नवीन लेखन...

आहार आणि आकार

सडसडीत व किडकिडीत यामधला फरकही समजून घेणे आवश्योक असते. सर्व बांधा सुदृढ व मनुष्य आकारात असणे, शरीराच्या कुठल्याही भागावर अवाजवी चरबी साठलेली नसून उंची व वजन यांचे प्रमाण उचित असून चालणे, पोहणे, काम करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये चपळता असणे म्हणजे सडसडीत असणे. पण उंची जास्त व त्यामानाने वजन कमी असणे, शरीरावयवांना योग्य तो आकार नसणे व अशा व्यक्तीसला पाहिल्यावर आपण काडी/काठी पाहतो आहोत असा भाव मनात येणे म्हणजे किडकिडीत असणे.

दिवसातून दोन वेळा व्यवस्थित जेवण, सकाळची न्याहारी, मध्ये एखाद्या वेळी काहीतरी तोंडात टाकणे असे नियमात राहून स्वतःच्या प्रकृतीला मानवणारा आहार घेत राहिले तर सहसा कुठल्याही प्रकारचे आजार येत नाहीत, वजनही बरोबर राहते व शरीरही सडसडीत राहते. परंतु वजन वाढेल अशी भीती मनात असली तरी वजन कमी होते. वजन वाढेल या भीतीपायी शरीराला शक्तीय देण्यास समर्थ असलेले दूध, तूप, लोणी, साखर यांसारखे घटक बंद केले तर नुसतेच वजन उतरत नाही, तर शरीराची शक्तीम कमी होते. शक्तीा कमी व्हायला लागली, शरीराचे एकूणच असंतुलन सुरू झाले की शरीरातील हॉर्मोन्सचे असंतुलन होते व त्याचेही अनेक त्रास होऊ लागतात. त्याउलट अति खाण्याची, अति झोपण्याची, आळसात वेळ घालविण्याची सवय असली तर वजनाचा काटा प्रमाणाबाहेर झुकू लागतो, त्यातही नितंबांवर, मांड्यांवर, दंडावर, पोटावर अशा चुकीच्या ठिकाणी चरबी वाढल्याने वजन वाढू लागते.

न पचणारे नकोच

स्त्रियांचा मासिक धर्म जोपर्यंत व्यवस्थित चालत असतो तोपर्यंत सहसा वजन वाढत नाही, पण मासिक धर्मात काहीही असंतुलन झाले (उदा. एकच दिवस अंगावर जाणे वगैरे) तर त्याचा परिणाम वजन वाढण्यात, त्वचा काळपट व रुक्ष होण्यात होऊ शकतो. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर शरीराचे धर्म पाळत असतानासुद्धा पोट व ओटीपोट येथे चरबी वाढण्याकडे प्रवृत्ती असते. याचा संबंध केवळ अन्नसेवनाशीच असतो असे नाही.

आईवडिलांकडून आलेल्या गुणांमुळे ज्यांच्या प्रकृतीचा कल वजन वाढण्याकडे असतो त्यांचे किंवा बुटक्यां व्यक्तीुचे शरीर भरायला लागले तर ते चांगले दिसत नाही. असे वजन कमी करण्याचीच आवश्ययकता असते. पण या उलट मनुष्य फार किडकिडीत झाल्यास (वंशपरंपरेने असो वा इतर कारणांमुळे असो) त्याचे वजन वाढवणे आवश्यिक असते. यासाठी कायम शरीराला सिद्ध तेलाचा अभ्यंग आवश्य्क असतो. स्त्रीने आपला मासिक धर्म व्यवस्थित आहे याकडे लक्ष ठेवावे (तो नीट नसल्यास आयुर्वेदाच्या तज्ज्ञांकडून प्रकृती तपासून घेऊन योग्य ते औषधोपचार सुरू करावेत). शरीर किडकिडीतेकडून सडसडीतेकडे नेण्यास याचा उपयोग होतो. अमुक गोष्ट खाऊन वजन वाढते व तमुक गोष्ट खाऊन वजन कमी होते या वक्त व्याला फारसा अर्थ नसतो. कुठलीही गोष्ट खाऊन अपचन झाले की वजन नक्की वाढते. न पचणाऱ्या गोष्टी खाल्ल्या, सातत्याने रात्री उशिरा जेवले तर मात्र वजन नक्की वाढते. पण असे वाढलेले वजन असंतुलनाला व रोगाला कारणीभूत ठरत असल्यामुळे या वजनाचा काही उपयोग नसतो.

किडकिडीत असणाऱ्या व्यक्तीरला शरीरसौष्ठव प्राप्त व्हावे यासाठी अभ्यंगाचा उपयोग होतो, तसेच स्वतःच्या प्रकृतीला जाणून त्यानुसार योग्य आहार घ्यावा. सकाळी न्याहारीच्या वेळी कुठलातरी गरम ताजा पदार्थ, दुपारच्या वेळी भरपूर जेवण, रात्री अल्पाहार म्हणजे दूध-भात, सूप, एखादी-दुसरी पोळी असा एकूण आहार ठेवल्यास वजन वाढायला मदत होते.

वजन वाढण्यासाठी आवश्य क असणाऱ्या धातूंची पुष्टी होण्यासाठी त्यानुसार धातुवर्धक अन्नसेवन आवश्याक असते, पण त्यासाठी व्यक्ति्गत मार्गदर्शन आयुर्वेदाच्या डॉक्टेरांकडून घेणे व त्यानुसार आहार ठेवणे आवश्यसक असते. याचे मार्गदर्शन आयुर्वेदिक डॉक्टदरांकडून अशासाठी, की आयुर्वेदाचा एकूण आहारासंबंधी दृष्टिकोन संपूर्ण वेगळा असतो, प्रकृतीनुसार तसेच पचनशक्ती्ला साजेसा आहार सुचविलेला असतो.

शरीर किडकिडीत नसावे, सडसडीत असावे अशा दृष्टीने वजन वाढविण्याची इच्छा असणाऱ्यांना व्यायामही आवश्यषक असतो. स्थूल व्यक्तींवना वजन उतरविण्यासाठी व्यायामाची आवश्य कता असते अशी समजूत अनेक वेळा असलेली दिसते. पण वजन वाढविण्यासाठीसुद्धा व्यायामाची गरज असतेच. अशा व्यक्तीं नी योगासने, प्राणायाम करणेही आवश्याक असते. फुफ्फुसांमध्ये प्राणवायू जेवढा अधिक स्वीकारला जाईल तेवढे शरीर सुदृढ व चांगले होते. योग करण्याने शरीरातील संप्रेरकांचे संतुलन व्यवस्थित राहिल्यामुळेही वजन व्यवस्थित वाढते. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार आचरण केले, तर किडकिडीत न राहता सडसडीत राहायला मदत होईल, शरीराचा आकार व सौष्ठव चांगले राहून शरीर आकर्षक होऊ शकेल.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- balaji tambe

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..