नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

स्वतःशी नाते

स्वतःला अलीकडच्या काळात निवांत कधी भेटला आहात ? आणि  स्वतःचं  स्वतःशी असलेलं नातं इतक्यात कधी निरखून पाहिलंय? जन्मल्यापासून आपण फक्त आणि सदैव स्वतःच्याच सान्निध्यात असतो. स्वतःला इतर कोणाहीपेक्षा आपणच अधिक ओळखत असतो. पण हे “ओळखपत्र ” बाह्य असतं की अंतर्गत? वपु म्हणतात- ” ओळखपत्रासारखं विनोदी दुसरं काही नाही. आपण कसे आहोत हे दाखविण्यापेक्षा आपण कसे दिसतो हे ओळखपत्र दाखवतं.” असं तर आपल्याबाबतीत घडत नाही नं, हा प्रश्न एकदातरी स्वतःला विचारायलाच हवा. […]

संगीतजीवी आपण !

संगीताची ताकत आपल्याला आनंदी किंवा दुःखी करून जाते. काहीवेळा कार्यालयातून दमून-भागून घरी यावे आणि आरामखुर्चीत विसावत हाती कॉफीचा मग घ्यावा आणि कानांवर मस्त संगीत असावं, एवढंच मर्यादित सुख आपल्याला अपेक्षित असते. उत्तम संगीत आपल्या जीवनाच्या सगळ्या परिघांना (शारीरिक, मानसिक, भावनिक) स्पर्शून जाते. संगीत प्रत्येक सहृदय व्यक्तीच्या मनाचा एक अदृश्य भाग असते आणि सांस्कृतिक वास्तव तसेच वारसाही असते. […]

गुलज़ार समजून घेताना…

जानेवारी २०२१ मध्ये माझे हे पुस्तक प्रकाशित झाले. गुलज़ारच्या १६ चित्रपटांवर मी २०१८ साली चेहेरे-पुस्तिकेवर लिहिलेल्या पोस्ट्स चा हा संग्रह आहे. […]

‘उंबरठ्या’ बाहेरचा गिरीश कर्नाड !

माझ्यासाठी तो कायम उंबरठ्याबाहेर राहिला. माझ्या प्रिय चित्रकलावंतांच्या मांदियाळीत मी त्याला स्थान देऊ शकलो नाही. त्याची नाटके बघायचा योग आला नाही की भाषणे ऐकण्याचा ! मात्र त्याला “ज्ञानपीठ “जाहीर झाले त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी काहिसा निषेध नोंदविला आणि मग मी कुतूहलाने त्याची पूर्वपीठिका चाळली. ज्ञानपीठ मिळाले म्हणजे हा नक्कीच बाप माणूस असणार ही बांधलेली खूणगाठ तेंव्हा घट्ट झाली. […]

मायबाप ‘जिंदगी’ ला सवाल !

बाप रे बाप, माझी यादी संपता संपत नाहीए. मी पाहिलेल्या चित्रपटांमधील “जिंदगी ” विषयक, “जिंदगी” च्या अनेकविध छटा दाखविणारी ही (फक्त) हिंदी गाणी ! आज “अंकुर अरोरा मर्डर केस ” मधील असेच हे नितांत सुंदर, जिवंत आणि “जिंदगी “ला प्रश्न विचारणारे गाणे ! […]

मानवतेचे दूत

कोरोना नावाच्या दहशतीने आपले २०२० हे वर्ष गिळंकृत केलेले आहेच पण आता २०२१ ही त्याच्या कचाट्यातून सुटताना दिसत नाही. शतकातून एखाद्या येणाऱ्या या महामारीने आपल्या जगाला तीन प्रकारे उध्वस्त करण्याचे आरंभले आहे. […]

घर ‘बसल्या’ काम !

कार्यालय आणि घर हे दोन महत्वाचे पण वेगळे कप्पे आपले आयुष्य व्यापून टाकतात. दोन्ही ठिकाणे वेगळी, तेथे असण्याच्या वेळा वेगळ्या, जबाबदाऱ्यांचे स्वरूप वेगळे ! काय सामाईक असेल तर – दोन्ही ठिकाणी “आपण” असतो. घरबसल्या काम कदाचित अधिक मोठ्या प्रमाणावर भविष्यात (कोरोना संकटानंतरही) पर्याय ठरू शकेल तो गांभीर्याने हाताळला तर खूप समस्या सुटू शकतील. कदाचित कोरोनाची जगभरातल्या नोकरदारांसाठी ही आनंददायी भेट ठरेल. […]

‘हाय’ आणि ‘बाय’ च्या मधील ‘फिर जिंदगी’

२००४ साली माझ्या विद्यार्थ्यांचे-राधामोहनचे निधन झाले, कारण अपघातावेळी त्याने हेल्मेट घातले नव्हते. अंत्यविधीच्या वेळी त्याच्या वडिलांनी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती केली होती- ” बाबांनो, वाहन चालविताना हेल्मेट घाला. माझ्यावर आज जी पाळी आली आहे, ती तुमच्या पालकांवर कधीही येऊ नये. ” या प्रसंगावर आधारित माझी “हेल्मेट ” ही कथा २०२० च्या “तरुण भारत ” च्या दिवाळी अंकात आली आहे. […]

‘कभी कभी’… असंच कधीतरी, काहीबाही !

सोलापूरच्या उमा चित्रगृहाच्या बाहेर भलं थोरलं पोस्टर ! “जंजीर ” आणि “दिवार ” मधील अंगार ओकणारा अमिताभ वेगळ्याच वेशभूषेत ! त्याने घातले होते, त्याला ” पॉलीनेक ” म्हणतात हे कालांतराने वालचंदला असताना समजले. हिंदी चित्रपटसृष्टीतील यच्चयावत “हूज हू ” मंडळी एका पडद्यावर ! […]

ट्रान्स – रविवार सकाळचा !

सकाळी सकाळी पत्नीने सारेगामा -कारवा मधील लताचे ” ऐ मालिक तेरे बंदे ” सुरु केलं आणि मीच बघता बघता ट्रान्समध्ये गेलो- ते नितळ प्रार्थना स्वर अलगद स्वतःचे विश्व तयार करीत होते, आणि ध्यान लागल्यासारखा मी त्यामध्ये ओढला गेलो. चक्क तीन मिनिटे समाधी अवस्था मी जगलो. […]

1 28 29 30 31 32 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..