दानशूर कर्ण

महाभारतातील कर्णाचे स्थान   अद्विती असून
मान जाई उंचावुनी    त्यास समजोनी घेता   ।।१।।

सुर्यपुत्र कर्ण    घनुर्धारी महान
दानशूर तो असून   इतिहास घडविला   ।।२।।

सुर्य आशिर्वादे जन्मला  कवच कुंडले लाभती त्याला
रक्षण वलय शरिराला   मिळती कर्णाच्या   ।।३।।

अंगातील कर्तृत्व शक्ति    माणसाला उंचावती
शक्तीस वाट फुटती    शोधूनी त्याची योग्यता   ।।४।।

जन्मुनी प्रथम पांडव    सहवासांत सारे कौरव
हेच त्याचे खरे दुर्दैव    नियतीचा होई खेळ   ।।५।।

महाभारत युद्ध प्रसंगी    कौरवामध्ये कर्ण अग्रभागीं
होता तो विजयाच्या मार्गी    हादरुन सोडले पांडवाना   ।।६।।

इंद्रासह सर्व देव आकाशी   बघती अर्जुन-कर्ण युद्धासी
परी चित्त त्यांचे कृष्णासी   बघती त्याची लिला   ।।७।।

थोपवून धरिला अर्जून रथ    असूनी सारथी भगवंत
बाण शक्तिनें नेला रेटीत    कृष्ण परमात्म्यासह   ।।८।।

शक्तीचे हे दिव्य दर्शन   बघू लागले आकाशांतून
इंद्रादी देव विस्मयित होऊन  न्याहळूं लागले कर्णाला   ।।९।।

चकीत झाले देवगण   यश अर्जुना यावे म्हणून
कवच कुंडले मागावी दान   इंद्र करी मनीं विचार   ।।१०।।

प्रातः काळची सुर्य किरणे   सुचवी कर्णा सावध राहणे
रुप घेतले इंद्राने      दान मागण्यासाठीं   ।।११।।

कर्ण होता दानशूर    मन त्याचे उदार
न घेई तो माघार    संकल्प करिता एकदां   ।।१२।।

इंद्र देवाचा राजा    ठोठती कर्ण दरवाजा
ठेवूनी मनी भाव दुजा    रुप घेतले याचकाचे   ।।१३।।

देवांचा नृपती   दान मागण्या येती
हे माझे भाग्य असती   सत्व परिक्षा देण्याचे   ।।१४।।

ओळखले याचकाला    इंद्राच्या सत्य रुपाला
अभिवादन केले तयाला    कवच कुंडले देई दान   ।।१५।।

कवच कुंडलाचे दान    स्वहत्याचे ठरले कारण
असूनी कर्णा हे ज्ञान    इंद्रसी दानधर्म केला    ।।१६।।

इंद्रापरी याचक कोण   जो मागेल मजसी दान
त्याचा कर्णा अभिमान    हीच त्याची श्रेष्ठता   ।।१७।।

कर्णाचे हे दान    ठरले त्याचे समर्पण
करी त्यासी महान    अजरामर करुनी   ।।१८।।

डॉ. भगवान नागापूरकर
२०-२१११८३महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

About डॉ. भगवान नागापूरकर 1114 लेख
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*