मनाचे श्लोक – १११ ते १२०

हिताकारणे बोलणे सत्य आहे | हिताकारणे सर्व शोधूनि पाहे |
हिताकारणे ब्ंाड पाखांड वारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||111||

जनी सांगता ऐकता जन्म गेला | परी वादवेवाद तैसाचि ठेला |
उठे संशयो वाद हा दंभधारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||112||

जनी हीत पंडीत सांडीत गेले | अहंतागुणे ब्रहमराक्षस जाले |
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे | मना सर्व जाणीव सांडूनि राहे ||113||

फुकाचे मुखी बोलता काय वेचे | दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे |
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे | विचारे तुझा तूंचि शोधून पाहे ||114||

तुटे वाद संवाद तेथे करावा | विवेके अहंभाव हा पालटावा |
जनी बोलण्यासारिखे आचरावे | क्रियापालटे भक्तीपंथेचि जावे ||115||

बहू श्रापिता कष्टला अंबऋषी | तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी |
दिला क्षीरसिंधू तया ddऊपमानी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||116||

धुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे | कृपा भाकिता दीधली भेटि जेणे |
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||117||

गजेंदू महासंकटी वाट पाहे | तयाकारणे श्रीहरी धांवताहे |
उडी घातली जाहला जीवदानी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||118||

अजामेळ पापी तया अंत आला | कृपाळूपणे तो जनी मुक्त केला |
अनाथासि आधार हा चक्रपाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||119||

विधीकारणे जाहला मत्स्य वेगी | धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी |
जना रक्षणाकारणे नीच योनी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||120||

– श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…