द्रौपदी वस्त्रहरण

ह्रदयद्रावक प्रसंग आला   द्रौपदीवरी
विटंबना करुं लागले   कौरव जमुनी सारी  ।।१।।

द्युतामध्यें हरले होते   पांडव बंधू सारे
द्रौपदीस लावले पणाला   जेव्हां कांहीं न उरे  ।।२।।

वस्त्रहरण करीत होता    दुष्ट तो दुर्योधन
हताश झाले होते पांडव   हे सारे बघून  ।।३।।

‘ द्वारकेच्या कृष्णा ‘  धावूनी ये    मी दुःखत पडे
मदतीचा केला धांवा    कृष्ण बंधूकडे  ।।४।।

धावूनी आला कृष्ण    द्रौपदीचे मदतीसाठी
लाज राखली द्रपदीची   उभे राहूनी पाठीं  ।।५।।

कां उशीर केलास    मदत देण्या मजला
लटका राग दाखवूनी    प्रेमानें जबाब विचारला  ।।६।।

बसलो होतो  ‘तुझ्याच  ह्रदयी ‘   अति जवळ
संबोधितां तूं  ‘ द्वारकेच्या कृष्णा ‘    येण्या झाला वेळ  ।।७।।

म्हटले असते  ‘ ह्रदयातील कृष्णा ‘   ये धावूनी लवकर
येथेंच होतो मी मदत केली असती सत्वर  ।।८।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1590 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…