पितृदिन
पितृछत्र हे आकाशासारखे, समुद्रासारखे विशाल, अथांग आहे. साऱ्यांना सामावून घेण्याची ताकद त्यात सामावलेली आहे. लाडात वाढलेली लेक, दुसऱ्याच्या हातात सोपवताना ‘माझ्या काळजाच्या तुकड्याला सुखी ठेवा!’ बाप अतिवेदनेने न बोलताच डोळ्यांनी बोलून जातो. आईसारखे घाय मोकलून रडण्याचे स्वातंत्र्यही त्याला नाही. कारण, सर्वांचं सांत्वन त्यालाच करायचं असतं. […]
