नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

सोनेरी राजपुत्रास पत्र…

प्रिय सोनेरी राजपुत्रा…. तू काल पहाटे अचानक मनुष्यवस्तीत आलास आणि हकनाक स्वतःचा जीव गमावून बसलास… आम्हाला शहरामध्ये असा वन्यप्राणी आल्याचं खपत नाही, हे कदाचित तुझ्या गावीही नसावं… आम्ही सुट्टीच्या दिवसात बंद गाडीतून अभयारण्यात तुम्हा मंडळींना पहायला येतो, तेव्हा आम्ही आमच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत असतो… इथे तर तू आपल्या सवंगड्यांना सोडून चुकून रानटी मनुष्यवस्तीत एकटाच आलास…. […]

‘रेशमी’ गोणपाट…

तिच्या डोळ्यासमोर लहानपणापासूनची क्षणचित्रे एकापाठोपाठ एक येऊ लागतात. आंध्रमधील एका गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. रामल्लू व सरसम्माच्या पोटी नको असताना जन्माला आलेलं हे अपत्य. घरच्या गरीबीनं तिला चौथीच्या पुढे शिक्षण घेऊ दिलं नाही. शाळा सुटली. ती आईला घरकामात मदत करु लागली. […]

चिरयौवना..

समोरचा माणूस गप्प असताना त्याच्याबद्दल काहीच कळत नाही, तो बोलू लागला की, ‘कळू’ लागतो ते त्याच्या बोलण्यातून. सवयीनुसार प्रत्येकाचे बोलणे बदलत जाते. काहींना शिवीचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही. त्याउलट संस्कारी माणूस कितीही चिडला तरी अपशब्द बोलूच शकत नाही, त्याऐवजी तो गप्प राहणेच पसंत करतो. […]

अनमोल ‘रतन’

पूर्वी घरटी दिसणारी, कुठेही पटकन जाण्यासाठी उपयोगी पडणारी, दुरुस्तीचा वारंवार खर्च न काढणारी सायकल कुटुंबाची एक भागीदार असायची. रविवारी प्रत्येकजण तिला धुवून साफसफाई करायचा. दसऱ्याला तिला फुलांची माळ लावली जायची. सायकल चालवताना कोणी समोर आलं की, हॅण्डलवरची घंटी वाजवताना आनंद व्हायचा. जुन्या फिलीप्स, अॅटलास, हिरो कंपनीच्या सायकली आता इतिहासजमा झालेल्या आहेत. […]

‘दलाल पर्व’

गोव्यामधील मडगाव हे छोटंसं निसर्गसुंदर गाव. गावातील एकमेव शाळेतील पाचवीचा वर्ग. वर्गावरचे मास्तर रजेवर असल्याने मुख्याध्यापक वर्गात आले. त्यांनी मुलांच्या मनोरंजनासाठी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. पहिल्या बाकावरील एक मुलगा गोष्ट ऐकता ऐकता मुख्याध्यापकांचे पेन्सिलीने वहीमध्ये चित्र रेखाटत होता. […]

चल चला चल…

चाळीशीनंतर पायांची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पायाचे स्नायू भक्कम असतील तर ते दीर्घायुष्याचं लक्षण आहे. जर दोनच आठवडे तुम्ही पायांची हालचाल नाही केली तर तुमच्या पायांची मजबूती दहा वर्षांनी कमी होते. […]

आठवणीतले अण्णा..

जेव्हा नाटक चित्रपटांची डिझाईन करु लागलो तेव्हा अण्णांचे फोटो काढून डिझाईन करण्याची संधी मिळाली. भक्ती बर्वेच्या ‘डबल गेम’ नाटकाची डिझाईन करीत होतो. तेव्हा सर्व कलाकारांचे फोटो काढून अनेक डिझाईन्स केली. तेव्हा अण्णांशी खूप जवळून संपर्क आला. नाटक तुफान गाजले. दरवेळी मी नाटक पहात होतो, अण्णांच्या संवादफेकीत मला कधी सुईचाही फरक जाणवला नाही, त्यांचं टायमिंग आणि बेअरिंग हे प्रत्येकवेळी अचूकच असायचं. […]

अभ्यासिका

साठ वर्षांपूर्वी खेड्यात वीज पोहोचलेली नव्हती. त्यावेळी मुलांना दिवसा झाडाखाली तर रात्री घरात कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागायचा. असा अभ्यास करुन शाळेमध्येच नव्हे तर तालुक्यात पहिल्या क्रमांकाने पास होऊन जीवनात यशस्वी झालेले प्राचार्य वसंत वाघ (फर्ग्युसन काॅलेज) सरांसारखी माणसं आजही आपल्यात आहेत. […]

एक ‘राजा’ प्रजेचा…

दादासाहेब फाळकेंचा पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ हा १९१३ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक मूकपटांची निर्मिती झाली. तेव्हा मूकपट पडद्यावर चालू असताना तबला पेटी वाजवून काहीजण संगीताची साथ देत असत. अशाच एका थिएटरमध्ये संगीत साथ देणारे एकाच ठिकाणी बसून कंटाळले की, त्यांना पाय मोकळे करण्यासाठी संधी देऊन स्वतः पेटी वाजवणारा एक तरुण होता. तो गंमत म्हणून हे […]

लेट व्हॅलेंटाईन

परवा माझा मोबाईल बंद पडला होता, त्यामुळे दोन दिवस मी त्याला हातही लावला नाही. आज दुरुस्त केल्यानंतर पाहिलं तर व्हाॅटसअपवर धाड धाड मेसेजेस पडत राहिले. त्यातील मी मुंबईला नोकरीला असणाऱ्या माझ्या एकुलत्या एक मुलाचा व्हाॅटसअप उघडला, तर त्याने लांबलचक पाठवलेला मेसेज दिसला. मी माझा चष्मा नाकावर चढवला व वाचू लागलो… ‘प्रिय बाबा, आज आम्ही दोघेही बाहेर […]

1 4 5 6 7 8 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..