नवीन लेखन...
सुभाष नाईक
About सुभाष नाईक
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

पंढरीचा राणा – ५ : अविरत भक्त करत वारी

अविरत भक्त करत वारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् अथक जन ज़ात विठूदारीं, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।। ऊन नि पाउस यांची नाहीं एकाला पर्वा ध्यास एकची लागे सर्वां – तो विठ्ठल बरवा भारले सारे वारकरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।। कठिण शेकडो मैल तुडवती मराठदेशातले अखंड नाचत भक्त शेकडो, कुणिही नच दमले देइ चैतन्य मनां पंढरी, […]

पंढरीचा राणा – ४ : चला रे जाऊं पंढरिला

ज्ञानदेव : चला रे जाऊं पंढरिला तिथें कधीचा अपुल्याकरितां श्रीहरि खोळंबला ।। ज्ञाना ज़रि हठयोगी आहे परी हृदय श्रीहरीस पाहे योगेश्वर आनंदसिंधु तो, हें ठावें मज़ला ।। कुणी तया म्हणती श्रीरंग कुणि विठ्ठल, कुणि पांडूरंग स्वयम् द्वारकानाथ आपुल्या पंढरीस आला ।। मुगुट विराजे तोच शिरावर मंद-हास्यही तेंच मुखावर तीच रुळे वक्षावर मोहक वैजयंतिमाला ।। पुंडलिकाचें निमित्त […]

हा दुरावा साहवेना (स्मृतिकाव्य)

हा दुरावा साहवेना, संपवी क्षणभर स्वयें एकदा स्वप्नांत तरि ये, एकदा तरि ज़वळ ये ।। कां अशी गेलीस सखये प्रेमबंधन तोडुनी ? कां अशी गेलीस सखये एकला मज सोडुनी ? सात-जन्मीं-साथिचें तें वचन मजला आठवे ।। काय झालें सांग, मजवर एकदम रुसलिस अशी काय आलें सांग, जगतां त्यागुनी गेलिस कशी ? जन्मभरचे पाश तुटणें , चांगलें […]

पंढरीचा राणा – ३ : निघे दिंडी पंढरपुरला

भेटायाला भीमातीरीं उभ्या विठ्ठलाला निघे दिंडी पंढरपुरला ।। ज्ञानदेव, मुक्ता, निवृत्ती नामदेव, सोपान संगती सवें तयांच्या, जनी सावता अन् चोखामेळा ।। भान हरपुनी वारी नाचे नाम मुखीं पांडूरंगाचें टाळमृदुंगांसंगें वाजत एकतारि-चिपळ्या ।। नेत्रांपुढती रूप मनोहर उभें कटीवर ठेवुनिया कर गळ्यात खुलते हंलती-डुलती तुलसीची माला ।। जीवन झालें पांडुरंगमय नुरलें माया-मोह नि भव-भय भक्तीतुन मुक्तीप्राप्तीचा पथ हा […]

पंढरीचा राणा – २ – ‘पांडुरंग पांडुरंग’ ध्वनि निनादला

‘पांडुरंग पांडुरंगऽ’ ध्वनि निनादला नामपावसात मेळा चिंब जाहला ।। ‘पांडुरंग’, तुणतुणें भजनात गुणगुणे ‘पांडुरंग’, झांज आणिक टाळ खणखणे ‘पांडुरंग’-तालावरती वाजत चिपळ्या ।। ‘पांडुरंग पांडुरंगऽ’ गाइ एकतारी ‘पांडुरंग’, ढोलकीची कडकडे तयारी ‘पांडुरंग’, दुमदुमता-मृदंग बोलला ।। ‘पांडुरंग पांडुरंगऽ’, पाय थिरकती टाळ्यांतुन शतहातांची वाढते गती धुंदित भगवा पताका-संच डोलला ।। ‘पांडुरंग पांड़ुरंगऽ’, घोष भूवरी ‘पांडुरंग पांडुरंगऽ’, मेघ अंबरीं ‘पांडुरंगगान’ […]

टिप्पणी – ४ : सासरीं स्वीकृत सून ?

