नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

माझ्या मातीचे गायन !

१९९६ साली माझ्या पत्नीचा दुसरा काव्यसंग्रह ” वाटेवरच्या कविता ” प्रकाशित करण्याचा विचार पुण्यातील नीहारा प्रकाशनाच्या सौ. स्नेहसुधा कुळकर्णी यांनी बोलून दाखविला. मुखपृष्ठाची संकल्पना आमच्या गणपतीपुळे ट्रीपच्या बागेतील एका छायाचित्रावरून सुचली. प्रस्तावनेसाठी सुधीर मोघेंशी संपर्क साधला आणि काहीशा झटापटीनंतर ती मिळाली. (वो कहानी फिर कभी !) प्रश्न उरला – आशीर्वादाचा! यासाठी साहित्य सृष्टीतील आजोबा ” कुसुमाग्रज ” यांच्यापेक्षा अधिक समर्थ व्यक्ती कोण असू शकेल? […]

‘तो’ आणि ‘ती’

ती चुल्ह्याजवळ, तर त्याच्या डोईवर सूर्य तिच्या हाताला चटके, त्याच्या पायांना ! ती श्वासांसाठी हवेची झुळूक, तो विचारांसाठी शाई दोघे बनतात मुलांचे गुरुत्वाकर्षण, ताठ कण्याचे ! तिची पावले घट्ट मातीत, तो आकाशपावलांचा ती असते वसुंधरा दिन, तो असतो पुस्तक दिन ! ती सतत जवळ- हात फैलावला की स्पर्शणारी तो आभाळासारखा, सदैव दुरुन निरखणारा ! ज्याची जशी […]

बळींचा प्रवाहो चालला !

“बळींचा प्रवाहो चालला !” या नावाची कथा मी लिहिली होती – माझ्या वालचंदच्या मित्रावर ! सरकारी नोकरीच्या बरबटलेल्या व्यवस्थेने घुसमट झालेल्या माझ्या कविमित्रावर – जो कालांतराने शेवटी या व्यवस्थेचा भाग झाला . त्याच्याकडे पर्याय नव्हता. […]

समर्थ “समर्थ “का आहेत?

संत हे समाजाचे HR Managers असतात. उद्या Artificial Intelligence , Internet of Things, Machine Learning आणि Industry ४. ० सारखं तंत्रज्ञान येऊ घातलंय. मनोकायिक समस्या वाढीला लागणार आहेत , ताण -तणाव , आत्महत्या , मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन इत्यादी समस्या असतील. Anxiety , Depression, दूषित होणारं कौटुंबिक /सामाजिक /राजकीय पर्यावरण पुन्हा आपल्याला समर्थांकडे नेणार आहे. थोडक्यात काय तर समर्थांची आजपेक्षा अधिक गरज उद्या भासणार आहे. बलोपासना ,शारीरिक /भावनिक/मानसिक/अध्यात्मिक गरजांचा समतोल ,धार्मिक असहिष्णूता सगळ्यांना सावरणारे भक्कम हात रामदास स्वामींचेच असतील. त्यांचं प्रयोजन ,अस्तित्व कालजयी आहे. […]

जगणे अमुचे नका विचारू, आम्ही पाखरे भटकी !

असा डंका आम्ही फार पूर्वी मिरवलाय. हे भटकेपण स्वीकारलेलं असो की लादलेलं ! तेथे एकाकीपण आलंच. जगणं जगायसाठी बाहेर पडावं लागतंच. पण “तो प्रवास सुंदर होता ” अशी ग्वाही देता येतेच असं नाही. […]

मीना व्हर्सेस प्रभात !!

१९७५ साल खऱ्या अर्थाने गाजवलं दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी ! त्याकाळी “कोटी ” कॅटॅगरी नव्हती. सोलापूरच्या मीना टॉकीज ला ” शोले ” आणि रस्ता ओलांडून शंभर फुटांवर प्रभात मध्ये ” जय संतोषी माँ “. दोघांचा प्रेक्षकवर्ग वेगळा पण सोलापूर मुळातच चित्रपट प्रेमी शहर असल्याने माझ्या सारख्या भुसावळहून गेलेल्या पांढरा पडदा प्रेमीसाठी ती पर्वणी होती. […]

माझं “माझं” दुःख !

दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं. […]

एकेक दिवा वाटू या !

आपण शेवटचे दमदार हस्तांदोलन कधी केले आहे, आठवतंय? आणि हो, दुसऱ्याला शेवटची घट्ट, उबदार मिठी उसासून कधी मारलीय? म्हटलं तर या छोट्या, नगण्य गोष्टी -इतरवेळी त्यांच्याकडे सहसा लक्षही दिले जात नाही. पण अचानक या क्षुल्लक भासणाऱ्या “सहवासाचे” आवर्तन महत्वाचे ठरले आहे. या “ना स्पर्श” कोरोना पर्वात आपल्याला खिळखिळे करण्याचे सामर्थ्य आहे, हे आत्ता आत्ता लक्षात येऊ लागले आहे. […]

संकटकाळात नेतृत्वाची कसोटी !

संकटाला तोंड देण्यासाठी आणि हाताळण्यासाठी मानवता हा गुणविशेष नेतृत्वाने आत्मसात केला तर प्रतिसाद अधिक शीघ्र आणि संकटमुक्ती अधिक वेगाने शक्य  होईल. कृतीसाठी सामुहिक  स्वर , स्वतःबद्दलची मक्तेदारी आणि इतरांचे आपल्यावरील दायित्व यांचा विचार नेत्याला करावाच लागतो. […]

सुशि – वाचक व्रती लेखक !

अर्नाळकर,नाईक ओलांडून सुहास शिरवळकरांच्या मंदार कथा, दारा बुलंद कथांकडे जाताना वय आडवे आले नाही. प्रचंड खपाच्या, वेगळ्या धाटणीच्या रहस्यकथा या माणसाने आणल्या आणि इतरांचा वाचकचर्ग अक्षरशः हिसकावून घेतला. […]

1 29 30 31 32 33 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..