नवीन लेखन...

स्त्री मुक्ती आभास की आव्हान

जिच्या पासून एक ‘विश्व’ तयार झाले अशी स्त्री ही अनंत काळाची माता आहे. दैत्यांचा संहार करणारी देवता तिचा आपण सन्मान करतो. माणूस म्हणून स्त्री-पुरुष दोन्हीही सारखेच महत्त्वाचे आहेत. दोघांमध्ये अनेक गुण समान असतात मग असे असताना स्त्री ही पुरुषांइतकी समाजात किंवा कुटूंबात मुक्त आहे काय? माझ्या विचारांती मी प्रथम भारतीय स्त्री मुक्ती आभास की आव्हान या विचार प्रवाहात डोकावणार आहे. […]

ग्लोबलायझेशन आणि वृद्धाश्रम

प्रचंड उलथापालथीतून पृथ्वी निर्माण झाली. पुढे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. अप्रगत आदिमानवाचे रुपांतर आज आधुनिक महामानवात झाले. देश, सत्ता, भूखंड इतकेच काय तर ग्रह, ताऱ्यांवरही अभ्यासपूर्ण बोलले जाऊ लागले. आपला देश, आपले राष्ट्र याविषयीचा जाज्वल्य अभिमान जोपासला जाऊ लागला… […]

स्वच्छता

स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. […]

अंतराळातील अश्वत्थामा

मी आणि अय्यर जिवश्‍चकंठश्‍च मित्र होतो. आता होतो असंच म्हणायला हवं. कारण अय्यर आता हयात नाही. नाही तरी कसं म्हणावं? कदाचित असूही शकेल. असला तरी देखील तो मला आणिमी त्याला या पृथ्वीतलावर भेटू शकणार नाही हे मात्र निश्‍चित. […]

झापगावचा प्राचीन भूपतगड

…सन १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ठाणे जिल्ह्याचा नकाशा संकोचला.
दमणगंगेच्या ऐलपैल तीराजवळील संजाण, उंबरगाव आदी २७ गावे गुजरात राज्याला जोडली गेली, तरीही आजघडीला ठाणे जिल्ह्यात ५५ गडकिल्ले अवशेष रूपाने आपणास पाहता येतात. […]

मराठीतील भाषांतरे-रूपांतरे आणि दुर्गा भागवत

दुर्गा भागवतांच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र लोकसाहित्याचे. मराठीत भाषांतरित झालेल्या लोकसाहित्याबद्दल दुर्गाबाईंच्या खूप तक्रारी होत्या. मराठीत उत्तम अनुवादकांची वाण तेंव्हाही होतीच. भाषांतरावरून भाषांतरे करणे, संक्षिप्त रुपांतरे करणे, रूपांतर करताना मूळ नावे, स्थळे, घटना इत्यादी बदलून टाकण्याची भ्रष्ट प्रथा महाराष्ट्रात पडली त्याविषयी दुर्गाबाई नाखूष होत्या. या नाखुषीतून त्यांनी आगरकरांच्या हॅम्लेटलाही सोडले नाही. […]

लता थोरली

माई सांगत असे की, जेव्हा मी दोन-तीन महिन्यांची होते तेव्हा ही थोरली मला घेऊन खूप धावपळ करी. मी तिला खूप आवडे. माझे मोठे मोठे फुगलेले गाल आणि त्यावर पडणाऱ्या खळय़ा तिला खूप आवडत. माझ्या गालावरची खळी तिची कळी खुलवीत असे. […]

किचनची दिशा

पूर्वी स्वयंपाकघर केवळ जेवण बनविण्यासाठी वापरलं जाई. धुणी-भांडी, धान्य साठवण, पाण्याची भांडी या सर्वासाठी स्वतंत्र जागा असे. त्यामुळे आग्रेयला अग्नी अर्थात स्वयंपाकस्थान असावं, त्यातूनच आग्नेय दिशेला किचन असावं, असा समज दृढ झाला. […]

कर्मयोगी कीटक

मधमाश्या या आपल्या मित्र आहेत, हे आपल्याला ज्या दिवशी कळेल, त्या दिवशी आपले पुष्कळ हित होईल. सध्या त्यांना शत्रू समजून आपण आपले नुकसान करून घेत आहोत….. […]

1 2 3 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..