नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

ईश्वरीय सत्ता

जीवनात जेंव्हा जेंव्हा पहुडावं विश्रांतीसाठी एकांती मिटावेत डोळे. आणि तूच दिसावीस सतत हेच घडते आहे प्रितीची ओढ अनावर ओठात दडलेले सत्य हेच मात्र खरं तू जरी आज दूरदूर तरी तुझा स्पर्शभास मनांतरी मुक्तमुग्ध भेट सारी निर्मलतेची साक्ष हीच सत्यप्रितीची ओढ अनाहत ध्यास, भास भावनांचाच कल्लोळ हेच मात्र खरं जर भाग्यात असते सत्यस्पर्शाचे वरदान ललाटी नसता दुरावा […]

स्त्री

प्राचीन ऐतिहासिक काळात देखील स्त्रिया सुशिक्षित असून सर्व शास्त्रात पारंगत होत्या. सर्वांची नावे किंवा दाखले देणे इथे अशक्य आहे. थोडक्यात आजच्या काळात स्त्रीची प्रगती अधिक सबल आणि समोर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला धैर्याने, विवेकबुद्धीने सामोरी जाण्याची जिद्द बाळगून आहे. हेच महत्वाचे आहे. […]

विश्वगाभारा

तूं स्त्री, रूप तुझेच चराचरी स्वरूप तुझेच, विश्वगाभारा सत्य! वास्तवी तूच गे ईश्वर सृष्टीतील तूंच वात्सल्यधारा।। तू जननी, तूच गे आदिमाया तुझा सन्मान, तुझेच चारित्र्य दान ईश्वरी ऐश्वर्य सुखशांतीचे तूच सात्विक, ईश्वरीय सुंदरा।। तुझ्याच गे रूपात शब्दगंगोत्री अंतरातुनी, भाव अमृती सारा भरताच अलवार या ओंजळी स्पर्षतो तृप्तलेला विंझणवारा।। भाव गंधलेले तव रूप आगळे भुलवुनी जाता तनमनांतराला […]

स्वानंद

स्वानंदे मी लिहितो गुणगुणतो आठवांच्या झुल्यावरती झुलतो नुमजे, मज कवितेचे रंगरूप स्वानंदे मी लिहितो गुणगुणतो जाणुनिया साऱ्याच संवेदनांना भावशब्दांतुनी मी व्यक्त करतो अंतरीच्या जाणिवांचेच कंगोरे अलवार भावाक्षरातूनी गुंफितो शब्दधन, भाग्य माझ्या भाळीचे प्राजक्त फुलापरी, नित्य वेचितो शब्द, शब्द सारेच स्वानुभवाचे माझ्या समाधानासाठी लिहितो त्रास नां मला, न इतरां कुणाला मी, माझ्या काव्यसुखात जगतो — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 […]

सुन्न एकांत

सजलेले घर हे सुंदर सजलेल्या चारभिंती सुन्न सारे, मनही सुन्न एकांती बोलती भिंती ।।१।। नाही, काही उणे इथे दरवळ सारा सुखांती तरी, जीव घुसमटतो शांतता पोखरते भिंती ।।२।। जीव सुखे जरी नांदतो मन, शोधिते विश्रांती व्याकुळ हा जीव सारा याचितो नित्य मन:शांती ।।३।। जगण्याची एक स्पर्धा अविश्रांत चाले जगती सौख्याचीच सारी नशा उद्विग्न आज चारभिंती ।।४।। […]

देही स्पर्श मयुरी

गंगाभागिरथी, किनारी ओलेती सांजाळ केशरी अस्ताचली बिंब लालगे गंगाजळी, चैतन्य लहरी उजळलेली तिन्हीसांजा मंद, मंद तेवते गाभारी तनमनअंतर प्रसन्न सारे गंगौघाच्या शांत किनारी. आसक्त! अधीर यामिनी गहिवरलेले प्रीतभाव उरी शीतल,झुळझुळ लाघवी मनगंगेच्या, या लाटावरी. गगनी,घननीळ सावळा देही, सारेच स्पर्श मयुरी वेद! मनी, आलिंगनाचे पुण्यप्रदी,गंगेच्या किनारी ब्रह्मस्वरूपी, राधा, मीरा लोचनी, तो श्रीरंगमुरारी द्वैत,अद्वैताचे रूप मनोहर घुमते मंजुळ […]

आत्मसुख

जननी! तूं नि:ष्पाप भोळी सर्वांची, मनांतरे राखणारी मी, अजूनही स्मरतो आहे लडिवाळ, तुझी रित न्यारी सहजी थोडेसे हसुनी अंतरी जगविण्यास जगावे निरंतरी निस्वार्थी! तुझाच अट्टाहास वात्सल्यप्रीतीची, रित न्यारी कुणी काहीही, बोलत राहो निरपेक्षी! रमुनिया संसारी मौनातुनी शोधावे आत्मसुख विलक्षणी! तुझी रित न्यारी कधीतरी जगावे मनासारखे त्यागाधिष्टता! जरी संस्कारी अस्मितेला! निक्षूनीच जपावे जग! सारेच हे नाना विकारी […]

वास्तव

वास्तव! हे प्रतिबिंब अंतरीचे तेही तरळते तुझ्याच लोचनी तरीही कां? हे रुसणे फुगणे नको त्रागा उगा, घे समजुनी पाहिले किती? उनपावसाळे सत्यता! ती जाण नां जीवनी ओल्या मातीत, जिरते पाणी प्रीत! रुजते कोवळ्याच मनी हिरव्या प्रीतवेली फुलती फुले सुगंधा! तीच दरवळते जीवनी मनी, ही सारी साक्षात प्रचिती आत्म्यास! मन:शांती जीवनी –वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ६७ १ […]

सोबत प्रारब्धाची

भोग प्रारब्धाचे सदा सोबती त्याचीच, सारी सत्ता आहे सुखद, दुःखद, वेदनांचा दाता, त्राता स्वामीच आहे नि:शब्दी, सारेच भोगावे तेव्हडे आपुल्या हाती आहे कधी सुखाचा माहोल सारा कधी दुःखाची साऊली आहे कधी, क्षण असह्य वेदनांचे मनांतरासी, छळणारे आहे उमजुनीया, सदा सावरावे हेच खरे मानवी जीवन आहे सदा,शरण जावे दयाघनाला तोच, केवळ तारणारा आहे वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. […]

मायमाऊली मराठी

माऊली मराठीच माझी मायबोली ज्ञानयोगीयांची कनवाळू माऊली ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या मराठी माझी मायबोली ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर माऊलीची गाथा, जगतगुरू तुकाई माऊली भाषाबोध सकल संतसद्गुरूंचा माऊली मराठीच माझी मायबोली शब्द मराठीच अस्मिता अंतरीची गीता, भागवत, दासबोधादी ग्रंथाली अक्षर अक्षर, साक्षात्कार स्वयंभू माऊली मराठीच माझी मायबोली माझ्या मराठीचा मला स्वाभिमान जगतवंद्य! ती जगतवंद्य मानिली प्राणांहूनही […]

1 24 25 26 27 28 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..