नवीन लेखन...

श्री वेंकटेश सुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग १

ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते. […]

आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम !

नुकताच  दक्षिण  आफ्रिकेला  जाण्याचा  योग  आला  होता. निसर्गच वरदान लाभलेली  भूमी.  असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत  पसरलेली जंगले,  आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे. […]

कल्याणवृष्टिस्तव – ६

हन्तुः पुरामधिगलं परिपीयमानःक्रूरः कथं न भविता गरलस्य वॆगः । नाश्वासनाय यदि मातरिदं तवार्धं देहस्य शश्वदमृताप्लुतशीतलस्य ॥ ६ ॥ आई भगवतीच्या साहचर्याचा अद्भुत वैभवशाली परिणाम सांगताना आचार्यश्री समुद्रमंथन प्रसंगाचा संदर्भ घेतात. अमृताच्या प्राप्तीसाठी झालेल्या या समुद्रमंथनात त्या मेरू पर्वताच्या भोवती गुंडाळलेल्या वासुकी सर्पाने ती पीडा सहन न झाल्याने भयानक गरळ ओकले. जोपर्यंत हे कोणी घेणार नाही तोपर्यंत […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १२

दोन्ही गाड्या थांबलेल्या पाहून निशा आणि रोहन बाकावरून उठून तिकडे जावू लागले.  ऍम्ब्युलन्स मधून दोन माणसं उतरली. त्यांनी ऍम्ब्युलन्सचे मागचे दार उघडून त्यातून एक स्ट्रेचर बाहेर ओढून काढला आणि ते रस्त्याच्या कडेला झाडीत शोधू लागले. तोपर्यंत एक डॉक्टरही  खाली  उतरले.  त्या दोन लोकांच्या मागोमाग तेहि झाडीत खाली उतरू लागले. […]

कोरोना ‘चक्रव्यूह’

कुरुक्षेत्रावर द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अर्जुनपुत्र अभिमन्यू जसा असाह्य झाला होता, तीच हतबलता आज आपणही अनुभवतो आहोत. अभिमन्यूला कौरवांनी गरडा घातला होता, आपल्याभोवती कोरोनाचा विळखा आवळला जातोय. फरक इतकाच की, अभिमन्युला चक्रव्यूह भेद करण्याचं तंत्र अवगत नव्हतं त्यामुळे तो ते छेदून बाहेर पडू शकला नाही. आपल्याला ते ज्ञात आहे. परंतु, ते तंत्र वापरण्यास लागणारं ‘संयमा’स्त्र काहीसं बोथट झाल्याने आपली शिकस्त होतांना दिसतेय. […]

सर्व वेळ प्रभूसाठी

लक्ष आपले जात असते, सदैव प्रभूकडे, मार्ग सारे ठरलेले, जे मिळती तिकडे ।।१।।   ‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो, प्रथम मुखातून, जन्मताच तो प्रश्न विचारी, “मी आहे कोण?” ।।२।।   मार्ग हा तर सुख दु:खाने, भरला आहे सारा, राग लोभ मोह अंहकार, याचा येथे पसारा ।।३।।   वाटचाल करिता यातून, कठीण होवून जाते, जीवन सारे […]

कल्याणवृष्टिस्तव – ५

ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाःमातस्त्रिकॊणनिलयॆ त्रिपुरॆ त्रिनॆत्रॆ । त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः ॥ ५ ॥ कोणत्याही देवतेच्या उपासनेत तंत्र, मंत्र आणि यंत्र अशा तीन गोष्टी असतात. त्या उपासनेचे जे शास्त्रशुद्ध नियम, पद्धती, परंपरा त्यांना तंत्र असे म्हणतात. या देवतेचे निर्गुण-निराकार स्वरूप ज्याच्या चिंतन-मननातून व्यवस्थित समजून घेता येते त्याला मंत्र असे म्हणतात. तर त्या […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ११

निशाने त्याच्या हाताला जोरात हिसडा दिला, “Please रोहन, तू माझ्या अंगाला हात लावू नकोस. आणि माझ्या मागेही येऊ नकोस.  मला तुझं काहीच ऐकायचे नाही. जाऊदे मला. Don’t touch me, Don’t touch me” […]

डोक्याला खुराक …डायरी रायटिंग ( बेवड्याची डायरी – भाग २१ वा )

सरांनी डायरीत लिहायला सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..मात्र सुरवातीला काहीच सुचेना ..कॉलेजनंतर सुमारे २० वर्षांनी काहीतरी लिहिण्यासाठी वही घेवून बसावे लागले होते इथे ..लिहिण्याची सवय मोडलेली होती ..तसेही मला लिहायचा कंटाळा होता […]

नाशाची वृत्ती

जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी स्वभावाची ही विकृती जाणता,  खंत वाटली मनी बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी,  देतो ते फेकून हाती देता सुंदर खेळणी,  तोड मोड करिते लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते लय पावणे प्रतिक शिवाचे,  ईश्वरी असतो गुण ‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव,  हे घ्या तुम्ही जाणून. डॉ. […]

1 5 6 7 8 9 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..