नवीन लेखन...

निसर्गाची अशी ही खेळी

क आमेरिकेच्या वैद्यकीय मासिकांत, वैद्यकीय जीवशास्त्र Biomedical Science ह्याच्यावर आधारीत एक अहवाल वजा लेख वाचण्यांत आला. लेख मनोरंजक परंतु खुप माहीतीपर होता.
[…]

बांगलादेशातील पाकिस्तानवाद्यांना निष्प्रभ करणे महत्वाचे

बांगलादेश आणि भारत या देशांत अस्वस्थता कशी नांदेल हे पाहणे हे पाकिस्तानी नेतृत्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे बांगलादेशातील विद्यमान घडामोडींबाबत आपण अधिक सजग असणे गरजेचे आहे. गेले काही आठवडे त्या देशात साचलेल्या खदखदीचे रूपांतर धर्माध आणि निधर्मी शक्ती यांच्यातील संघर्षांत झाले असून या संघर्षांची झळ आपल्याला लागणार आहे.
[…]

ज्ञानपीठ पुरस्कार (नोबेल पुरस्कार इतकाच सर्वश्रेष्ठ)

माहितीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञातील प्रगतीच्या जोरावर देश-विदेशात नवनवीन शोध लागताहेत आणि तरुणपिढीबरोबर इतरही मंडळी वाचन संस्कृती पासून दुरावत चालली आहेत असे काही विश्लेषकांच्या माहितीच्या आधारे कळते.
[…]

यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं..!

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी १२ मार्च १९१३ रोजी झाला. त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. त्यांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रापुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला.
[…]

श्री. गिरीजात्मज – लेण्याद्री

या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले.
[…]

हुरळली इंडियन मेंढी लागली अमेरिकन लांडग्याच्या मागे

ज्या अमेरिकेत प्रत्येक सहाव्या मिनिटाला एका अमेरिकन महिलेवर बलात्कार होतो आणि ५ पैकी एका महिलेवर आयुष्यात कधीना कधी एकदा तरी बलात्कार झालेला असतो, ज्या अमेरीकेत पुरुष सैनिक आपल्याच सहकारी महिला सैनिकावर बलात्कार करण्यात बदनाम झालेले आहेत, त्या अमेरिकेमध्ये जागतिक महिला दिनी – ८ मार्च २०१३ रोजी – दिल्लीमध्ये गेल्या वर्षी धावत्या बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाची बळी ठरलेल्या २३ वर्षीय तरुणीला आंतरराष्ट्रीय महिला साहस पुरस्काराने गौरविण्यात आले..
[…]

पेनिसिलीनचा शोध लावणारे सर अलेक्झांडर फ्लेमिंग

सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ. त्यांनी केलेल्या पेनिसिलीनच्या संशोधनाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
[…]

ऑनलाईन जगात मराठी भाषा “दीन”

गेल्याच महिन्यात मराठी भाषा दिन साजरा झाला. मराठीचा जागर करण्याचा हा दिवस. सगळीकडे मराठीचा उदोउदो झाला. या दिनाच्या निमित्ताने सरकारच्या वतीने मराठी वेबसाईटची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या साईटसची संख्या शंभरीही पार करु शकली नाही.

ब्लॅकबेरी या आघाडीच्या स्मार्टफोनची नवी आवृत्ती येतेय. त्यात ७ भारतीय भाषांमध्ये काम करण्याची सोय आहे….. या ७ भारतीय भाषांमध्ये मराठीचा समावेश नाही ! मराठीचा समावेश नंतर होईल असे ब्लॅकबेरीच्या प्रवक्त्याने सांगितले खरे पण ते म्हणजे केवळ समजूत घालण्यासारखेच.
[…]

1 50 51 52 53 54 62
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..