतरे नात्यातही भाव संभ्रमाचा निकोप, निर्मलता संपली स्वार्थी, हव्यास जीवनाचा। भेटो, निरपेक्ष सत्य मुखवटे दरवळावा गंध प्रीतभावनांचा हीच सुखदा सदानंदी चिरंतन रुजावा, बीजांकुर मानवतेचा। — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 दिनांक :- १२ – ४ – २०२२

मोठ्यांचा चरण स्पर्श

आपले आई वडील आपल्याला जो आशीर्वाद देतात त्या सारख अमूल्य ह्या जगात काहीही नाही. त्यांच्या पावलांना स्पर्श करण्यात जो आनंद असतो तो कशातही नसतो. आई चे उपकार तर कधीही न विसरण्या सारखे असतात. आपला जन्म म्हणजे तिचा सुद्धा दुसरा जन्म असतो, एवढ्या मरण यातना तिला सहन कराव्या लागतात. […]

पदर नात्यांचे

चालले, चालले, चालले आयुष्य चालले, चालले सर्वात, जीव हा गुंतलेला शोधित सुखा मन दंगलेले ऋणानुबंध, हे गतजन्मांचे जपता,जपता दिवस संपले आठवांचे, आभाळ लोचनी भावनांचे ओघळ ओघळले किती स्मरावे किती उसवावे नात्यांचे पदर,आज विरलेले या मनाला किती समजवावे जग सारे मृगजळी हरवलेले दृष्टांत हा वास्तव जीवनाचा भौतिक सुखात मन रमलेले — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. ११०. […]

सत्संग

जगती, नित्य सदविवेके चालत रहा, चालत रहा मुलमंत्र, हाच जीवनाचा सत्कर्म, सदा करीत रहा।। विधिलिखित सारे जीवन प्राक्तनाच हा भोग आम्हा सुखदु:खांच्या सावलीतूनी स्वानंद,समाधान घेत रहा।। जन्मी, भाळी जे जे लाभले त्यात समाधान मानीत रहा निराशावादी कधी राहु नये मनी, आशावाद जपत रहा।। सत्संगे, पापांचे होते क्षालन उतम सहवासात, सदा रहा जीवन, खेळ कठपुतळीचा प्रभुरामाचे रामनाम […]

भाग्यरेषा

भाग्यरेषा तळहाती आज या उमलावी पैलतीर येता, साद त्या राघवाची यावी।।धृ।। घरटयात सुखाच्या, ओढ़ प्रीतीची असावी स्पर्शता निष्पाप प्रीती, वेदना उरिची हसावी कण कधी अमृताचेही, ओघळावे आसवी।।१।। जीवनी उनसावल्यांचा, खेळ नित्य चाले सागरी भरती – ओहोटी, भिजते चांदणे अंधारताच वाट त्या दिनकराची दिसावी ।।२।। थैमान वादळी छळते, कधी नीरव नीरवता शीणतो जीव क्षणी, कधी चंदनी शीतलता […]

आभाळीच्या देवराया

आभाळीच्या देवराया कां ? पेरितोस रे माया अवचित येसी, घेवूनी जासी कां ? रुजवितोस रे माया कां ? निर्मिलास रे निसर्ग उध्वस्त क्षणात सारे व्हाया निष्ठुर करिसी तू पंचभूते कुठेच न उरे आसरा जगाया. कां ? जाळलिस रे लंका कां? बुडविलिस द्वारका तूच रे निर्माता अन त्राता तूच आभाळीचा देवराया चैतन्य तुझेच रे हे सारे घाल […]

लव्हाळ्यापरी जगावे

जरी लाभली उंची महानता पाय जमिनीवरतीच असावे पुरात महावृक्ष कोलमडती लव्हाळ्यापरी, नम्र जगावे हाच सत्य, दृष्टांत निसर्गाचा मीत्व, आत्मप्रौढत्व टाळावे व्यक्त व्हावे जगती सुसंवादे सदा सर्वदा सर्वास उमजावे जो तो जगतो स्वांतसुखाय त्यास थोड़े, उल्हसित करावे जगती श्रेष्ठ आधार शब्दांचा निरपेक्षी, सकला देत रहावे कुणाचाही उपहास करु नये मनामना, नित्य जपत रहावे क्षणभंगुर असते हेच जीवन […]

अभिलाषा

माणसांच्या या गर्दीतूनी मी माणूस शोधतो आहे कधी कधी मलाच वाटते मीच, रस्ता चुकलो आहे चेहरे तसे सारे ओळखिचे पण सारेच संभ्रमात आहे मनात, सारीच साशंकता सत्य, असत्य कोणते आहे जगणे, कसरत तारेवरची वाटते सारे, मृगजळ आहे आज नां कुणावरी भरवसां बेभरोशी नित्य जगणे आहे. सभोवती दुरापास्त मानवता जग स्वसुखातची मग्न आहे नाती निरागस आज संपली […]

आंस मनांतरिची

लोचनात, माझिया तुझी ती निरागसता डोळेच तुझे बोलती तुलाच आठविताना. तुझ्याच अस्तित्वाचे भास आज जगताना सर्वत्र तुझ्याच खुणा जोजविती स्पंदनांना. दुरत्वाचेच दुःख अंतरी समजाविते आसवांना अव्यक्त भाव निरागस स्वप्नी तुलाच पाहताना तू असावेस या जीवनी साराच जन्म भोगताना ही आंस मनांतरी होती पण काय झाले कळेना वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544906 रचना क्र. १०२. ४ – ४ – […]

अभिलाषा

माणसांच्या या गर्दीतूनी मी माणूस शोधतो आहे कधी कधी मलाच वाटते मीच, रस्ता चुकलो आहे चेहरे तसे सारे ओळखिचे पण सारेच संभ्रमात आहे मनात, सारीच साशंकता सत्य,असत्य कोणते आहे जगणे, कसरत तारेवरची वाटते सारे, मृगजळ आहे आज नां कुणावरी भरवसां बेभरोशी नित्य जगणे आहे. सभोवती दुरापास्त मानवता जग स्वसुखातची मग्न आहे नाती निरागस आज संपली आपुलकीचीच […]

1 21 22 23 24 25 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..