बॉम्बे टू गोवा चित्रपटाला ४६ वर्षे पूर्ण

रिलीज डेट : ३ मार्च १९७२
एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील ‘देखा ना हाय रे सोचा ना हाय रे’ हे गाणं. १९७२ साली मेहमुद यांनी त्याचा भाऊ अनवर अली व अमिताभ बच्चन यांच्या साठी एस. रामनाथन यांच्या निर्देशनाखाली यांच्यासाठी नितांत सुन्दर कॉमेडी बॉम्बे टू गोवा हा सिनेमा कढला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, महमूद, अनवर आली, नासीर हुसेन, शत्रुघ्न सिन्हा, केष्टो मुकर्जी, ललिता पवार, मनोरमा, मुकरी, सुंदर, किशोर कुमार या सारखे कलाकार होते. या सर्वानी चित्रपटात जो धुमाकुळ घातला आहे तो अप्रतिम, केष्टो यांचे नशेत गाडी लोटणे, ललिता पवार यांचे अंगात आलेली बाई लाजबाब. या चित्रपटातील गाणी …”देखा ना हाये रे सोचा ना हय रे रख दी ‍निशाने पे जान ल ल ल लला .. कदमो पे तेरे निकले मेरा दम…..है बस यही अरमान ….” किशोर कुमार यांची अप्रतिम गाणी ….एव्हरग्रीन फ्रेश .. ‘ किशोर कुमार व लताजी यांची दोंन गाणी …”तुम मेरी ज़िंदगी मे कुच इस तराह से आये …” ‘दिल तेरा है मे भी तेरी हु सनम ..तेरे सर की कसम हो सनम, गीतकर राजेन्द्र कृष्ण, संगीत राहुल देव बर्मन यांची सर्व गाणी लोकप्रिय.
शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, पंचम आणि किशोर कुमार यांनी त्याच्या अभिनय कौशल्याने सुपर हिट केलेला “ऑल टाइम ग्रेट” ” बॉम्बे टू गोवा” आजही हा सिनेमा बघावा ….एकदम ताजे तवाने झाल्या सारखे वाटते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेटसंजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1749 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…