नवीन लेखन...

फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ खलनायक प्रेमनाथ मल्होत्रा

प्रेमनाथ यांचे वडील रायसाहेब कर्तारनाथ यांची अशी इच्छा होती की, आपल्या मुलाने लष्करात सामील व्हावं. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२६ रोजी जबलपुर येथे झाला. ते स्वत: ऐकेकाळी रेवा स्टेटचे आय.जी.पी. होते. आपल्या मुलानेही प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन जगावं अशी त्याची भारी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रेमनाथला लष्करात पाठवलं सुध्दा, पण प्रेमनाथची स्वत:ची आवड वेगळीच होती. त्याला मुंबईच्या हिंदी […]

जेष्ठ कलाकार दादामुनी उर्फ अशोक कुमार

१९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर […]

तीन मूर्तींचे रहस्य

भोजराजा कलेचा भोक्ता असल्यामुळे त्याच्या पदरी अनेक विद्वान होते. कालिदासासारखे ‘नवरत्न’ही दरबारात होते. त्यामुळे दूरदूरहून आलेले अनेक कलावंत आपली कला सादर करायचे व राजाकडून बिदागी घेऊन जायचे. एकदा एक सुवर्णकार सोन्याच्या तीन मूर्ती घेऊन भोजराजाच्या दरबारी आला. त्या तिन्ही मूर्तीची किंमत वेगवेगळी होती. एका मूर्तीची किंमत होती दहा सुवर्णमुद्रा, दुसरीची होती शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसरीची होती […]

मराठी कवी, शाहीर अनंत फंदी

उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. अजूनही संगमनेर येथे दरवर्षी अनंत फंदी व्याख्यानमाला होत असते. अनंत फंदी यांचे आडनाव घोलप. हे यजुर्वेदी कौन्डिण्य गोत्री ब्राह्मण. यांचे पूर्वजांचा धंदा गोंधळीपणाचा व सराफीचाही होता. अनंत फंदी यांनी लावण्या बर्या च केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर अनंत फंदी यांनी तमाशा […]

अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी

मराठीत मोजक्याच अभिनेत्री अशा आहेत ज्या बालरंगभूमीवरून आल्या आहेत. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९ रोजी झाला. स्पृहा जोशी ही त्यातीलच एक अभिनेत्री आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून नाटक आणि मालिकांमध्ये कामे करत आहे. बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शालेय शिक्षण केले. स्पृहा जोशी हिला मानाचा समजला जाणारा बालश्री पुरस्कार २००३ साली मिळाली होता. अनेक एकांकिकांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या आणि […]

नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता

अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणा-या प्रतिभाशाली नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला. विजया मेहता उर्फ बाई हे नाव म्हणजे मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड आहे. फक्त मराठी रंगभूमीच नव्हे, तर हिंदी इंग्रजी नाटकं, दूरदर्शन, चित्रपट याही क्षेत्रांत मा.विजया मेहता वावरलेल्या आहेत. पण त्या खऱ्या रमल्या त्या नाटकातच. विजया मेहता […]

वक्तशीरपणाचे महत्त्व

ठरलेल्या वेळेत ठरलेली कामे व्यवस्थित पूर्ण करण्याचा अनेकांचा अट्टहास असतो. त्यालाच वक्तशीरपणा म्हणतात. जगातील अनेक मोठे नेते वक्तशीरपणाबद्दल फारच आग्रही होते. ते त्यांच्या कार्यपद्धतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे देखील त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल फार प्रसिद्ध होते. कोणतेही काम त्या-त्या वेळी पूर्ण करण्याचे बंधन त्यांनी स्वतःवर घालून घेतले होते. त्यामुळे वेळेच्या बाबतीत ते […]

नुसरत फतेह अली खान

कव्वाली, गझल, शास्त्रीय, पारंपारिक गायक म्हणून नुसरत फतेह अली खान यांनी जागतिक स्तरावर नाव मिळवले. नुसरत यांच्या आवाजाची जादू भारतावरही चालली. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९४८ रोजी पाकिस्तानमधील पंजाबच्या लायलपूर येथे पंजाबी मुसलमान कुटुंबात झाला. त्यांनी गायलेली ‘आफरीन आफरीन’, ‘मेरा पिया घर आया’, ‘पिया रे-पिया रे’, ‘सानू एक पल चैन ना आए’, ‘तेरे बिन’ अशी अनेक गाणी […]

शंकर जयकिशन या संगीतकारातील जोडीतील जयकिशन

जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. हा सुरांचा जादुगार! दुसरा शब्द नाही. जयकिशन लहानपणापासूनच ते हार्मोनियमवर गाणी वाजवत. सुप्रसिद्ध गुजराती दिग्दर्शक चंद्रवदन भट्ट यांच्याकडे संधीसाठी चकरा मारत असतानाच त्यांची गाठ शंकर (शंकरसिंह रघुवंशी) या आणखी एका होतकरू संगीतकाराशी पडली. शंकरही संधीच्या शोधात फिरत होते. जयकिशन त्या काळी पृथ्वी थिएटरसाठीसुद्धा काम करत. […]

मराठी साहित्यिक सुभाष भेंडे

गोव्यातील बोरी हे मा.सुभाष भेंडे यांचे गाव. त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३६ रोजी झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते. २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे […]

1 12 13 14 15 16 20
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..