नवीन लेखन...

जे होतं, ते चांगल्यासाठीच’..

‘जे होतं, ते चांगल्यासाठीच’ असं आपल्यात म्हणतात. कादचित जर काही वाईट किंवा मनाविरूद्ध घडलं, तर वाईट वाटू नये किंवा मनाला फार लागू नये म्हणून असे वाक्प्रचार आपल्या सांस्कृतीक पूर्वजांनी रुजवले असावेत, असं मला पूर्वी वाटायचं. पण आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्या संस्कृतीत रुजवलं, त्यामागे त्यांचा काहीतरी अनुभव असावा हे नक्की, असंही मला आताशा वाटू लागलंय. सुरुवातीस […]

राष्ट्रप्रेम;व्यक्त करणं आणि दाखवणं-

मन कि बात.. चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभं राहाण्याची गरज नसल्याचा निर्वाळा काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. असा निर्वाळा देताना सर्वोच्च न्यायालयाने सन २०१६ साली चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती करण्याविषयी स्वत:च दिलेल्या निर्णयातील शब्दरचना बदलण्याची तयारीही दर्शवली. दि. १ डिसेंबर २०१६ साली सर्वोच्च न्यायालयानेच देशातील सर्व चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जावे व त्याप्रसंगी यर्व उपस्थितांनी उभं राहायला […]

‘उद्याचा मराठवाडा’ दिवाळी अंक २०१७

या दिवाळी अंकात माझा ‘सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्यातील राजकीय नेतृत्व’ या विषयवार लेख प्रसिद्ध झाला आहे. हा विषय मला देण्यात आला होता. सदर दिवाळी अंकात महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय नेतृत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या अंकाचे संपादक श्री. राम शेवडीकर असून, प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार आणि साक्षेपी लेखक श्री. प्रवीण बर्दापूरकर या अंकाचे अतिथी […]

तीन महत्त्वाची तत्त्वे

इसापनीतीमधील ही एक कथा आहे. एकदा एका शेतकऱ्याने बुलबुल पक्ष्याचे गाणे ऐकले. ते त्याला इतके आवडले, की बुलबुलचे हे गाणे आपण कायम ऐकत राहावे असे त्याला वाटले. म्हणून त्याने त्या पक्ष्याला पकडायचे ठरवले. एके दिवशी रानात शेतकऱ्याने आपल्या पिकात जाळे लावले. बुलबुल पक्षी दाणे खायला म्हणून आला आणि नेमका त्या जाळ्यात अडकला. शेतकऱ्याने त्याला पकडून पिंजऱ्यात […]

पहिल्या भारतातील बोलपटाचे जनक अर्देशीर इराणी

अर्देशीर इराणी याचे पूर्ण नाव खान बहादूर अर्देशीर इराणी. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १८८६ रोजी झाला. अर्देशीर इराणी यांनी भागीदारीत १९१४ मध्ये लोहारचाळ येथे अलेक्झांड्रा थिएटर घेतले. अर्देशीर इराणी यांच्याकडे ‘युनिव्हर्सल पिक्चर्स कॉर्पोरेशन’ या विदेशी सिनेवितरण कंपनीची एजन्सी होती. तेथे ते विदेशी चित्रपट प्रदर्शित करत. तेथे लागणारे बहुतेक इंग्रजी चित्रपट हे हाणामारीने भरलेले देमारपट, युध्यपट, स्टंट किंवा कामुक हावभावाचे […]

श्री के क्षीरसागर

श्री के क्षी. या नावाने प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक, विचारवंत श्री के क्षीरसागर यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९०१ रोजी सातारा जिल्ह्यातील पाली येथे झाला. सातारा जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावी शालेय शिक्षण पुरे करून त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४५ सालापासून त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकी केली. ते उर्दू शायरीचे अभ्यासक होते […]

प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर

हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी झाला. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या “प्रेमा तुझा रंग कसा’”’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा […]

हिंदी चित्रसृष्टीतील सशक्त अभिनेता म्हणून ज्यांना ओळखलेजाते अशा संजीव कुमार

संजीव कुमार या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले श्री हरिहर जरीवाला या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली. त्यांचा जन्म ९ जुलै १९३८ रोजी झाला. सुमारे २५ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी १५० पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ‘दस्तक’ आणि ‘कोशिश’ या चित्रपटांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. या […]

चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील

प्राथमिक शिक्षण तिथेच घेऊन पुढे मा.दिनकर पाटील हे माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. कोल्हापूरला ते आपल्या मामाकडे राहात. त्यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातील बेनाडी या गावात झाला. दिनकररावांचे वडील दत्ताजीराव हे कोर्ट-कचेरीच्या कामासाठी कायम फिरस्तीवर असत. कोल्हापुरात त्या वेळी राजाराम हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, सिटी हायस्कूल व विद्यापीठ हायस्कूल अशा शाळा होत्या. दिनकर द. पाटील […]

“गंधर्व भूषण” जयराम शिलेदार

जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानांतील राजघराण्यांतून मागणी असे. संगीताच्या सुरांशी या घराचा काहीही […]

1 14 15 16 17 18 20
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..