नवीन लेखन...

किरणोत्सर्ग

जपानमधील फुकुशिमा येथे दाईची अणुप्रकल्पात भूकंप व सुनामीमुळे अणुभट्टीचे मेल्टडाऊन झाल्याने किरणोत्सर्ग तेथील पर्यावरणात पसरत आहे. कुठल्याही अणुऊर्जा प्रकल्पात अस्थिर अणू असलेली किरणोत्सारी समस्थानिके वापरली जात असतात. त्यातून आयनांच्या स्वरूपात जे सूक्ष्म कण बाहेर पडत असतात त्यालाच किरणोत्सर्ग (रेडिएशन) असे म्हणतात. […]

कार्बन आणि बेरियम तारे म्हणजे काय?

विश्वात रासायनिकदृष्ट्या वैविध्य बाळगणारे विविध प्रकारचे तारे असतात. त्यापैकी ‘कार्बन तारे’ हा एक प्रकार आहे. हे तारे आपल्या आयुष्यातील अखेरच्या टप्प्यांत शिरल्यामुळे राक्षसी आकार प्राप्त झालेले तारे असून, त्यांचे तापमान दोन हजार ते पाच अंश सेल्सियसच्या दरम्यान असते. या ताऱ्यांच्या वातावरणात कार्बनच्या ‘काजळी’ चे प्रमाण जास्त असते. त्यांच्या वातावरणात कार्बन मोनॉक्साईडही आढळतो. या ताऱ्यांचा शोध पिएत्रो अँजेलो सेखी या इटालिअन वैज्ञानिकाने इ. स. १८६० साली वर्णपटशास्त्राच्या साहाय्याने लावला. विसाव्या शतकातील संशोधनातून अनेक कार्बन ताऱ्यांतील कार्बनचे मूळ हे त्या ताऱ्यांच्या गाभ्यात घडणाऱ्या अणुगर्भीय क्रियांत असल्याचे स्पष्ट झाले. […]

संस्कारित जीवन

भारतीय संस्कृतीनं जीवनाच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. हा विचार करताना या संस्कृतीचे पाय सदैव जमिनीवर राहिले आणि म्हणूनच ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ । असा संपूर्ण विरक्तीचा विचार या संस्कृतीनं दिला असला तरी त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनाचा, जीवनातल्या सुख-सुविधांचा तिरस्कार तिनं शिकवला नाही. माणसाच्या ऐहिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं वैभव या साऱ्यांची तिला जाण आहे व म्हणूनच ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस ‘ असे जीवनाचे दोन्ही भाग तिनं गौरवले आहेत. […]

नोबेल पारितोषिकं – २०२३

सन २०२३ची नोबेल पारितोषिकं नुकतीच जाहीर झाली आहेत. यांतील भौतिकशास्त्रातलं पारितोषिक अणूंतील इलेक्ट्रॉनसंबधीचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, प्रकाशस्पंदांच्या निर्मितीसाठी दिलं जाणार आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक नॅनोतंत्रज्ञान ज्यावर आधारलेलं आहे, त्या अतिसूक्ष्मकणांच्या निर्मितीवरील संशोधनासाठी देण्यात येणार आहे. […]

अणुभट्टी (न्यूक्लिअर रिअॅक्टर)

इंग्लंडमधील कुम्ब्रिया येथे १९५८ मध्ये काल्डर हॉल भागात पहिला अणुशक्ती प्रकल्प तयार झाला, तेव्हापासून मानवाने अणूपासून फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण केली आहे. काही अणू हे स्थिर असतात, पण काही अस्थिर अ असतात. त्यांना किरणोत्सारी समस्थानिके म्हणतात. […]

अग्नीचा शोध

अग्नीचा शोध लागण्यापूर्वीचा आदिमानव शिकार करून मिळेल ते जनावर किंवा पक्षी फाडून कच्चाच खात असे. एकदा मांसभक्षणाची सवय लागल्याने मग त्याला दुसरे काही आवडत नसणार. आजच्यासारखे मांसाहारी आणि शाकाहारी गट तेव्हा निर्माण व्हायचे काही कारणच नव्हते. […]

आपलं स्वयंपाकघर.. भाग दोन

कामाच्या गर्दीत अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे एखादे काम किंवा पदार्थ पूर्ण झाल्यावर आपण हात धुतो. लगेच पुढचं काम वाट पाहात असतं अशावेळेस दोन्ही ओले हात पायाच्या दोन्ही बाजूंकडे साडीला, गाऊनला किंवा ड्रेसला पुसले जातात. कधी ते हात हळदीने पिवळसर झालेले असतात किंवा धुतलेले असले तरी त्यावर तेला-तूपाचा अंश असतो. […]

भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन

डॉ. झाकीर हुसेन अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरूही होते. १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. १९६७ मध्ये ते भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले. […]

अश्रुधूर (टीअर गॅस)

दिल्लीच्या रामलीला मैदानावर योगगुरू रामदेवबाबा यांचे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, त्याला टीअर गॅस असेही म्हणतात. दंगल नियंत्रणाच्या वेळी जमावाला पांगवण्यासाठीही अश्रुधुराचा वापर केला जातो.अश्रुधुराला लॅक्रिमेटर असेही म्हणतात. […]

पाण्याऐवजी पारा?

एकदा विचारेकाका, वहिनी आणि त्यांची काही मित्रमंडळी उंच डोंगरमाथ्यावरच्या थंड ठिकाणी सहलीला गेले. तिथे गेल्यावर चहासाठी आधण ठेवले गेले. पाणी उकळताना पाहिल्याबरोबर, विचारेंच्या डोक्यातला किडा वळवळू लागला. त्यांनी आपल्या बॅगेतला थर्मामीटर बाहेर काढला. पाणी उकळतंय म्हणजे त्याचे तापमान १०० अंश सेल्सिअस असले पाहिजे. […]

1 33 34 35 36 37 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..