नवीन लेखन...

मदतीचा हातभार

तसा मी घरात बायकोला थोडीफार मदत ही करतच असतो. अहो, खरंच ! म्हणजे “वॉशिंग मशिन लावणे” तर तुम्ही वाचलच असेल. म्हणजे नसेल तर वाचा इतकंच यातून सांगायचंय. याशिवाय भाज्या , कांदे, बटाटे, टोमॅटो चिरून…आता चिरून म्हणजे अगदी विळीवर बसून वगैरे नाही हो, सुरीनेच देतो चिरून. भेंडी नावाची भाजी चिरायला तुम्हाला सांगतो, मला अज्जीबात आवडतं नाही. बुळबुळीत […]

वॉशिंग मशीन एक लावणे

“आज धुणारायस का रे कपडे” ? बायकोने नेहमीप्रमाणे मला न आवडणारा प्रश्न विचारला. कपडे धुणारायस का ? कसं वाटतं ते ! म्हणजे मोरीत बसून मी धोका हातात घेऊन कपडे बडवतोय , असं चित्र डोळ्यासमोर येतं. मी अनेकदा तिला म्हट्लं “अगं वॉशिंग मशीन लावतोयस का ? असं विचार ना”. त्यावर ती लगेच “का ! त्यामुळे काय फरक […]

चाट आणि सँडविच

तर चाट, अर्थात भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, दही बटाटा पुरी, रगडा पॅटीस इ. इ. इ.. अर्थात जीभ चिक्कार चाळवणारे चविष्ट पदार्थ. सोबत भैयाच्या हाताची कमाल आणि खाऊन तृप्त झाल्यावर अखेरीस, उकडून कुस्करलेला बटाटा,. बारीक शेव आणि चाट मसाल्याच्या स्टफ्फिंगसह तोंडात जाणारी गोल पुरीची मुखशुद्धी. […]

प्रवास पंख्यांचा

पूर्वीच्या कचेऱ्या ब्रिटिशकालीन बांधणीच्या असल्यामुळे त्यांचं छत फार उंच असायचं. उंचावरून लोंबत पंखा तोलणारे लांबच लांब पोकळ लोखंडी पाइप आणि त्यांना लावलेले पंखे काचेऱ्यांत जागोजागी लटकलेले असायचे. बरं हे पंखे, जेवण जड झाल्यासारखे दिसायलाही तुंदीलतनू आणि त्यांची पातीही जाड आणि जड अंतःकरणाने फिरल्यासारखी फेरे घ्यायची. वेगाच्या अगदी वरच्या नंबरवर ठेवला तर कुठे खाली बसणाऱ्याना थोडीफार हवा लागायची झालं. […]

ज्येष्ठांच्या चष्म्यातून

मला नक्की काय हवंय किंवा काय मिळवायचय हे एकदा पक्कं झालं ना मग चिडचिड , तडतड होत नाही. घडलेली प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून घेण्याची सवय जडली ना की उगीचच राग राग होतो. माझ्याप्रमाणेच झालं पाहिजे , मी सांगतोय तेच बरोबर , किंवा मग , मला काही शिकवायचं नाही , मला सगळं समजतं , प्रत्येक गोष्टीत मला […]

पोट भर

तो खातो म्हणून – मी खातो, हा खातो म्हणून – तो खातो. माझे दहा – त्याचे दहा , त्यांचे वीस आणि – साहेबांचे पन्नास. प्रत्येकाचे वाटे – नेमके ठरलेले , पोट ठेवायचे – सतत भरलेले. काम करायचंय तर – खायला द्या , नाहीतर फेरी परत – मारा उद्या. पण उद्या मात्र आहे – माझी रजा, काम […]

बदललेल्या जागा आणि गोष्टी

मित्रांनो, आज आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी बदलून गेल्यायत. आपलं रहाणीमान, आवडी निवडी, आपली मानसिकता, आनंदाच्या व्याख्या सगळं सगळंच खूप बदलून गेलंय. कारण काय? तर आम्हाला आजच्या युगाबरोबर चालायचंय ना ! पूर्वी अगदी नेमाने करत असलेल्या अनेक गोष्टी आज आपल्याकडून दुर्लक्षित केल्या जाऊ लागल्यायत, किंवा असु दे ! जाऊ दे ! ठीक आहे, चालतंय ! असा दृष्टिकोन […]

पंढरीची वाट

पंढरीची वाट – पाऊले चालती, माऊली माऊली – गजर मुखातुनी. भागवताची पताका – घेऊनी सोबत , भाबडे दिसे ते रूप – वारकऱ्यांचे. मनी एक भाव – दर्शनाचा ठाव, दुजा न विचार – हृदयी वसे. भजन कीर्तनाचा – उसळे कल्लोळ, टाळ मृदुंगाची मिळे – साथ तया. मेळा वारीचा – वेगे वेगे चाले, ओढ भेटीची मनी – विठुरायाच्या. […]

कन्नुदादा ( एक काल्पनिक व्यक्तिचित्र)

कन्नुदादा गेला, पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. आईचं सगळं क्रियाकर्म आटपून कन्नुदादा घरी परतला तोच तापाने फणफणत. ताप, खोकला आणि उपाशी पोट. दुसऱ्या दिवशी म्यूनसिपालिटीच्या दवाखान्यात नेलं त्याला. टेस्ट केली आणि ती positive आली. […]

वृद्धाश्रम

वृद्धाश्रमात ठाण्याच्या – माझी आत्या असते, मधूनमधून जातो – मी तिला भेटायला. गेल्यावर मात्र जे – भकास चित्र दिसते, पाहिल्यावर नको वाटतं – पुन्हा तिथे जायला. सणवार वाढदिवसाचे गोडधोड – सारे काही मिळते, डोळे मात्र आतुरले असतात – मुलांना पाहायला. ती दिसणार नाहीत सदा – हे जेव्हा उमजते , शिकतात मग सारी स्वतःशी – खोटं खोटं […]

1 3 4 5 6 7 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..