दिग्दर्शक जब्बार पटेल
गो. नि. दांडेकरांच्या ‘जैत रे जैत’ या कादंबरीवरून काढलेला त्याच नावाचा चित्रपट म्हणजे चित्रपटातली सांगितिक वाटली. १९७९ सालचा ‘सिंहासन’ हा अरुण साधूंच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांवरून काढलेला राजकीय विषयावरचा पहिला मराठी चित्रपट होता. राजकारणातल्या सशक्तांमधले सत्तेसाठी होणारे आपापसातले छुपे व उघड संघर्ष त्याचप्रमाणे त्यांनी अशक्तांचा टूल म्हणून केलेल्या खेळी हा सर्व भाग त्यात अतिशय समर्थपणे दाखवला होता. […]
