नवीन लेखन...
प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

ठाकूर मॅडम

बाबांची वर्धा पोलीस स्टेशन वरून मनमाड पोलीस स्टेशनला बदली झाल्यावर आम्ही कल्याणजवळच्या आमच्या गावातून मनमाडला राहायला गेलो. बाबा पोलीस अधिकारी असूनसुद्धा मला पहिलीला गावातल्याच मराठी आणि त्यातल्या त्यात झेड पी च्या शाळेत घातले होते. […]

चिचा

आमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते. […]

करवंदे अलिबागची

शाळेला सुट्टी लागल्यावर ओढ लागायची ती मांडव्याची. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मामाच्या गावांत एप्रिल मे महिन्यातील दीड महिन्याची सुट्टी भर्रकन संपून जायची. भाऊच्या धक्क्यावरून लाँच पकडून रेवस मार्गे मांडव्यापर्यंतच्या प्रवासाने सुट्टीला सुरवात व्हायची. […]

अटॅचमेन्ट

लहानपणी मांडव्याला गेल्यावर मांडवा ते रेवस रस्त्यावर सारळ पूला पर्यंत सायकल घेऊन फिरायला खूप मजा यायची. मांडवा जेट्टी आणि किनाऱ्यावर सायकल घेऊन तासन तास फिरताना कोणीच अडवायचे नाही. रस्त्यावर तेव्हा फारशी रहदारी नसल्याने सायकल दोन्ही हात सोडून चालवणे, उतरण असलेल्या रस्त्यावर हॅन्डलवर हाता ऐवजी दोन्ही पाय ठेवून चालवणे अशा करामती केल्या जायच्या. […]

तमसो मा ज्योतिर्गमय !

आज खरोखरच कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आहे. आपले पुढे काय होईल आणि कधी व केव्हा सर्व पूर्ववत होईल अशाच अंधिकारमय विचारात सगळेच जण आहेत. दिवाळी अजून लांब आहे पण आता जर दिवाळी असती तरी या अवस्थेत आणि असेल त्या परिस्थितीत प्रत्येकाने घरासमोर दारासमोर किंवा देव्हाऱ्यात दिवा लावला नसता का?? […]

‘ब…..’

माझ्या गावांत आणि आमच्या बोली भाषेत आईला फक्त ‘ ब ‘ म्हणून हाक मारतात. मी माझ्या आईला जरी आई म्हणत असलो तरी माझ्या सगळ्या काकूंना ब या नावानेच हाक मारतो. खरं म्हणजे आमच्या आगरी संस्कृती मध्ये आजही गावोगावी एकत्र कुटुंब पद्धती आहे. मला एकूण चार काका असल्याने आणि एका काकाला दोन बायका असल्याने मला पाच ब होत्या. […]

नवस (कथा)

मन्या शेटने मनातल्या मनात देवीची माफी मागितली यापुढे दर्शनाला गेल्यावरच काय पण उभ्या जन्मात दारूला हात लावणार नाही अशी शप्पथ घेतली. देवीच्या दर्शनाला जाताना कुठल्याही शुभ कार्याला माझ्या घरातूनच काय पण माझ्या संपूर्ण कुटुंबदारांपैकी कोणाकडूनही दारू आणि नशापाणी होऊ देणार नाही यासाठी वचनबद्ध राहण्याचा मन्या शेटने निर्णय घेतला. […]

भाऊबीजेचा डब्बा

आगरीकोळी समाजात हुंडा देत नाहीत आणि घेत नाहीत ही परंपरा आहे. आताच्या जमान्यात भाऊ बहिणीला हिस्सा द्यायला मागत नाहीत आणि बहिणी पण सोडायला मागत नाहीत.
पण काही बहिणींची माया अशी आहे की त्या अजूनही काय दिलं किंवा काय मिळणार असं मनात येऊ न देता लाडक्या भावाची माहेरी जाण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात. […]

कोस्टल रोड

दिघी मार्गे श्रीवर्धन ते अलिबाग साधारण शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतर असावे पण या कोस्टल रोड वरून जाताना तीन तासात पोचण्याचा विचार न करता निघाले तर सकाळपासून संध्याकाळ झाली तरी कंटाळा येणार नाही. […]

हेल्पलेस

अशा वेळी कोणाला कोरोनाची लागण झाली तर काय होईल ह्या भीतीने प्रत्येकजण हादरला आहे. जहाजावर कोणी नवीन माणूस येऊ नये असे सुद्धा प्रत्येकाला वाटत आहे. नवीन येणार असतील तर सगळ्यांनाच एकदम जाऊ द्या असेही काहीजणांना वाटते आहे. परंतु हे शक्य नाही कारण प्रत्येक जण हेल्पलेस आहे. […]

1 10 11 12 13 14 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..