भारताचे माजी तेज गोलंदाज रमाकांत देसाई उर्फ ‘टायनी’ देसाई
रमाकांत देसाई हलकाच रनअप घेऊन क्रीझपाशी आल्यावर आपली करामत दाखवत असत. हनीफ मोहम्मद यांच्यासारख्या नावाजलेल्या फलंदाजाला एकाच मालिकेत देसाईंनी चार वेळा तंबूत धाडले होते. १९६०-६१च्या त्या मालिकेत पाकिस्तानच्या गोटात देसाईंनी खळबळ उडविली होती. एवढेच नव्हे तर हनीफ यांना ‘देसाईंचा बकरा’ म्हणून हिणवले जाऊ लागले. […]
