नवीन लेखन...

कविता (१) / प्रोडक्ट कविता

शब्दांच्या साच्यात आम्बट – गोड, कडू – तिखट भावनांचा रस ओततो आणि तैयार करतो फास्टफूड सारखा स्वादिष्ट प्रोडक्ट ‘कविता’. — विवेक पटाईत

फसवणुकीचे धंदे

कन्फ्युज्ड माइण्डसेटमध्ये माणसं आपल्याला कोणतं बक्षीस लागलं बुवा, हे बघायला आणि चकटफू डिनर चाखायला सपत्नीक जातातही. आणि तिथेच फसतात. तिथे गेल्यावर तुमच्या बायकोच्या हातात येतो एखादा लेमनसेट. किंमत साधारण शंभर-सव्वाशे रुपये. हॉटेलचा पंचतारांकित भपका, बुफे जेवण याचा नाही म्हटलं तरी काही परिणाम तुमच्यावर होतोच. तुमच्या डोळ्यांमधले चंचल ससे मग एक डुलकी काढतात आणि आसपासची मार्केटिंग करणारी कासवं आपलं डोकं वर काढतात. एखादी तरुणी मधाळ आवाजात एखाद्या प्लॅण्टेशनची, रिसॉर्ट किंवा मोटेलची किंवा टाइम शेअरिंगची योजना तुमच्या गळी उतरवू लागते. तिला तुम्ही पटकन नाहीही म्हणू शकत नाही. किंवा नाही म्हणायला तुम्ही मध्यमवर्गीय सबबीने पटकन सांगता की मी आता चेकबुक आणलेलं नाही. इथेच तुम्ही अडकता. ती लगेच म्हणते ‘हरकत नाही, तुम्ही आता फॉर्म भरा. मी माझा एक माणूस तुमच्यासोबत घरी पाठवते. तुम्ही त्याच्यासोबत डाऊनपेमेण्टचा चेक द्या.’ एका लेमनसेट आणि बेचव जेवणाच्या बदल्यात तुम्ही लाख-सव्वालाखाच्या व्यवहारात अडकलेला असता. […]

अर्जुनाची अखेरची कसोटी आणि राजकारण

पाचूच्या बेटावरील ज्या 11 मानवी सिंहांनी राष्ट्राची पहिलीवहिली कसोटी 1981-82च्या हंगामात इंग्लंडविरुद्ध खेळली त्यांमध्ये 18 वर्षांच्या अर्जुना रणतुंगाचा समावेश होता. श्रीलंका संघाने खेळलेल्या 100व्या कसोटीत अर्जुना होता, त्याचा ‘त्या’ दहामधील कोणताही सहकारी आता मात्र संघात नव्हता.
[…]

डायल २६११, देशाचे सुरक्षा कवच !

जगात सुरक्षा आणि संरक्षणासाठी विविध उपाय योजना तयार केल्या व राबवल्या जातात. कोणताही प्रगत देश असो आता पर्यंत यातील कोणतीही यंत्रणा वा कार्यप्रणाली हा ठोस किंवा निश्चित उपाय होऊ शकला नाही. अमेरिका, चीन, ईस्रायल, जपान सारखे देश आजही पर्यायी उपायासाठी चाचपडत आहेत. यावर पुण्यातील शास्त्रज्ञ, टेलीकॉम्युनिकेशन इंजिनिअर तथा माजी तंत्रज्ञान सल्लागार भारत सरकार श्री. दिनकर बोर्डे यांनी तयार केलेल्या “डायल २६११” या परियोजनेमुळे जगाला एक कायमस्वरुपी नागरी, सामाजिक, विभागीय, अंतर्गत, सीमावर्ती, तटवर्ती, अवकाशीय आणि देशीय सुरक्षा आणि संरक्षणासाठीचा ठोस व परिणामकारक उपाय मिळणार आहे […]

हॅमिल्टन मसाकझा आणि एका दिवसात 3 डाव

…केनियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने 156 आणि नाबाद 178 धावा काढल्या. (झिम्बाब्वेचा कसोटीदर्जा सध्या निलंबित अवस्थेत आहे.) आता एकदिवसीय क्रिकेट फार जास्त खेळले जाते असे नेहमी म्हटले जाते पण एकाच एकदिवसीय मालिकेत एका फलंदाजाने दीडशे किंवा त्याहून अधिक धावांचे डाव दोनदा रचण्याची घटना इतिहासात प्रथमच घडली आहे.
[…]

बदलत्या चलनाच रूप

एकदा पहाटे लवकर जाग आली आणि पाहतो तर समोर साक्षात भगवंत, म्हणालो पावलो रे भगवंता. भगवंत म्हणाले तुझी फालतू बडबड ऐकायला आलेलो नाही कायम रडत असतोस धर हे कार्ड, तुला काय हवे ते तू खरेदी कर पण तुझ्या कष्ठाच्या पैशानेच. मग म्हटलं असेल स्वप्न पण कार्ड हातात होत नंतर भगवंत निघून गेले. […]

सार्डीमॅन दिलीप व आजोबा ग्रेस

…हे पुत्ररत्न पुढे जाऊन भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आणि कॅरिबींच्या भूमीत ‘सार्डीमॅन’ म्हणून प्रसिद्धीस आले. (सार्डीन हा एक माशाचा आणि सागरी खाद्याचा प्रकार आहे – गोव्याच्या भूमीलाही ‘सार्डीमॅन’ चपखलपणे लागू होते!)
[…]

स्वातंत्र्य लढ्याबद्दलचा महत्त्वाचा दस्तावेज – ‘जिंकू किंवा मरू’

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांनी भरलेला आहे. कायदेभंगाची चळवळ, अहिंसक सत्याग्रह, शत्रूला हिंसक मार्गाने संपवण्याची क्रांतिकारक चळवळ असे सारे प्रकार या स्वातंत्र्यलढ्यात अंगीकारण्यात आले. हा सगळा इतिहास आज उपलब्ध आहे तो निरनिराळ्या स्वरूपातील पुराव्यांच्या रूपाने. ‘चलेजाव’ची १९४२ सालातली चळवळ. हा स्वातंत्र्यचळवळीतील आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता. इतर सर्व आंदोलनापेक्षा १९४२ ची चळवळ खूपच वेगळी होती. एकतर या चळवळीला एक असा नेता नव्हता, कारण गांधीजींपासून बहुतेक सारे महत्त्वाचे नेते तुरुंगात होते. भूमिगत नेते आणि कार्यकर्ते ही चळवळ चालवत होते. अंतिम टप्प्यात आलेले स्वातंत्र्य आंदोलन या शेवटच्या लढाईत तेजाळून उठले… योगोयोगाची गोष्ट म्हणजे, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दोन महत्त्वाचे दिवस येतात. नऊ ऑगस्टला बेचाळीसच्या लढ्यानिमित्त साजरा होणारा क्रांतिदिन आणि पंधरा तारखेस स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्य चळवळीची आठवण जागवणाऱ्या एका पुस्तकाबद्दल जाणून घेणे म्हणूनच अगत्याचे ठरेल.
[…]

1 8 9 10 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..