गोमंतकीय कोकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित
पंडितांच्या बहुतेक कविता मुक्तच्छंदात्मक आहेत. गावड्यांच्या कोकणीत लिहिलेल्या त्यांच्या काही कवितांत जोष-जोम आहे. गरीबदुबळ्यांवर होणाऱ्या अन्यायाला ते आपल्या काव्यातून वाचा फोडतात, गोमंतकाचे सृष्टिसौंदर्य मोठ्या कौशल्याने वर्णितात, तर कधीकधी हळुवारपणे आपल्या प्रेमकाव्यातून विरहाची व्यथाही व्यक्त करतात. संपन्न शब्दभांडार, सहजसुंदर व परिणामकारक शैली, प्रतिमांचा मनोहर विलास, विचारांची घार व भावनेची उत्कटता यांमुळे त्यांच्या काव्याला एक आगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. […]
