नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

दिल की गिरह खोल दो, चूप ना बैठो !!

“खामोशी” शब्दांच्या पलीकडला – वहिदा, राजेश, धर्मेंद्र, गुलज़ार, ललिता पवार, देवेन वर्मा आणि हेमंतदा या साऱ्यांचा परिसस्पर्श मिरवणारा ! आज ५० वर्षांचा झालाय पण आपल्या रुग्णाच्या प्रेमात (एकदा नव्हे दोनदा) पडून त्याला बरं करण्याच्या नादात व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील रेषा विसरणारी नर्स वहिदा आजही स्मृतीत लखलखीत आहे. […]

नियतीचे “समांतर” वेढे !

चित्रपटक्षेत्र एकच, स्पर्धा एकच तरीही धावणाऱ्यांना पुढे मागे ठेवणारे हे नियतीचे समांतर वेढे ! या जोड्यांमध्ये काही वेगळी जुळवाजुळव होऊ शकली असती कां ? […]

निळ्या डोळ्यांचा जादूगार !

राजकपूर ही खरंतर एक संस्थाच ! निर्विवाद अधिराज्य करणारी, पूर्णतेचा ध्यास घेणारी. कोठलीही तडजोड न करणारी. तो स्वतःच एक पांढरा रुपेरी पडदा होता – बाह्यतः सारं काही मिरविणारा, पण आतमध्ये कुठेतरी खोलवर एक धुमसत्या कलागुणांचा ज्वालामुखी घेऊन हिंडणारा ! “जोकर ” च्या नेमक्या अपयशापाशीच खरंतर राज कपूर संपला. हे मरण जिव्हारी बाळगत त्याने ” बॉबी “, ” सत्यम शिवम ” सारखी आपल्या पराभवाची थडगी बांधली. […]

‘शेवटच्या रंगा’चे प्राणवायू !

प्रसंगी हा चित्रपट लाऊड, अंगावर येणारा वाटतो खरा, पण आयुष्यही त्यातील पात्रांच्या अंगावर पदोपदी असेच धावून येत असते आणि त्यांचे चिमुकले भावविश्व चिरडून टाकायचा प्रयत्न करीत असते. […]

पुष्पा, आय ‘लव्ह’ टिअर्स !

आतून पोखरलेला पण बाह्यतः कणखर खन्ना वेळोवेळी पुष्पाला मात्र आय “हेट” टिअर्स म्हणत सावरत असतो. देखण्या, तरुण नंदूला त्याच्या बालपणीच्या आठवणीतल्या झाडापाशी खन्ना आणून सोडतो आणि माय -लेकरांना भेटवतो. आता त्याला कळतं – अश्रू कायम खारट नसतात. एका भेटीच्या कुशीत दुसरा निरोप दडलेला असतो. आणि निरोप म्हटलं की अश्रू मस्ट ! […]

आ री आजा, निंदिया तू ले चल कहीं !!

केव्हाही, कोठेही हे गीत ऐकले की आत काहीतरी अनामिक कालवाकालव होते. बापाची लेकासाठीची धडपड डोळ्यांसमोर येते. ती खोटी, फसवी असू शकत नाही (भलेही चित्रपटात ती बऱ्यापैकी बटबटीत दाखविली असली तरी ! ).आणि दरवेळी बापाने अंगाई म्हणायलाच हवी असे कुठाय? त्यासाठी त्याने कुठून आणायचा किशोरचा “सोलफूल ” आवाज ? शेवटी बापाला स्वतःची धडपड, धावाधाव असतेच की ! […]

तुम हो तो हर रात दिवाली, हर दिन मेरी होली हैं !

“जैत रे जैत” मधील “जांभूळ पिकल्या झाडाखाली —- ” ची नजाकत जावेद अख्तरने – ” होली आई ,होली आई, देखो होली आई रे ” मध्ये बरहुकूम आणली आहे. संपूर्ण गाणं रंगछटांनी भरल्यावर, विशेषतः पिकलेल्या जोडीने ” तुम हो तो हर दिवाली, हर दिन मेरी होली हैं ” हे जीवनोत्सवावर भैरवी भाष्य करणं आणि यातून त्यांचे अभिन्नत्व दाखविणे हे फक्त केवळ ! […]

‘देवबाभळी’- व्यक्त /अव्यक्ताचा झगडा !

फक्त दोन (दृश्य स्वरूपातील ) स्त्री – पात्रांनी सशक्तपणे पेललेलं, अलीकडच्या काळातील संगीत नाटक म्हणजे – देवबाभळी ! त्या दोघींचे “अहो “होतेच पार्श्वभूमीला, पण दिसत नव्हते. एकतर ऐकूही येत नव्हता. पण त्या दोघांचेही अस्तित्व नाटकाला पुरुन उरले होते. […]

जयराम हर्डीकर

…… पण जयरामचा अकाली मृत्यू त्यालाही भिजवून गेला होता. त्याच्या अश्रूंच्या थेंबातून जयराम मला खिजवत होता. ही हार कोणाची? […]

मैं ना भुलुंगा…

१९७५ साल ! जूनी ११ वीची परीक्षा संपली होती. त्या सुमारास आमच्या घरी सुभाषकाका आले होते. परीक्षा संपल्याच्या आनंदात ते मला आणि माझ्या भावाला उमा टॉकीज मध्ये नुकताच लागलेला “रोटी कपडा और मकान ” चा ९.३० चा शो बघायला घेऊन गेले. तेव्हापासून लता-मुकेशच्या “मैं ना भुलुंगा ” चे गारुड अजूनही अबाधित आहे. […]

1 33 34 35 36 37 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..