नवीन लेखन...

आधुनिक युगातले अर्जुन

पर्यावरण या विषयात ‘पर्यावरणप्रेमी’ ही पदवी मिळवण्या करता पदवैच्छुक जमले होते. आचार्यांनी सगळ्या पदवैच्छुकांना बोलावले व सुरुवात केली. “माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, परीक्षेत एकच प्रश्न असणार आहे. पण आधी तुम्हाला एक गृहपाठ देत आहे. तुम्ही त्याचा नीट अभ्यास करून मग परीक्षे करता यायचे आहे. गृहपाठ असा, कि मुंबईत आरे येथे सरकारने मेट्रो 3 करता कारशेड बनविण्याचा व त्या करता काही झाडे तोडण्याचा घाट घातला आहे. तर तुम्हाला या परिस्थितीचा सविस्तर अभ्यास करून मग परीक्षे करता यायचे आहे.” त्या प्रमाणे सर्व पदवैच्छुकांनी अभ्यास केला, व ते परीक्षे करता आचार्यां समोर येवून उभे राहिले.

आचार्यांनी पहिला प्रश्न विचारला. प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही परिस्थितीचा नीट अभ्यास केला?

पदवैच्छुक : होय गुरुजी, केला.

आचार्य : मग तुम्हाला काय दिसते ते सांगा

पदवैच्छुक : गुरुजी, आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : आरे येथे एकूण 4.80 लाख झाडे आहेत. ती तुम्हाला दिसत नाहीत ?

पदवैच्छुक : नाही गुरुजी, आम्हाला तसे काहीही दिसत नाही. आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : कापाव्या लागणा-या झाडांची संख्या एकूण झाडांच्या फक्त 0.6% येवढीच आहे. ते तुम्हाला दिसत नाही ?

पदवैच्छुक : नाही गुरुजी, आम्हाला तसे काहीही दिसत नाही. आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : यापैकी 2700 झाडां पैकी 460 झाडांचे पुनर-रोपण केले जाणार आहे. ते तुम्हाला दिसत नाही ?

पदवैच्छुक : नाही गुरुजी, आम्हाला तसे काहीही दिसत नाही. आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : उर्वरित 2240 झाडांच्या बदल्यात 6 पट झाडे मेट्रो लावणार आहेत. ते तुम्हाला दिसत नाही ?

पदवैच्छुक : नाही गुरुजी, आम्हाला तसे काहीही दिसत नाही. आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : आत्तापर्यंत एकूण 24,000 झाडे एमएमआरसी ने लावली आहेत. त्यापैकी 21,500 जवळच संजय गांधी पार्क च्या degraded forest मध्ये लावली आहेत. आणि ती उत्तमपणे वाढत आहेत. ते तुम्हाला दिसत नाही ?

पदवैच्छुक : नाही गुरुजी, आम्हाला तसे काहीही दिसत नाही. आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : 2700 झाडे काढल्यामुळे होणारे वार्षिक पर्यावरणीय नुकसान म्हणजे 64 मेट्रिक टन CO2 उत्सर्जन केवळ 4 दिवसांच्या मेट्रो ऑपरेशन्स नि भरून निघेल. ते तुम्हाला दिसत नाही ?

पदवैच्छुक : नाही गुरुजी, आम्हाला तसे काहीही दिसत नाही. आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : त्याच प्रमाणे life time नुकसान म्हणजे 1280 मेट्रिक टन CO2 उत्सर्जन 80 दिवसांच्या मेट्रो ऑपरेशन्स नि भरून निघेल. ते तुम्हाला दिसत नाही ?

पदवैच्छुक : नाही गुरुजी, आम्हाला तसे काहीही दिसत नाही. आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : दररोज 17 लाख प्रवाशी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मेट्रो 3 मुळे 6.5 लाख वाहन फेऱ्या दररोज रस्त्यांवरून कमी होतील. ते तुम्हाला दिसत नाही ?

पदवैच्छुक : नाही गुरुजी, आम्हाला तसे काहीही दिसत नाही. आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : या वाहन फेऱ्या कमी झाल्या मुळे 3.5 लाख लिटर इंधनाची बचत होईल. ते तुम्हाला दिसत नाही ?

पदवैच्छुक : नाही गुरुजी, आम्हाला तसे काहीही दिसत नाही. आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : 3.5 लाख लिटर इंधनाची बचत झाल्या मुळे प्रतिवर्षी 2.61 लाख प्रदूषित वायूंचे उत्सर्जन कमी होणार आहे. ते तुम्हाला दिसत नाही ?

पदवैच्छुक : नाही गुरुजी, आम्हाला तसे काहीही दिसत नाही. आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : प्रदूषित वायूंचे उत्सर्जन कमी झाल्याने फुफ्फुसांच्या रोगांचे प्रमाण कमी होऊन त्या मुळे होणा-या मृत्युंची संख्या पण खूप कमी होणार आहे. ते तुम्हाला दिसत नाही ?

पदवैच्छुक : नाही गुरुजी, आम्हाला तसे काहीही दिसत नाही. आम्हाला फक्त 2700 झाडे दिसतात.

आचार्य : शाबास मुलांनो. तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात. लक्षात ठेवा, ‘पर्यावरणप्रेमी’ होण्याकरता एकाग्रता फार महत्वाची असते. जर तुम्हाला 2700 झाडां व्यतिरिक्त आणखीन काहीही दिसले असते, तर तुम्ही या परीक्षेत सपशेल नापास झाला असतात. पण तुम्हाला इतर काहीही दिसले नाही, म्हणून तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झालात. अशीच एकाग्रता या पुढे ही ठेवा व यथावकाश तुम्ही ‘थोर पर्यावरणप्रेमी’ ही पदवी पण मिळवू शकाल.

— चेतन पंडित 

चेतन पंडित
About चेतन पंडित 3 Articles
वय ६७ वर्षे. सिविल इंजींनीयरिंग मध्ये बी.टेक. आय.आय.टी दिल्ली येथून, आणि जलविज्ञान (हाड्रोलोजी) या विषयात एम.टेक. आयर्लंड येथून. ३६ वर्षे “केंद्रीय जल आयोग” मध्ये नोकरी, व आता राज्या-राज्यां मधील पाणी वाटपाचे तंटे सोडविण्या करता सल्लागार. नोकरीत असताना अनेक शोधपत्र (इंग्रजीत) तांत्रिक जर्नल्स मधून प्रसिद्ध. पास्कल या भाषेत संगणक प्रोग्रेमिंग करता एक पुस्तक. मराठीत “अंतर्नाद” या मासिकात अनेक निबंध वजा लेख. ललित लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..