नवीन लेखन...

ज्येष्ठ रंगकर्मी व नकलाकार राजाभाऊ चिटणीस

ज्येष्ठ रंगकर्मी व नकलाकार राजाभाऊ चिटणीस यांचा जन्म २७ एप्रिल १९४१  रोजी परतवाडा या गावी झाला.

असे म्हणतात की माणसाचं वय कितीही वाढलं तरी काही लोक म्हातारे होत नसतात. त्याचे एक उदाहरण म्हणजे नागपुरातील सुपरिचित नकलाकार राजाभाऊ चिटणीस.

आपले दुःख मनाच्या कप्प्यात बंद करून गेली कित्येक वर्षे लोकांना खदखदून हसवणारे कलाकार म्हणजेच नकलेचा राजा हीच त्यांची ओळख.

आई वडिलांनी त्यांचे नाव गोपाळ असे ठेवले.आपली आई नलिनी चिटणीस यांच्याकडून त्यांना कलेचे बाळकडू मिळाले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे अगदी लहानपणीच त्यांना अंगीभूत असलेली कला दिसू लागली. लहानपणी शाळेतून घरी आल्यावर घरच्यांना व मित्र परिवाराला शाळेतल्या खरडे गुरुजींची नक्कल करून दाखवायचे. एकदा कुणीतरी त्या गुरुजींना, ‘गोपाळ तुमची नक्कल करतो’, असे सांगितले. गुरुजींनी गोपाळला त्यांची नक्कल त्यांच्यासमोर करायला लावली. न घाबरता गोपाळने ती नक्कल करून दाखवली आणि गुरुजींची वाहवा मिळवली. अगदी त्या दिवसापासून ते आजतोवर न घाबरता ते नक्कल ही कला जपत आहेत आणि सर्वांची वाहवा मिळवत आहेत. गमतीत आजोबा नेहमी म्हणतात, मी नक्कल करत दहावी पास झालो. पण त्यापाठी ते हेदेखील म्हणतात ही नक्कल करायलाही अक्कल लागते. आजोबा केंद्रीय श्रमिक शिक्षण बोर्ड येथून निवृत्ती घेतली. प्रमुख दृक्-श्राव्य विभागात काम करत असतानाच त्यांनी वेगवेगळ्या औद्योगिक कंपनीतील व कामगारांना संघटित होण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचे हे काम नागपूर शहरापुरते सीमित न राहता त्यांनी विदर्भातील अनेक शहरांत कामगारांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिलेत. याचबरोबर व्यसनमुक्ती केंद्रामधून त्यांनी कितीतरी तरुण व्यक्तींना व्यसनाच्या आहारी न जाऊ देता स्वतःच्या कुटुंबावर स्वतःवर व निर्व्यसनी आयुष्यावर प्रेम करायला शिकवले.

त्यांना संस्कार भारतीतर्फे कला साधक सन्मान पुरस्कार, राम गणेश गडकरी स्मृती शताब्दी महोत्सवात जीवन गौरव पुरस्कार मिळाला. नागपूर महानगरपालिकेतर्फे त्यांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. समाजप्रबोधनाचे कार्य करत असतानाच कलेवरील त्यांचे प्रेम कायम होते. ‘हलाहल’, ‘माणुसकी’ यांसारख्या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण नागपुरात घडवून नागपुरातील कलाकारांना त्यात संधी मिळावी म्हणून ते नेहमीच कार्यरत होते.

त्यांच्या पत्नी राजश्री चिटणीस यांनी त्यांच्या कलेच्या प्रवासात साथ दिली. त्या देखील राजाभाऊ चिटणीस यांच्या सोबत स्टेजवर उभ्या असत. नकला या कलेतील राजाभाऊ यांना लाभलेले गुरू म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दादा कोठीवान होत. गणेशोत्सव, दुर्गा, शारदा अशा प्रसंगांना राजाभाऊ यांनी आपल्या नकलांचे विदर्भ भर अगणित कार्यक्रम केलेत. त्यांची ‘सोवळ्यातील आजीबाई, ‘पहिली गं भुलाबाई’, ‘आंधळा भिकारी’ या नकला अजूनही त्यांच्या चाहत्यांना स्मरणात आहेत.

माणुसकी, हलाहल, तिखट मिरची घाटावरची, हिंदी चित्रपट ‘कानून का शिकार’ या चित्रपटातून राजाभाऊ मोठ्या पडद्यावरही झळकले. त्यांचे चिरंजीव राजेश चिटणीस व त्यांची नात राजसी राजेश चिटणीस यांना देखील आजोबांच्या कलेचे बाळकडू मिळाले आहे.

राजेश चिटणीस अभिनेते म्हणून नाटक, सिरीयल आणि चित्रपट याद्वारे नागपूर आणि महाराष्ट्राला सुपरिचित आहेच.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..