नवीन लेखन...

‘अ’ ची चौदाखडी 

 

अ पासून अ: पर्यंतचे बारा स्वर आणि क पासून क: पर्यंतचा बारा व्यंजनांचा संच असतो म्हणून देवनागरी वर्णमालेत बाराखडी आहे असं समजतात.  अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणिऑ या स्वरांची तसंच कॅ अणि कॉ वगैरे व्यंजनांची सोय करणं आवश्यक होतं. या दोन अक्षरचिन्हांचा समावेश केला की देवनागरीची चौदाखडी होते.  

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९२४ च्या सुमारास भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे….क ला वेलांटी लावली तर ‘की’ होते आणि ते आपण स्वीकारलं आहे तर  अ ला वेलांटी लावून ‘अि’ का स्वीकारू नये? त्यानुसार इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या चिन्हांबद्दल (अक्षरांबद्दल..स्वरांबद्दल..) अि, अी, अु, अू, अे  अै  ही स्वरचिन्हं स्वीकारावी.

आ, ओ, औ, अं  आणि  अ: ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत. अशारितीनं अ ची बाराखडी जर आपण स्वीकारली तर, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ  या स्वरचिन्हांची आवश्यकता राहणार नाही.

हाच विचार मी पुढे नेला आहे. क ला काना लावला तर ‘का’ होतो तसाच अ ला काना लावून ‘आ’ होतो आणि तो आपण स्वीकारला आहे.

क ला ओकार लावला तर ‘को’ होतो, तसाच अ ला ओकार लावला तर ‘ओ’ होतो. हा ही आपण स्वीकारला आहे.

क ला औकार लावला तर ‘कौ’ होतो, तसाच अ ला औकार लावला तर ‘औ’ होतो…तोही आपण स्वीकारला आहे.

क वर अनुस्वार दिला तर ‘कं’ होतो, तसाच अ वर अनुस्वार दिला तर ‘अं’ होतो, तो ही आपण स्वीकारलाच आहे.

क ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘क:’ होतो, तसाच अ ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘अ:’ होतो..तोही आपण स्वीकारला आहे.

जर, आ, ओ, औ, अं  आणि अ:  ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत. तर मग….अि अी अु अू अे अै लाच का स्वीकारू नये?

खरं म्हणजे अै आणि    हे मिश्र किंवा जोड स्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि  म्हणजे    (अ अु)

आद्य लिपीकारांना हेच विचार सुचले असते तर       ही अक्षरचिन्हं घडविण्याची गरजच नव्हती.

अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणि ऑ या स्वरांची सोय करणं आवश्यक होतं. ऑगस्ट, ऑक्टोबर, डॉक्टर, बँक, बॅरिस्टर, अॅक्ट,अॅडव्होकेट वगैरे शब्द मराठीत लिहीतांना अर्धचंद्राच्या सहाय्यानं हे अुच्चार लिहिले यातच मराठी लिपीकारांची प्रतिभा दिसून येते. कौतुकास्पद आहे. नाहीतर हे शब्द आगस्ट, आक्टोबर डाक्टर, आडव्होकेट ब्यांक, ब्यारिस्टर, असे लिहावे लागले असते. पूर्वी ते तसे लिहिलेही गेले आहेत.

हिंदीत हेच शब्द बैंक,अैक्ट असे लिहीतात. गुजराथी बांधव ऑ चा अुच्चार ओ असा करतात. ते बॉम्ब ला बोम्ब आणि हॉलला होल म्हणतात. अेकदा, बँकेत, अेक अिसम, लोकर पाहिजे … असं म्हणत होता. बँकेत पैसे असतात, याला लोकर कशी मिळणार? नंतर लक्षात आलं. त्याला बँकेचा लॉकर हवा होता.

पारंपारिक स्वरमालेत ऋ (र्‍हस्व आणि दीर्घ) आणि लृ (र्‍हस्व आणि दीर्घ) हे स्वर समजले आहेत. पण ते स्वरांची व्याख्या पूर्ण करू शकत नाहीत. स्वराचा अुच्चार करतांना, ओठ. दात, टाळू आणि जीभ यांचा अेकमेकांशी स्पर्श व्हावयास नको. नाद केवळ घशातूनच यावयास हवा. स्वरांचा दीर्घ अुच्चार करीत राहता येतो. अऽऽऽऽऽऽ किंवा आऽऽऽऽऽऽ.  अीऽऽऽऽऽऽऽ  अूऽऽऽऽऽऽऽ.

अै आणि  हे शुध्द स्वर नाहीत, मिश्र किंवा जोड स्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि  म्हणजे  (अ अु). अैऽऽऽऽऽऽ आणि  औऽऽऽऽऽऽऽऽ. 

 अॅऽऽऽऽऽऽ आणि ऑऽऽऽऽऽऽऽ. म्हणूनच अॅ आणि ऑ हे स्वर समजले जातात.

