नवीन लेखन...
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

पृथ्वीवर मुबलक आढळणारा धातू: ॲल्युमिनियम

ॲल्युमिनियम (Al), ज्याला ॲल्युमिनियम असेही लिहिले जाते, हा आवर्त सारणीतील प्रमुख गट १३ मधील एक हलका चंदेरी पांढरा धातू आहे. ॲल्युमिनियम हा पृथ्वीच्या कवचातील सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारा धातू (ॲल्युमिनियम मूलद्रव्य) आणि सर्वात प्रचलित अलोह धातू आहे. त्याच्या रासायनिक क्रियाशीलतेमुळे ॲल्युमिनियम निसर्गात कधीही धातूच्या स्वरूपात आढळत नाही, परंतु त्याची संयुगे जवळजवळ सर्व खडक, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात आढळतात. […]

गंजरोधक रासायनिक धातू: जस्त (Zinc)

हा एक निळसर-पांढरा, हलकासा ठिसूळ आणि गंजरोधक रासायनिक धातू आहे, झिंक म्हणजे जस्त हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याची रासायनिक संज्ञा (Zn) आहे. त्याचा अणुक्रमांक ३0 आहे. जस्त (Zinc) हा आवर्त सारणीतील एक संक्रमण धातू (Transition Metal) किंवा रासायनिक मूलद्रव्य आहे. या धातूचा प्राचीन काळापासून मानव वापर करीत आलेला आहे. जस्त विलेपन या प्रकियेमध्ये या धातूचा वापर केला जातो. […]

आधुनिक जगाचा धातू – टायटॅनियम

आधुनिक जगाचा धातू – टायटॅनियम इतिहास १७९१ साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व खनिजशास्त्रज्ञ विल्यम ग्रेगॉर यांना एक नवा धातू मेनकॅनाइट खनिजात सापडला त्याव्रून त्यांनी त्याचे नाव मेनाकिन असे ठेवले. पुढे १७९५ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन हेन्रिक क्लॅपरॉथ यांना रुटाइलच्या खनिजात हा धातू सापडला. क्लॅपरॉथ यांना आधीच्या शोधाबद्दल काहीच माहित नव्हते, त्यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास करून त्यास टायटॅनियम […]

द्रव स्वरूपातील एकमेव धातू : पारद (पारा)

आपल्याकडे एखादी व्यक्ती रागावली तर तिचा पारा खूप चढला आहे असे म्हणतात. खरे म्हणजे पारा हा एकमेव धातू आहे जो द्रवरूपात आढळतो.
पारा (Mercury, रासायनिक संज्ञा: Hg, अणुक्रमांक: ८०) हे एक नैसर्गिक मूलद्रव्य आहे. सामान्य किंवा खोलीच्या तापमानाला द्रव अवस्थेत असणारा हा एकमेव धातू आहे. हा चंदेरी व चमकदार रंगाचा, पाण्यापेक्षा १३.६ पट जड असणारा अत्यंत विषारी धातू आहे. याविषयीची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे: पाऱ्याचे लॅटिन नाव “हाईड्राजिरअम” असे आहे. (Hg) […]

प्लॅटिनम – एक राजस धातु

सोन्यापेक्षा महाग असणारा पण अलंकारांसाठी अनेकांना आकर्षित करणारा धातू म्हणजे प्लॅटिनम. प्लॅटिनम हा चांदीसारखा पांढरा, अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान धातू आहे. हा सोन्यापेक्षाही अधिक दुर्मीळ आहे असे मानले जाते.
पृथ्वीच्या पोटात अगदी कमी प्रमाणात सापडणारा हा धातू आहे. त्याच्या स्वत:च्या खनिजामधे तसेच निकेल व तांबं असणाऱ्या खनिजामधे हा धातू मिळतो. याचं ८ टक्के उत्पादन दक्षिण आफ्रिकेत होतं. उत्पादन कमी असल्यानं तो महाग असतो. […]

