नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक गजानन जागीरदार

“स्वामी” या दूरदर्शन मालिकेचं जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते तसंच दादासाहेब फाळके यांचे कर्तृत्व रेखाटणारा चित्रपट “ड्रीम्स स्केस विंग्ज”चे गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते. […]

ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी

शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, एकशून्य बाजीराव, करायला गेलो एक, मी जिकलो मी हरलो, वतुर्ळाचे दुसरे टोक, माता द्रौपदी, द्वंबद्विपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी ह्या नाटकात जयवंत नाडकर्णी यांनी प्रमूख भूमिका केल्या होत्या. […]

दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार भालचंद्र पेंढारकर

मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी हैद्राबाद (दक्षिण) येथे झाला. भालचंद्र पेंढारकर यांचे संगीतातील गुरू रामकृष्णबुवा वझे, भालचंद्र पेंढारकर यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२ साली सत्तेचे गुलाम या नाटकात भूमिका करून केले. नाट्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, ध्वनी-प्रकाश व्यवस्था, अभिनेते, गायक, संगीतकार अशा कितीतरी भूमिका भालचंद्र पेंढारकर यांनी गाजवल्या होत्या. […]

संपादक विनायक सदाशिव वाळिंबे

विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. विनायक सदाशिव वाळिंबे उर्फ वि. स. वाळिंबे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहेत ते विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक आणि मुख्य म्हणजे म्हणजे ‘पुलं’च्या शब्दांत सांगायचं झालं तर अत्यंत ‘वाचनीय लेखक’ म्हणून! या दोनच शब्दांत ‘पुलं’नी त्यांच्या सर्व लेखनाचं सार सांगितलंय. उमेदवारीचा काळ ‘अग्रणी’ दैनिकात, ‘रोहिणी’ […]

ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर

क्रीडा क्षेत्रातील दिग्गज पत्रकार व मराठीतील ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे झाला. वि. वि.करमरकर यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक मानले जाते. खेळासाठी झोकून काम करणाऱ्या पत्रकार करमरकरांनी क्रीडा कार्यकर्त्यांची भूमिकाही बजावली. जे मनात घेतले तसे व्हायलाच हवे, हा हट्ट त्यांनी कायम धरला. वागण्यात कोणतीही लवचीकता न ठेवता ते […]

प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा इरावती कर्वे

प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा इरावती कर्वे यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या स्नुषा व फर्ग्युसनचे माची प्राचार्य दि. धों. कर्वे ह्यांच्या पत्नी होत. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात म्यिंजान येथे झाला. त्यांचे वडील त्यावेळी तेथे अभियंत्याचे काम करीत होते. इरावती कर्वे यांचे यांचे शिक्षण पुण्यातील […]

बाल लेखीका इनिड ब्लायटन

इनिड ब्लायटन ही बच्चेकंपनीला आवडणाऱ्या सुरस साहसकथांची लेखिका. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १८९७ रोजी डलीचमध्ये झाला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने लहानपणापासूनच मासिकांमधून लिहायला सुरुवात केली होती. स्वतंत्र बाण्याच्या साहसी मुलामुलींच्या कथा, शाळा आणि बोर्डिंग हाउसमधले मुलांचे धमाल अनुभव आणि फँटसी जगतातल्या कथा हे तिचे आवडते विषय होते. तिने ८००हून अधिक पुस्तकं लिहिली आणि ती जगभर ९० भाषांमध्ये भाषांतरित […]

प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे ओमप्रकाश

प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे ओमप्रकाश यांचा जन्म २४ जानेवारी १९२७ रोजी सियालकोट पंजाब येथे झाला. १९७४ मध्ये ‘आप की कसम’ हा जे ओमप्रकाश यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. आखिर क्यूँ आणि आप की कसम हे त्यांचे गाजलेले सिनेमे. अफसाना दिलवालों का, आदमी खिलौना है, आदमी और अफसाना, भगवान दादा, अपर्ण, आस पास, आशा असे अनेक चित्रपट […]

मराठमोळे चित्रकार वासुदेव गायतोंडे

वासुदेव गायतोंडे हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले अमूर्ततावादी चित्रकार होते. अमूर्त घटनांना दृश्यरुप देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९२४ रोजी नागपूर येथे झाला. झेन फिलॉसॉफी आणि आध्यात्मिक शिकवणुकीने प्रेरित झालेले ख्यातकिर्त, मराठमोळे भारतीय वासुदेव गायतोंडे यांचा गोव्यातील एका खेडेगावात जन्म झाला. त्यांचे घरातील टोपणनाव ‘बाळ’ होते आणि मित्रांमध्ये ‘गाय’ ह्या नावाने ते प्रसिद्ध होते. म्हापसा […]

1 169 170 171 172 173 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..