नवीन लेखन...

हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ?   खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ?   पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेवून ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां […]

कळसूत्री बाहुल्या

नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे  । टकमक पाहात हांसत  होत्या,  चोहीकडे  ।। झीम्मा खेळे, फुगडी खेळे,  गरगर फिरती  । हातवारे करुन त्या,  माना डोलावती  ।। जवळ येवून गुजगोष्टी,  सांगे एकमेकींना  । सासू नणंद यांच्या,  कुलंगड्या काढतांना  ।। सुख दुःखाच्या कथा,  सांगितल्या त्यांनीं  । कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी  ।। अज्ञानी गरीब बिचाऱ्या,  जेंव्हा संकल्प करती  […]

जागतिक व्याघ्र दिन

जागतिक व्याघ्र दिन हा दरवर्षी २९ जुलैला साजरा केला जातो. हा दिवस खास , जगभरातील वाघांचे संगोपन आणि संरक्षण व्हावे तसेच ह्यांची कमी झालेली संख्या वाढावी ह्या हेतूने साजरा केला जातो. हा दिवस पहिले साजरा केला गेला सेंट पिटर्सबर्ग (रशियातील एक शहर) येथे आणि वर्ष होते २०१०. वाघाच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करणे , जागतिक जागरूकता वाढविणे […]

श्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १०

स्थित्वा स्थाने सरोजे प्रणवमयमरुत्कुण्डले सूक्ष्ममार्गे शान्ते स्वान्ते प्रलीने प्रकटितविभवे ज्योतिरूपे पराख्ये । लिड्गज्ञे ब्रह्मवाक्ये सकलतनुगतं शड्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१०॥ येथे भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज ध्यान मार्गाच्या अंतिम अवस्थेचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, स्थित्वा स्थाने सरोजे – ब्रह्मरंध्रामध्ये असणाऱ्या सहस्त्रदल कमला मध्ये स्थिर होऊन, प्रणवमय […]

श्रेष्ठत्वात न्युनता विसरते

विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग   नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते   अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी   सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार   आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच लक्ष्य […]

राष्ट्रीय दुधयुक्त चॉकलेट दिवस

१०० पैकी ८०% लोकांना हा खाऊ म्हणजे जीव की प्राण असतो. आज अशा चॉकलेटची आठवण काढण्याचे खास कारण आहे. आज दिनांक २८ जुलै ! आजचा दिवस राष्ट्रीय दुग्धयुक्त चॉकलेट ( National Milk Chocolate Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस United Kingdom (UK) मध्ये साजरा केला जातो. […]

श्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – ९

नग्नो निःसड्गशुद्धस्त्रिगुणविरहितो ध्वस्तमोहान्धकारो नासाग्रे न्यस्तदृष्टिर्विदितभवगुणो नैव दृष्टः कदाचित् । उन्मन्यावस्थया त्वां विगतकलिमलं शड्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥९॥ भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना आचार्य श्री येथे त्यांच्या काही विशेषणांचा उल्लेख करीत आहेत. ते म्हणतात, नग्नो- ज्यांचे मायारूपी वस्त्र गळून गेले आहे, ज्यांच्यावर कशाचेच आवरण पडूच शकत नाही, त्यांना […]

अर्पण

आशिर्वाद श्री जगदंबेचा,  सहवास तुझ्या स्फूर्तीचा रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला   १ विचारांच्या उठल्या लहरी,  शब्द जुळता काव्या परी कविता रूप धारण करी,  ती अर्पितो मी तुजला   २ प्रभूचा असावा सहवास,  हीच अंतर्मनातील आंस विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला   ३ प्रभू नसे जन्ममरण व्यथा,  अवतारास संबोधूनी जन्मकथा भावनेस व्यक्त करी कविता,  ती […]

सार्थकी जीवन

सारे जीवन जाते, आपले अन्न शोधण्याकडे, काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।।   जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे, आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।।   धडपड करी आम्ही, सारी देह सुखासाठी, विचार ही मनांत नसतो, इतरांच्या करिता ।।३।।   वेळ काढावा जीवनातुनी, इतरांसाठी थोडा, सार्थकी लावा आयुष्य तुम्ही, जीवन शिकवी धडा […]

मृत्युंजय

मंत्रोच्चारयुक्त जप हा झाला आध्यात्मीक उपासनेचा एक भाग.मनुष्य जेव्हा रोग व्याधींनी त्रस्त होतो तेव्हा त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज भासते व तो दैवी शक्तीच्या उपासनेकडे वळतो.आपणास आरोग्य देतो “सुर्य “व मारक शक्ती ही त्याचाच पुत्र “यम “याकडे असते.त्या दोघांचा कर्ता शिव.म्हणुनच त्यांच्या कृपेच्या अपेक्षेत गायत्री व मृत्युंजय मत्रांचे अनन्य महत्व आहे.मृत्यु अटळ असला तरी त्याच्या अनुषंगाने अवती- भोवतीच्या स्नेहजनांना येणार्या भितीवजा वलया ला सुसह्य करता आले तरी तो जणु मृत्यूवर विजयच म्हणजे “मृत्यूंजय” ह्या कल्पनेवर आधारित प्रस्तुत लेखात विद्यमान परिस्थीतीचा आढावा घेत विविध दृष्टीकोनांना हाताळीत, मृत्युनंतर काय ह्या प्रश्नचिन्हाला अलगद स्पर्श केला आहे. […]

1 2 3 4 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..