नवीन लेखन...

बाल लेखीका इनिड ब्लायटन

इनिड ब्लायटन ही बच्चेकंपनीला आवडणाऱ्या सुरस साहसकथांची लेखिका. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १८९७ रोजी डलीचमध्ये झाला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने लहानपणापासूनच मासिकांमधून लिहायला सुरुवात केली होती. स्वतंत्र बाण्याच्या साहसी मुलामुलींच्या कथा, शाळा आणि बोर्डिंग हाउसमधले मुलांचे धमाल अनुभव आणि फँटसी जगतातल्या कथा हे तिचे आवडते विषय होते.

तिने ८००हून अधिक पुस्तकं लिहिली आणि ती जगभर ९० भाषांमध्ये भाषांतरित झाली. तिची पुस्तकं कायमच ‘बेस्टसेलर्स’ यादीत असत आणि त्यांचा एकत्रित खप ६० कोटींच्या घरात जातो.

लिटल नॉडी (२४ पुस्तकं), दी अॅडव्हेंचरस फोर (दोन पुस्तकं), फेमस फाइव्ह (२१ पुस्तकं), सिक्स कझिन्स (दोन पुस्तकं), सिक्रेट सेव्हन (१५ पुस्तकं), बार्नी मिस्टरीज (सहा पुस्तकं), दी विशिंग चेअर कलेक्शन (तीन पुस्तकं), दी मॅजिक फारअवे ट्री, दी आयलंड ऑफ अॅडव्हेंचर, सिक्रेट सीरिज (पाच पुस्तकं), नॉटिएस्ट गर्ल (तीन पुस्तकं), फाइव्ह फाइंडआउटर्स अँड डॉग मिस्टरी सीरिज (१५ पुस्तकं), सेंट क्लेअर्स (सहा पुस्तकं), मिस्टर गॅलिआनोज सर्कस (तीन पुस्तकं) आणि मॅलरी टॉवर्स (सहा पुस्तकं) अशी तिची पुस्तकं प्रमुख व्यक्तिरेखांवर आधारित आहेत आणि याशिवाय इतरही पुष्कळच! इनिड ब्लायटन यांचे २८ नोव्हेंबर १९६८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..