नवीन लेखन...

एक यशस्वी मित्र

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रत्येक रविवारी दुपारी ३.३० ते ४.३० सादर होणाऱ्या ‘दुसरी बाजू’ ह्या मुलाखतीवर आधारित कार्यक्रमात श्री. विक्रम गोखले त्याच्याशी विविध विषयांवर गप्पा मारत असताना माझं मन आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलं आणि काही वर्षांपूर्वी लिहिलेला माझा हा लेख आपल्या सर्वांसमोर ठेवण्याची इच्छा झाली. एक यशस्वी मित्र ३० वर्षांपूर्वी एका भारतीय कंपनीत कृषी अधिकारी म्हणून मी […]

मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर

विश्राम बेडेकर आज मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांची पुण्यतिथी विश्राम बेडेकर यांचा जन्म १३ ऑगस्ट १९०६ रोजी झाला. नाटककार, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही ज्यांचे नांव आदराने, सन्मानाने घेतले जाते, त्या विश्राम बेडेकरांचे हे वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास प्रारंभ केला आणि नव्वदाव्या वर्षापर्यंत ते लिहीत राहिले असले तरी त्यांचे लेखन मोजकेच आहे. चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु […]

हे देवा म्हाराजा…..

बारा गावच्या, बारा वहिवाटीच्या, कुलदैवत आणि गावच्या ठिकाणदार म्हाराजा….. ……व्हय म्हाराजा sss… ह्या तुका बारा पाचाचा गाऱ्हाणा घालतय म्हाराजा ता तू पावन करुन घी रे म्हाराजा.. ……व्हय म्हाराजा sss… सध्या जो काय ह्यो ओळखीच्या मंडळीनी आपलो ग्रुप केलो आसा म्हाराजा…. ……व्हय म्हाराजा sss… जसे ग्रुप सुरू झाल्यापासना आजतागायत सर्व एकमेकांका जोडून ऱ्हवले हत म्हाराजा… ……व्हय म्हाराजा […]

काहीच्या काही – मधु आणि मधुमाशी

मला मधुमाश्यांची भयंकर भीती वाटते. कारण हि तसेच आहे, बालपणीची गोष्ट १२-१३ वर्षांचा असेल.  दिल्लीच्या बिर्लामन्दिराच्या मागे असलेल्या जंगलात मित्रांसोबत फिरत होतो. अचानक समोरून मधुमाश्यांचे भले मोठे सैन्य चालून येताना दिसते.  कुणीतरी बहुधा त्यांची खोड काढली असावी. पण मधुमाश्यांच्या न्यायच  अजब, गुन्हेगार कुणी का असेना, जो समोर दिसेल त्याला डसा. जीव मुठीत घेऊन पळालो. बहुधा उसेन […]

स्मृतिकाव्य : भेटूं या एकदा पुन्हां

प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या निधनाला  २०१६ च्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक वर्ष झालें.  त्यानिमित्तानें तिच्या स्मृत्यर्थ.   सहजीवन सरलें , तरि भंवती अजुन खुणा सखये, आपण भेटूं या एकदा पुन्हां   ।।   ठाउक होतें ‘सोडुन जाणें’, कां गेलिस पण नकळत ? भेट घडविली ज्या नशिबानें, तयेंच केलें आहत ! मला कळेना, मी भाग्याचा केला होता काय गुन्हा  ? […]

कॅन्सरच्या नवीन उपचार संशोधनांतील आयुर्वेदीय सिद्धांत !!

कॅन्सर; नाव घेताच धडकी भरवणारा रोग. जगभरात या रोगावरील उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालते. विशेष म्हणजे आशिया आणि त्यातही भारतात या रोगाने अन्य देशांच्या तुलनेत अगदी नजीकच्या काळापर्यंत जोर धरलेला नव्हता. पचनसंस्थेचे कॅन्सर तर आपल्याकडे आजही तुलनेत नगण्य आहेत. डीन ऑर्निश सारखे जगप्रसिद्ध आहारतज्ज्ञ याचे श्रेय आयुर्वेद आणि भारतीय पाकशास्त्राला देतात. खरंच आयुर्वेद या दुर्धर रोगाच्या […]

ध्यान स्थिती

  ध्यान स्थिती   जेव्हां मजला कळत होते,  निद्रेत आहे मी जागृत स्थिती असूनी मनाची,  शरीर होते निकामीं  ।। निद्रेमधल्या स्थितीत जाता,  जाग न राही तेथे जागेपण आणि निद्रा दोन्हीं,  एकत्र न येते  ।। निद्रावस्था नि जागेपणा,  याहून दुजे कोणते ? ध्यान स्थिति ही आगळी असूनी,  मध्य बिंदू साधते  ।। देह मनाला विश्रांती देई,  ध्यान अवस्था […]

मानव-जग-परमेश्वर

शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते. एक आकाश आणि पोकळी सर्वत्र जाणवते. बाहेर […]

भावनेच्या आहारीं

नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी   ।।धृ।। प्राणीमात्राच्या जगती   श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी   यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी   ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी प्राण्यास असे भावना   साथ नसे विचारांची विचार आणि भावना    साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी   ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी बरे वाईट यांची जाण   घ्यावीस तूं ओळखूनी राहूं नकोस विसंबून    आत्मविश्वास […]

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव

आज १ नोव्हेंबर… ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे […]

1 33 34 35 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..