नवीन लेखन...

बलविंदर सिंग संधू

बलविंदर सिंग संधू यांचा जन्म 3 ऑगस्ट 1956 रोजी मुंबईमध्ये झाला. ते मुंबईकडून क्रिकेट खेळले तसेच भारतीय संघातून देखील खेळले. त्याच्या क्रिकेट करिअरची सुरवात तशी उशीराच झाली. त्यांना फर्स्ट क्लास क्रिकेटपटू येशवंत ‘बाबा’ सिधये यांनी नेट मध्ये खेळताना पाहिले . त्यानंतर पुढल्याच वर्षी ते सुप्रसिद्ध कोच रमाकांत आचरेकर सरांकडे कोचिंगला जाऊ लागले आणि त्यानंतर ते रणजी क्रिकेट खेळू लागले.

1980-81 मध्ये जेव्हा कर्सन घावरी हे मुंबईकडून सातत्याने खेळत होते परंतु ते नॅशनल साइडला गेल्यामुळे बलविंदर सिंग संधू यांची मुंबईच्या संघात वर्णी लागली. पहिले दोन सामने त्यांनी खेळले नाहीत. परंतु गुजराथ विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यांनी 9 विकेट्स घेतल्या. त्या सीझनमध्ये दिल्लीच्या विरुद्ध होणाऱ्या फायनल सामन्यात त्यांचा समावेश झालेला नव्हता परंतु आयत्या वेळी त्यांची निवड झाली आणि रवी कुलकर्णी यांना ड्रॉप केले गेले गेले . त्यांनी त्यावेळी 18 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी परत 4 विकेट्स घेतल्या. त्या सीझनमध्ये त्यांनी 25 विकेट्स 18.72 या सरासरीने घेतल्या.

1982 च्या सुरवातीला दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात वेस्ट झोन विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 8 विकेट्स घेतल्या आणि 56 धावा केल्या तेव्हा ते 11 व्या क्रमांकावर खेळलं होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा इराणी ट्रॉफीमध्ये झालेल्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आणि त्यांची निवड पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात झाली.

बलविंदर सिंग संधू यांनी त्यानाच पहिला कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध 14 जानेवारी 1983 रोजी सिंध मधील हैद्राबाद येथे झाला. चौथ्या सामन्यात मदनलाल यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि त्यांच्या जागी बलविंदर सिंग संधू खेळले. त्या सामन्यात त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 2 विकेट्स घेतल्या त्यांनी मोहसीन खान आणि हरून रसीद याना बाद केले. आणि 71 धावा काढल्या. तसेच दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 12 धावा काढल्या हा सामना पाकिस्तानने एक इनिंग आणि 119 धावांनी जिंकला होता.

1983 च्या भारतीय संघाने जिंकलेल्या वर्ल्ड कप मध्ये बलविंदर सिंग संधू यांनी पहिलीच विकेट घेतली ती सर्वात डेंजर गॉर्डन ग्रिनिच याची त्याला संधू यांनी त्याची एक धाव असतानाच क्लीन बोल्ड केला , आजही त्यांनी टाकलेल्या शोल्डर आर्म्स चेंडूची चर्चा होत असते .त्यानंतर त्यांनी बाकसची विकेट घेतली ती त्याच्या 8 धावा असताना त्याचा झेल सय्यद किरमाणी यांनी घेतला होता. त्यावेळी मोहिंदर अमरनाथ आणि मदनलाल यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यांनी 83 धावांमध्ये 3 विकेट्स गयाना येथे घेतल्या त्या बेस्ट विकेट्स समजल्या जातात. बलविंदर सिंग संधू यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना 12 नोव्हेंबर 1983 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबाद येथे खेळला . त्यांनी 8 कसोटी सामन्यात 214 धावा केल्या त्यामध्ये त्यांची 2 अर्धशतके होती. त्यांची कसोटी समन्यामधील सर्वोच्च धावसंख्या होती 71 धावा तसेच त्यांनी 10 विकेट्स घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये 87 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या . त्यांनी 22 एकदिवसीय सामन्यांमध्ये 51 धावा घेतल्या आणि 16 विकेट्स घेतल्या त्यांनी एक इनिंगमध्ये 27 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या. बलविंदर सिंग संधू यांनी 55 फर्स्ट क्लास सामन्यात 1003 धावा केल्या त्यामध्ये त्यांची 8 अर्धशतके होती त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती 98 धावा तसेच त्यांनी 168 विकेट्स घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये 64 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या.

निवृत्तीनंतर बलविंदर सिंग संधू ते मुंबई आणि पंजाब चे नॅशनल क्रिकेट अकादमी मधील कोच होते. तसेच ते क्रिकेट क्लब ऑफ केनिया साठी खेळले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..