नवीन लेखन...
चेतन पंडित
About चेतन पंडित
वय ६७ वर्षे. सिविल इंजींनीयरिंग मध्ये बी.टेक. आय.आय.टी दिल्ली येथून, आणि जलविज्ञान (हाड्रोलोजी) या विषयात एम.टेक. आयर्लंड येथून. ३६ वर्षे “केंद्रीय जल आयोग” मध्ये नोकरी, व आता राज्या-राज्यां मधील पाणी वाटपाचे तंटे सोडविण्या करता सल्लागार. नोकरीत असताना अनेक शोधपत्र (इंग्रजीत) तांत्रिक जर्नल्स मधून प्रसिद्ध. पास्कल या भाषेत संगणक प्रोग्रेमिंग करता एक पुस्तक. मराठीत “अंतर्नाद” या मासिकात अनेक निबंध वजा लेख. ललित लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न.

आत्मनिर्भर व्हायचं आहे ? तर मग त्या करता . . .

आधी कोविडची साथ; त्या नंतर सीमे वर चीनची आगळिक; संतापलेल्या भारतीयांनी चीनी वस्तूं वर बहिष्कार टाकण्या करता दिलेली हांक; आणि शेवटी झालेली जाणीव की आपली अर्थ व्यवस्था चीन मधून आयात केलेल्या वस्तूंवर येवढी अवलंबून आहे की आपण फार काही वस्तूं वर बहिष्कार टाकूच शकत नाही. या सर्व घडामोडींच्या निमित्ताने काही मुद्दे अधोरेखित झाले आहेत, व त्याची नोंद आत्ताच घेणे गरजेचे आहे. कारण एकदा का सीमे वर परत शांतता झाली, कोविड संक्रमण आटोक्यात आले, की हे मुद्दे आपल्या करता महत्वाचे राहणार नाहीत. […]

आधुनिक युगातले अर्जुन

पर्यावरण या विषयात ‘पर्यावरणप्रेमी’ ही पदवी मिळवण्या करता पदवैच्छुक जमले होते. आचार्यांनी सगळ्या पदवैच्छुकांना बोलावले व सुरुवात केली. “माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, परीक्षेत एकच प्रश्न असणार आहे. पण आधी तुम्हाला एक गृहपाठ देत आहे. तुम्ही त्याचा नीट अभ्यास करून मग परीक्षे करता यायचे आहे. […]

सिद्दाबाबाची खोली

सिद्दाबाबाच्या खोलीत स्त्रियांनी का जायचे नाही, हे जाणून घ्यायला अलकाला फारशी चौकशी करावी लागली नाही. गोष्ट तशी फार जुनी नव्हती, तीस एक वर्षां पूर्वीची. आणि जे काही घडले ते प्रत्यक्ष पाहिलेले अनेक साक्षीदार हयात होते. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..