पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर

हिराबाई पेडणेकर यांच नाव आज विस्मृतीत गेले आहे. हिराबाई यांना साहित्याची फार आवड होती. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८८५ रोजी सावंतवाडी येथे झाला. हिराबाई यांनी आपलं सातवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यावर साहित्याचे धडे घेण्यासाठी खाजगी शिकवणी लावली. साहित्य आणि मराठी भाषेची आवड असल्यामुळे अल्पावधीतच त्यांनी मराठी भाषेत प्रभुत्व प्राप्त केले. मराठी साहित्याचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. मराठी […]

दमदार अभिनय आणि भारदस्त आवाज असलेले ओम पुरी

रंगभूमी असो किंवा समांतर सिनेमा, टीव्ही, बॉलिवूड, हॉलिवूडचा पडदा; भूमिका दहा मिनिटांची असो किंवा नायकाची; ती अजरामर करण्याची ताकद ओम पुरी यांच्याकडे होती. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाना मधील अंबाला येथे झाला. चेहरा देखणा नव्हता, पण दमदार अभिनय आणि भारदस्त आवाज, या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला होता. विशेष म्हणजे, या […]

तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे

विजय घाटे यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला शिकण्यास सुरवात केली. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६४ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. १२ व्या वर्षी त्यांनी तबलामधील विशारद पदवी मिळविली होती. वयाच्या १६ व्या वर्षी ते मुंबईत आले आणि बारा वर्षांहून अधिक काळ तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या कडे गुरुकुल पध्दतीत शिक्षण घेतले. वयाच्या १६ व्या वर्षीही ते […]

गीतकार शांताराम नांदगावकर

“हृदयी वसंत फुलताना’ यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला.सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर. मूळचे कोकणातील नांदगावचे असलेल्या शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. ‘पाहिले […]

सिंधूदुर्गातील “कांदळगाव” – ऐतिहासिक महत्त्व ..!

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कांदळगाव हे एक ऐतिहासिक गाव आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. मालवण एस.टी. स्टॅंड पासून अवघ्या ७ ते ८ कि.मी. अंतरावर असलेले कांदळगाव याला ऐतिहासिक महत्त्व आहे. कांदळगावचे श्री देव रामेश्‍वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा श्री देव रामेश्‍वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो. […]

कायम मनीं वसावा विठ्ठल

ध्यावा गानिं दिसावा विठ्ठल कायम मनीं वसावा विठ्ठल  ।। नच जाणत मी निर्गुण ब्रह्मा मजला केवळ ठावा विठ्ठल  ।। जगतीं ऊन नि खड्डे काटे वाटेवरी विसावा विठ्ठल  ।। अंध पुरा मी, मार्ग दिसेना तडफड ही – कवळावा विठ्ठल  ।। थांबायाचें जेव्हां हृदया तेव्हां मुखीं असावा विठ्ठल  ।। सुभाष स. नाईक Subhash S. Naik

मराठी चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी

मराठी मनोरंजन विश्वातला चॉकलेट हिरो म्हणून  प्रसिद्ध असलेल्या स्वप्नील जोशीचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७  रोजी मुंबईत झाला. स्वप्नील जोशीने वयाच्या नवव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे. स्वप्नील जोशीने श्रीकृष्णाच्या रुपात पहिली मोठी भूमिका केली; नंतर तो विविध भूमिकांत […]

1 18 19 20