नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

२६/११- आमची “मिती “

या तारखेची ताजी भळाळती खूण आत्ता दुपारी नेटफ्लिक्स वर पाहिली – ” मेजर ” ! हा चित्रपट दोन दमात बघून संपवला. एका बैठकीत असले इंटेन्स पिक्चर्स आजकाल सहन होत नाही. मेजर उन्नीकृष्णन यांचे २६/११ चे बलिदान आणि पूर्णतया NSG अँगलने केलेला हा चित्रपट! […]

” मधल्या सुट्टीतील डबा “

मागे वळून बघण्याच्या वयात आल्यानंतर सगळ्यांनाच स्नेहमेळाव्याची/बालपण भेटण्याची ओढ लागते. आम्ही त्याला अपवाद नाही. माझ्याकडे भेटीचे असे तीन पर्याय आहेत- भुसावळचे शाळूसोबती, सोलापूर हदे चे मित्र आणि सांगलीच्या वालचंदचे स्नेहगडी ! संधी मिळेल तशी मी प्रत्येक पाणवठ्यावर हजेरी लावत असतो. […]

जुनागढचा लघुचित्रकार

नसीर नेहेमीच शब्दांच्या पलीकडे असतो. “फिराक”, ” द वेन्सडे “, ” चायना गेट” आणि अगदी अलीकडचा – अवेळी पावसासारख्या मागील वर्षी निघून गेलेल्या “फिर जिंदगी” वाल्या सुमित्रा भावेंच्या लघुपटात! […]

मिस तनकपुर हाजीर हो !

म्हशीचं नांव “तनकपुर ” आणि तेही “मिस ” म्हटल्यावर अपेक्षेप्रमाणे चित्रपट निघाला- यंत्रणांवर कोरडे मारणारा ! फार पूर्वी “जाने भी दो यारो ” नामक ब्लॅक कॉमेडी कॅटॅगिरीतील चित्रपट निघाला होता – त्यांतील लक्षणीय “भक्ती ” आता लोपलीय. मात्र ” मिस तनकपुर ” एक पाऊल पुढे टाकत आपल्या पोलीस आणि न्याय यंत्रणेवर कोरडे ओढतो. तसं तर अलीकडे “गंगाजल “मध्येही पोखरलेल्या कायदा -सुव्यवस्थेच्या “खांबांवर” बोट ठेवलं होतं. इथेही सगळे कोळून प्यायलेले यच्चयावत महाभाग भेटतात. […]

असेन मी, नसेन मी !

आज एके ठिकाणी भूपेंद्र आणि सुवर्णा माटेगांवकरांचे गीत दिसले म्हणून ऐकले- ” बिती ना बिताई रैना “. गुलज़ार /पंचम जोडी, जया /संजीव दुसरी जोडी आणि लता/भूपेंद्र ही तिसरी जोडी. यांपैकी नक्की कोणत्या जोडीने हे गीत अजरामर केलंय, मला १९७० पासून आजतागायत ठरविता आलं नाहीए. यापैकी एक जोडी पडद्यावर दिसली, एक कागदावर आणि वाद्यांमध्ये भेटली तथा तिसरी सरळ आतमध्ये घुसली. […]

एकावर एक !

बघता बघता आपण नकळत स्वतःला “शिक्क्यांची ” सवय लावून घेतो. उदा- टाटा इंडिका म्हणजे टॅक्सी, मारुती व्हॅन म्हणजे स्कूल व्हॅन, (आमच्या लहानपणी) भाजलेले शेंगदाणे म्हणजे चित्रपटाचा इंटरव्हल, तसेच पुण्यातील भनाम (भरत नाट्य मंदिर) वरचा शिक्का म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा अथवा एकांकिका. […]

कण्हेरी मठ

कोल्हापूरचे स्नेही डॉ कुळकर्णी यांचेकडून या स्थानाबद्दल वारंवार ऐकले होते. ते तिथे बरेचवेळा जाऊन -येऊन असतात. हो ,भक्त निवास आहे मठात ! नंतरची उत्सुकता वाढली – ABP माझा कट्टया वर ” अदृश्य “काडसिद्धेश्वर स्वामीजींची बातचीत ऐकल्यावर ! […]

1 9 10 11 12 13 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..