नवीन लेखन...

पश्चाताप – एक जाणीव !

चुका करणे हा मानवी स्वाभव. परंतु त्याची  तीव्रतेने जाणीव होणे हा निसर्ग. त्याला मानणे हे त्या दुष्ट चक्रातून केलेले  बचवात्मक  समाधान.  […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३५

अकंठेकलंकादनंगेभुजंगाद- पाणौकपालादफालेऽनलाक्षात् | अमौलौशशांकादवामेकलत्राद- हंदेवमन्यं न मन्ये न मन्ये ‖ ३५ ‖ एखाद्या कवीच्या प्रतिभेला अचानक बहर येतो. एखादी सुंदरतम कल्पना साकार होते. ही कल्पना इतकी रम्य असते ती स्वतः कवीच तिच्या प्रेमात पडतो. पुन्हा तशीच रचना करण्याची स्वाभाविक ऊर्मी जागृत होते. या सिद्धांतानुसार तयार झालेला हा श्लोक. आचार्यश्री म्हणतात, अकंठेकलंकात्- ज्यांच्या गळ्याला कलंक म्हणजे डाग […]

फूलपाखरे नि फुले

रंगबिरंगी सुंदर ठिपके,  पंखावरी आकर्षक छटा त्या,  मनास मोहीत करी…१, नृत्य पहा कसे चालते,  तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती,  फुलाफुला वरूनी…२, नृत्याचे आंगण त्यांचे,  ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या,  दरवाळताती सुवासिक…३, दोघांमधली चढाओढ,  नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

ज्ञात अज्ञात पंढरपूर १ – चंद्रभागा मंदिर

पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० टाळकरी उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर. मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही. गावकऱ्याना हे मंदिर चंद्रभागेचे आहे हे ज्ञात नाही तर महाराष्ट्र अन् परराज्यातील गावोगावातून भक्तांना काय कळणार? […]

आधार

वेलींना आधार होता,  वृक्ष वाटला दणकट परि बुंधा ज्याचा किडूनी गेला,  कोसळणार मग कधीतरी  १ नष्ट करिल तरूवेलींना,  धरणीवरती आडवा होता सौंदर्य दिले लताफूलांनी,  सारे कांहीं विसरूनी जाता  २ वेलींनो आणि झुडपानों,   सोडूनी घ्या आधार पोकळ स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,  स्वावलंबनाचे टाका पाऊल  ३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

वाढदिवस की घटदिवस

इंग्रज गेले पण कांही भंपक पध्दती सोडून गेले. कोशल्येने रामाचा वाढदिवस साजरा केल्याची कथा ना वाल्मिकींना सुचली ना गदिमांना सुचली. कॉंव्हेंटमधल्या मुलांना रामनवमी म्हणजे लॉर्ड रामाचा हॅपी बर्थडे येवढेच शिकवले जाते. […]

निरंजन – भाग १८ – निंदा

एखाद्याने केलेली निंदा ही ऐकणार्‍याने सकारात्मकतेने ऐकली तर बरे… नाहीतर एखादी व्यक्ती आधीच स्वत:च्या विचारांनी व्यापलेली असेल तर्…काही चांगले न होता त्याच्याकडुन बरेच असे वाईट घडुन जाते. म्हणुनच खरेतर ही म्हण “निंदकाचे घर नसावे शेजारी” अशी असायला हवी.  […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३४

अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि प्ररोहै- रवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः | अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै- रचंद्रार्धचूडैरलं दैवतैर्नः ‖ ३४ ‖ भगवान श्री भोलेनाथच्या ठायी असणाऱ्या अनन्य शरणतेला व्यक्त करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्री शंकरांच्या विविध वैभवांचे वर्णन करीत आहेत. या वैभवांनी युक्त असे भगवान शंकर माझे दैवत आहे ही सांगण्याची त्यांची पद्धत मोठी मनोज्ञ आहे. ते म्हणतात, अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि- ज्यांच्या मस्तकावरील डोळ्यामधून […]

जागृत आंतरात्मा

कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी, न ऐकीली कधीही हाक तयाची कानी ।।१।।   चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी, नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।।   निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले, प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजिले ।।३।।   नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले, निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।।   तोच अचानक जाग […]

प्रवाही जीवन

वाहत असते जीवन सारे, वाहणे जीवनाचा गुणधर्म, स्तब्ध राहता जीवन आपले, कसे घडेल हातून कर्म ।।१।।   वाहत होते, वाहत आहे, भविष्याते वहात जाईल, सतत चाले ही प्रक्रिया, जीवन करण्यास सफल ।।२।।   आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो, निर्जीव वस्तूसुद्धा प्रवाही, अणूची ती बनली असूनी, प्रचंड हालचाल आत होई ।।३।।   अणूत असूनी तीन भाग, अतिशय वेगाने […]

1 6 7 8 9 10 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..