लिथियम एक बहुचर्चित धातू

सन १८१७ साली स्वीडिश रशायनशास्त्रज्ञ आर्फेडसन यांनी लिथियमचा शोध लावला. त्यावेळी त्यांना कल्पनाही नसेल की जवळ जवळ दोनशे वर्षानंतर ह्याच्या मुळे जगात क्रांती घडेल. लिथियम धातूत संशोधन होऊन आज लिथियम शिवाय जागतिक दळण वळणात प्रचंड बदल झाला तो त्याचा उपयोग वापरात येणाऱ्या बॅटरी मद्धे असणाऱ्या लिथियम मुळे. आता परिस्थिती अशी आहे कि लिथियम बॅटरी शिवाय पण हालत नाही. या धातूचा वापर भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, विद्युत् वाहने यांची बॅटरी, तसेच पुनर्भरणीय (रिचार्जेबल) बॅटरी तसेच संदेश परिवहनात त्याच्यामुळे प्रचंड वेळ वाचत आहे. […]

ताम्र – एक अफलातून धातू (COPPER)

तांबे हा मानवाने सर्वप्रथम वापरलेल्या धातूंमध्ये अग्रक्रमाने येणारा धातू आहे. हे लाल रंगाचे, अतिशय महत्त्वाचे व उपयुक्त मूलद्रव्य आहे. हे उष्णता आणि विजेचे उत्तम वाहक आहे. मानवी शरीराच्या आरोग्यासाठी तसेच अनेक उद्योगांमध्ये तांब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मानवाच्या प्रगतीच्या इतिहासात तांब्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळात शस्त्रे, शेतीची अवजारे आणि घरगुती वस्तू तयार करण्यासाठी तांब्याचा […]

चमकदार चांदी

चांदी (Silver) हे अत्यंत मौल्यवान, चमकदार पांढरे आणि मऊ रासायनिक मूलद्रव्य आहे (अणुक्रमांक ४७). सोन्यापाठोपाठ चांदीचा वापर दागिन्यांसाठी, भांड्यांसाठी, गुंतवणुकीचे माध्यम म्हणून आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. चांदी हा एक चमकदार मौल्यवान धातू आहे. लॅटिनभाषेत “चमकदार” किंवा “पांढरा” ह्या शब्दाला आर्जेन्टम असे म्हणतात. […]

सुवर्ण – झळाळी

मागील वर्ष- सहा महिन्यापासून सोने हे सर्वात जास्त चर्चेत आलेला विषय आहे. वर्तमानपत्र, मासिके व व्हाट्सअँप ग्रुप वर याची धमाल आहे. याचा दहा ग्राम (एक तोळा ) चा दर ७० हजार रुपये पासून २.५ लाख तोळ्यावर पोहचला होता. व आजकाल तो १.६० लाख रुपये तोळा पर्यंत खाली आलेला आढळतो. तुम्ही म्हणाल सोन्याला एवढी मागणी का निर्माण झाली? तर जगात कोठेही युद्ध सुरु झाले की लोकांची गुंतवणूक सोन्यात होते. कारण ही कधीही न बुडणारी गुंतवणूक आहे. सामान्य माणूसच काय पण प्रत्येक देश यात गुंतवणुकीला प्राधान्य देतो. हे आत्ताच घडते आहे असे नाही, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही हीच परिस्थिती होती. […]

श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र आणि बारा राशी

माझ्या श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र या मराठीसृष्टी वर १५ मे,२०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखानंतर माझ्या एका वाचकाने त्याच्या संग्रहामद्धे असणारा हा लेख पाठवला आहे. लेखक माहित नाही. परंतु माहिती अतिशय सुंदर आहे म्हणून योग्य संपादन करून पुन्हा प्रसारित करत आहे.आपल्या जन्मराशीवरून व चरणावरून विष्णुसहस्त्रनामातील कोणते स्तोत्र पठण करायचे याचीही माहिती आहे. अतिशय अमूल्य माहिती आहे. […]

1 2 3 … 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..