Web
Analytics
वाहतो ही दुर्वांची जुडी – अजरामर मराठी नाटक – Marathisrushti Articles

वाहतो ही दुर्वांची जुडी – अजरामर मराठी नाटक

लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे एक लोकप्रिय व गाजलेले नाटक. बाळ कोल्हटकर म्हणजे महाराष्ट्राचे छोटे गडकरी म्हणून रसिकांनी गौरविलेले व्यक्तिमत्व.

१९ जून १९६४ साली भावे नाटयगृह, सांगली येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, ते आजतागायत नाटक रसिकांच्या पसंतीस उतरलेले आहे. अभिनेत्री आशा काळे, गणेश सोळंकी व सुभाष हे पात्र अजरामर केलेले बाळ कोल्हटकर यांनी त्या काळात दोन हजाराच्या वर प्रयोग केले होते. आज त्या नाटकाला ५० पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली आहेत.

१९६४ साली हे नाटक पहिल्यांदा सादर केले गेले. त्यावेळी त्याने लोकप्रियतेचे उच्चांक निर्माण करत चौदाशे प्रयोगांची मजल गाठली होती. त्यानंतर १९८४ साली विजय गोखले आणि निवेदिता जोशी-सराफ यांनी हे नाटक सादर केले होते. या नाटकाचा लूक साठीतला असला तरी अभिनयाची शैली आजची आहे. त्यामुळे आजच्या पिढीलाही हे नाटक आपलेसे वाटून ते भारावून जातात, बाळ कोल्हटकर यांचे लेखन मुळातच खूप सुंदर आहे. त्यांच्या दोन-दोन ओळींच्या कविता खूप गहन अर्थ सांगून जातात.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

मराठी मनाची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य या नाटकात आहे. मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातील ही एक अत्यंत हृदयद्रावक कहाणी अतिशय घरगुती घटनेत आणि भाषेत मोठ्या नाट्यपूर्ण पद्धतीने लेखकाने सांगितलेली आहे! प्रत्येक पात्र आपल्याला इतके परिचयाचे वाटते की, ते कुठे न कुठे आपण पाहिले आहे असाच एकसारखा भास होत रहातो! असे असूनही त्या त्या पात्राचे वैशिष्ट्य अगदी ठळक शब्दात चितारून लेखकाने नाटकाच्या मनोरंजकतेत आणि आकर्षतेत चैतन्य निर्माण केले आहे.”

— आचार्य अत्रे यांच्या प्रस्तावनेतून

 

https://www.youtube.com/watch?v=mK8ZIUiW7iIसंजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1758 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

कोकणचा मेवा – ओळख

उन्हाळा लागला की समुद्र किनाऱ्याची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले कोकणाकडे ...

पुणे जिल्ह्यातील रोहीडा किल्ला

शिवकालात रोहीडय़ाचा किल्ला दुय्यम होता. तसेच इतिहासमधेही फारशी मोठी घटना ...

Loading…