तसं व्यंजनांच्या बाबतीत होत नाही. कऽऽऽऽऽ.

ऋ आणि लृ अुच्चारतांनाही तसं होत नाही. यास्तव ही अक्षरचिन्हं, स्वर नाहीत म्हणून त्यांचा स्वरमालेत समावेश करता येत नाही. ऋऽऽऽऽऽऽऽ.  लृऽऽऽऽऽऽऽऽ

वरील विवेचनानुसार अ ची चौदाखडी येणेप्रमाणे स्वीकारावी ::

  अॅ    ऑ  अि  अी  अु  अू  अे  अै      अं  :

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागानं, ६ नोव्हेंबर २००९ रोजी  अेका अध्यादेशानं, मराठीचे स्वर आणि व्यंजनं स्वीकारली. त्यात पारंपारिक स्वरांबरोबरच अॅ आणि ऑ हे स्वर स्वीकारले पण अ ची बाराखडी मात्र स्वीकारली नाही, ती आता स्वीकारावी असं वाटतं.

पण जनताजनार्दनानं हे स्वर कित्येक वर्ष आधीच स्वीकारले आहेत. १९७६ साली प्रकाशित झालेल्या प्रा. देशपांडे यांच्या अिंग्रजी-मराठी शब्दकोशात, ऑगस्ट, ऑक्टोबर, बँक,बॅरिस्टर हे शब्द असेच छापले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९३० ते १९३७ या कालखंडात १७ विज्ञाननिष्ठ निबंध आणि २ काव्यं लिहीली आणि हे सर्व साहित्य किर्लोस्कर मासिकानं प्रसिध्द केलं. या सर्व साहित्यात अ ची बाराखडीच वापरली आहे. मीही ही बाराखडीगेल्या ४०-५० वर्षांपासून माझ्या सर्व लिखाणात वापरतो आहे. सावरकरांची ही दोन्ही पुस्तकं माझ्याजवळ आहेत…त्यांचा संदर्भ, मी नेहमी घेतो. ही पुस्तकं, दादरच्या शिवाजी अुद्यानाजवळ असलेल्या सावरकर स्मारकात विक्रीस ठेवलीआहेत.

मराठी विज्ञान परिषद, मुंबअी आणि विज्ञान प्रसार, दिल्ली यांच्या सहकार्यानं, अेप्रिल २०११ मध्ये, मराठीतील विज्ञान विषयक लेखन….कालखंड १८३० ते १९५० हा ग्रंथ, दोन खंडात प्रसिध्द केला. या कालखंडात, मराठीतून प्रसिध्द झालेले ९८१ लेख, खूप परिश्रमानं संकलीत करण्यात आले होते. आर्थिक मर्यादा असल्यामुळं, फक्त २० टक्केच लेख निवडावे असं ठरलं. यापैकी वैचारिक लेखांची निवड करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. तेव्हा माझ्याअसं लक्षात आलं की, सुमारे १९३० ते १९४० या कालखंडात, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि काही अितरही नामवंत लेखकांनी अ ची बाराखडी वापरली आहे. त्या काळी संगणक नव्हते. परंतू त्यांनी सुचविलेली ही बाराखडी आजच्या संगणकयुगात फार अुपयोगी आहे असं वाटतं. पण आता ती कुणीच वापरतांना आढळत नाही. असं का व्हावं कळत नाही.

आता ही अ ची चौदाखडी सर्व मराठी प्रेमीजनांनी हट्टानं वापरावी अशी माझी नम्र सूचना आहे. महाराष्ट्र शासन, वृत्तपत्रं, मासिकं, मराठी जाहिरातदार, मराठी शाळा वगैरेंनी ही चौदाखडी वापरावी. असं करण्यानं होणार आहे… मराठी लिपीसमृध्दी.

डोळ्यांना आणि मेंदूला, या बाराखडीची सवय, लवकरच होते. आपणही हीच अक्षरचिन्हं वापरावीत.

ही अक्षरचिन्हं वापरून तयार झालेले काही शब्द ……

अिंद्र, अिन्द्र, अिंदिरा, अिन्दिरा, अितक्यात, अितीहास, अिच्छा ….अिंडिया.

मुंबअी, आअी, अीश्वर, अीशस्तवन, अीशान्य, अीर्षा, अीशान, अीशा ….

अुत्तर, अुपकार, अुपवन, अुकळणं, अुचापत्या, अुंच, अुंट, ….

अून, अूब, अूर, अूस ….

अेक, अेकवीस, अेकाअेकी, अेकादशी, अेकूण, अेकवीरा …..

अैरावत, अैतिहासिक, अैवज, अैवजी, अैहिक ….

 हे शब्द वाचतांना काही अडचण आलीलिहीतांनाही कठीण वाटणार नाही.

 

— गजानन वामनाचार्य 

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 84 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..