नवीन लेखन...

डोके ज्याचे त्याचे

झिरो कट ! आता पुन्हा या फॅशनची चालती आहे ! कानाच्या वर चार बोटाच्या पट्ट्यातले केस या कानापासून व्हाया मानगूट ते त्या कानापर्यंत झिरो मशीनने काढून टाकतात. ट्रॅकटरने शेत नागरल्यासारखं दिसत ! त्यात एक ठळक पाय वाट पण बरेचदा केली जाते ! टाळू वर केसांचं ‘ओयासिस’ तसेच ! या ‘ओयासिसचे पुन्हा व्हेरिएशन्स आहेतच, मागे, पुढे नायतर उभे शिंगा सारखे ! […]

हार-जीत बनुनी बघ

मित्रांनो, “हार-जीत बनुनी बघ ” ही मराठी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे. subscribe me : https://www.youtube.com/channel/UCWg4s4JepryoGlUdgiAFttQ

प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर

प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म २४ जुन १८९७ रोजी गुजराथ मधील भंडारण जिल्ह्यातील जहाज या गावी झाला. पंडित ओंकारनाथ ठाकुर हे ग्वाल्हेर घराण्याचे एक प्रसिद्ध गायक होते. ओंकारनाथजी चौथे व शेवटचे अपत्य. ओंकारनाथजींचे बाल आयुष्य अतिशय कष्ट, गरिबी व हालअपेष्टांनी भरलेलं होते. ओंकारनाथ ठाकूर यांचे आजोबा पं. महाशंकर ठाकुर व वडिल पं. गौरीशंकर हे […]

मराठी माध्यमातून शिक्षणाकडे पालकांचा वाढता कल : एक सुचिन्ह

आपण मराठी म्हणून ओळखले जाण्यात आपल्या भाषेचा मोठा भाग असतो. आपलं समाजातील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपली भाषा टिकवणं क्रमप्राप्त होतं आणि हे टिकवण शालेय शिक्षणातूनच जास्त शक्य होतं. म्हणून आपल्या मुलांचं किमान प्राथमिक शिक्षण आपल्या मातृभाषेतून होणं आपल्यासाठी आणि त्या मुलांसाठीही महत्वाचं असतं. […]

वाहतो ही दुर्वांची जुडी – अजरामर मराठी नाटक

लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे एक लोकप्रिय व गाजलेले नाटक. बाळ कोल्हटकर म्हणजे महाराष्ट्राचे छोटे गडकरी म्हणून रसिकांनी गौरविलेले व्यक्तिमत्व. १९ जून १९६४ साली भावे नाटयगृह, सांगली येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, ते आजतागायत नाटक रसिकांच्या पसंतीस उतरलेले आहे. अभिनेत्री आशा काळे, गणेश सोळंकी व सुभाष हे पात्र अजरामर केलेले बाळ कोल्हटकर यांनी त्या काळात […]

भारतीय लोकशाही : दशा आणि दिशा – भाग २

आपली लोकशाही हि जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे म्हटले जाते. कायद्याच्या मुद्द्यावर ते बरोबरही आहे. परंतु बारकाईने पाहिल्यास आपल्या देशात लोकशाही आहे का, हा प्रश्नच आहे. गेल्या काही वर्षात आपला देश राजकीय घराणेशाहीने ग्रासलेला दिसतो. काही मोजके पक्ष सोडण्यास, याला कुणीही अपवाद नाही. […]

अभिनेता भारत भूषण

भारत भूषण यांना लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायची आवड होती. त्यांचा जन्म १४ जुन १९२० रोजी उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात झाला.पण त्यांच्या वडिलांना ते पसंत नव्हते म्हणून मग त्यांना घर सोडावे लागले. चित्रपटांमध्ये काम करायच्या उद्देशाने भारत भूषण कलकत्याला निघून गेले. त्यावेळेला तेथे मोठमोठे चित्रपट बनत होते. तेथे त्यांना संघर्ष करावा लागला. एक दिवस त्यांच्या कष्टाचं चीज […]

सिने-अभिनेत्री किरण खेर

१९८८ सालच्या पेस्तनजी ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या किरण खेर यांनी देवदास, हम तुम, वीर-झारा, फना, रंग दे बसंती, कभी अलविदा ना कहना, ओम शांती ओम इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १४ जून १९५५ रोजी झाला. १९८५ साली किरणने बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सोबत विवाह केला. २००९ मध्ये किरण खेरने भारतीय […]

भारतीय बनावटीचे एकमेव ऑर्गन उत्पादक उमाशंकर दाते

उमाशंकर उर्फ बाळा सुरेश दाते यांचे शिक्षण १२ वी आर्टस पर्यंत. त्यांचा जन्म १४ जून १९७६ रोजी कोकणातील आडिवरे येथे झाला. बाळा दाते यांचा वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत संगीताशी तसा संबंध नव्हता. पण १९९४ साली उदय गोखले यांचे श्री. महाकाली मंदीरात भजन होते ते गाणं ऐकताना या सुरांशी आपले काहीतरी अनामिक नाते आहे याची त्यांना पहिली […]

1 2 3 4 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..