नवीन लेखन...

राष्ट्रीय दुधयुक्त चॉकलेट दिवस

 

लहानपणी आपलं रडणं शांत करण्यासाठी किंवा आपण खास एका जागी बसण्यासाठी हा खाऊ हमखास मिळायचा. Yes Right ! मी त्याच चॉकलेट बद्दल बोलत आहे ज्याने संपूर्ण तोंड , कपडे चॉकलेटी रंगाने माखायचे. हा एक असा खाऊ आहे , जो लहान मुलांच्या खिशात , मोठ्यांच्या बॅगेत किंवा खिशात आणि मुली, बायकांच्या पर्समध्ये हमखास आढळतो. १०० पैकी ८०% लोकांना हा खाऊ म्हणजे जीव की प्राण असतो. आज अशा चॉकलेटची आठवण काढण्याचे खास कारण आहे. आज दिनांक २८ जुलै ! आजचा दिवस राष्ट्रीय दुग्धयुक्त चॉकलेट ( National Milk Chocolate Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस United Kingdom (UK) मध्ये साजरा केला जातो.

मंडळी ह्याचा इतिहास काहीसा असा आहे. मिल्क चॉकलेटचा शोध लावणारा डॅनियल पीटर ह्याचा जन्म १८३६ मध्ये सुंदर , डोंगराळ स्वित्झर्लंडमधील वाऊडच्या कँटन येथे असलेल्या मौदोन गावात झाला. पीटर शाळेत शिक्षण घेत तिथेच पदवीधर झाला.

नंतरच्या काळात डॅनियलने , स्वित्झर्लंडमधील वेवे येथे स्थायिक झालेल्या हेन्रीशी नेस्लेशी घनिष्ट मैत्री केली. तो काळ १८४३ चा काळ होता. नेस्टलेने खास बाळांसाठी असलेला खाद्यपदार्थ (baby food) बनवण्याची प्रक्रिया विकसित केली होती , ज्याला पुढे ‘ दुधाळ पावडर ( milky flour ) ‘ असं नाव दिलं गेलं. इथेच डॅनियलच्या मनात प्रश्न उपस्थित झाला की , “आपण दूध असलेल्या चॉकलेट बनवण्याचा प्रयत्न का करत नाही ?” ही कल्पना त्याच्या मनात तोपर्यंत राहिली जोपर्यंत त्या कल्पनेचं ध्यासात रूपांतर झालं नाही. पुढे त्याच्या ही गोष्ट लक्षात आली की , चॉकलेट बाजार क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्याला एका नवीन चॉकलेट प्रॉडक्टला बाजारात आणणं गरजेचं आहे जे ग्राहकांनी आवडीने सेवन केले पाहिजे आणि वेळोवेळी त्याची मागणी केली पाहिजे. कारण त्यावेळी मार्केट कॅलर , सुचर्ड , कोहलेर आणि इतर माणसांच्या अधिपत्याखाली येत होतं.

हे सर्वांनी लक्षात घ्यावे की २० व्या दशकाच्या पूर्वार्धापासूनच युरोपमध्ये वेगवेगळ्या गुणधर्मांचे मिल्क चॉकलेट तयार करण्यात येत आहे.

संशोधनात असं आढळून आलं की , National Milk Chocolate Day Confectioner Association ने सुरू केला होता.

– आदित्य दि. संभूस

संदर्भ – माहितीजाल

फोटो गूगलवरून साभार

 

Avatar
About आदित्य संभूस 77 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..