संदर्भ : एक टी.व्ही. सीरियल एका प्रसिद्ध टी.व्ही. चॅनलवरील एक सीरियल.( नांवाची ज़रूर आहे कां ?). एका बाजूला कर्मकांडावर विश्वास नसलेलें नास्तिक मुलीकडचें कुटुंब ; आणि दुसर्‍या बाजूला कर्मकांडावर, पत्रिकेवर, संपूर्णपणें श्रद्धा असलेलें मुलाकडचें कुटुंब. हें सीरियलच काय , अशी अन्य अनेक सीरियल्स आहेत, जी अंधश्रद्धा, पुराणमतवादीपणा, जुनाट कालबाह्य परंपरा, अशा अनेक गोष्टी दाखवत असतात, जस्टिफायसुद्धा […]

पंढरीचा राणा – १ : चालली वारी पंढरिला

नामगजर दुमदुमतो, नाचे भक्तांचा मेळा चालली वारी पंढरिला ।। लहानथोर इथें ना कोणी लीन सर्व पांडुरंगचरणीं जगता विसरुन , ज़ात भक्तजन विठ्ठलभेटीला ।। करि बेभान भजन प्रत्येका देहीं उत्कट विठ्ठलठेका कंठाकंठातील घोष शतगुणित करी ताला ।। मुदित मनांचा अलोट साठा हर्षाच्या लाटांवर लाटा अंत नसे आनंदमग्न-हरिभक्तसागराला ।। वाज़त चिपळ्या, डुलत पताका नाचत दिंड्या, तृण, तरुशाखा भंवती […]

तुझ्याविणा (स्मृतिकाव्य)

जीवन हें वैराण तुझ्याविणा ; जीवन एक स्मशान तुझ्याविणा. निरर्थ आयुष्यच तुझ्याविणा ; अश्रूंचा खच फारच तुझ्याविणा. आयुष्यप्रवाह सुके तुझ्याविणा ; हें जग वाटे परकें तुझ्याविणा. मनिं दु:ख नित्य ताजें तुझ्याविणा श्वासांचेंही ओझें तुझ्याविणा. मी थकलो चालुन फार तुझ्याविणा ; साहवे न जीवनभार तुझ्याविणा. चालतां, रात्र आली तुझ्याविणा ; एकटा, पडे खाली तुझ्याविणा. – – – […]

शब्द-अक्षर-भाषा : (१) : फुलपाखरू : संस्कृत व इतर भाषांमधील शब्द

मे ११, २०१६ च्या लोकसत्ता मुंबई आवृत्तीमध्ये ‘संस्कृतीसंवाद’ या सदरात प्रा. शेषराव मोरे यांचा , ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाचा विचारप्रवर्तक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावरील एक प्रतिक्रिया श्री. किशोर मांदळे यांची आहे . ( टीप : मोरे यांच्या लेखातील मुद्द्यांचा व त्यावरच्या विविध प्रतिक्रियांमधील मुद्दयांचा परामर्श मी एका वेगळ्या दीर्घ लेखात केलेला आहे. ज्यांना […]

टिप्पणी – (३) : ‘गधेगाळ’वरील प्रतिमा : ( नरेंच केली हीन किति नारी !!)

बातमी : (शीर्षक ) : बदलापुरात शिलाहारकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा – लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. २९ जून २०१६. ‘लोकसत्ता’मधील बातमी सांगते की बदलापुरनजीक शिरगांव येथें शिलाहारकालीन, ‘गधेगाळ’, ‘वीरगळ’ इत्यादी प्रकारची शिळाशिल्पें सापडली आहेत. शिलाहार हे राष्ट्रकूटांचे अंकित होते, व त्यांचे कोंकण, दक्षिण महाराष्ट्र भागात राज्य होते. बदलापुरनजीकाचा भाग ‘उत्तर कोंकणा’वर राज्य करणार्‍या शिलाहार-शाखेकडे होता. हा काळ होता […]

1 24 25 26 27 28 30
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..