नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग १६

न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।

वाग्भट सूत्र स्थान 5 – 5/6 भाग 4

ज्या पाण्याला गती नाही, त्या पाण्यावर शेवाळ धरते. बुळबुळीतपणा वाढतो. साठण्याची प्रक्रिया वाढली कि, कुजण्याची क्रिया सुरू होते. कुजणे म्हणजे बुडबुडे येणे. असे आपोआप बुडबुडे येणारे पाणी पचायला जड असते. कुजण्याची प्रक्रिया म्हणजे जंतुनिर्मिती. जंतु पाण्याशिवाय वाढू शकतच नाहीत.
म्हणजेच जिथे जंतु असतात, तिथे फरमेंटेशन सुरू असते. जिथे फरमेंटेशन असते तिथे पाणी असते. जे पाणी स्थिर असते तिथे जंतुसंसर्ग आणि फरमेंटेशन सुरू होते. म्हणजेच स्थिर असलेले पाणी पिऊ नये. स्थिर पाण्यात शेवाळ धरते असे म्हणतात. प्रत्यक्षात तसेच दिसते. समुद्राच्या किंवा नदी, धबधब्याच्या हलणाऱ्या पाण्यात शेवाळ धरत नाही. पण तलावाच्या काठाला शेवाळ आढळते.

फेस आलेले पाणी पिऊ नये असेही ग्रंथकार म्हणतात. शुद्ध पाण्यात फेस येत नाही. याचा अर्थ ज्या पाण्यात फेस किंवा बुडबुडे दिसतात त्या पाण्यात काहीतरी अशुद्ध द्रव्य नक्कीच मिसळली गेली असणार. म्हणून हे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे.

पाणी तापवून प्यावे. एकदाच तापवावे. वारंवार तेच पाणी गरम करू नये. अतिथंड पाणी देखील पिऊ नये. हे ग्रंथकर्ते सांगताहेत, त्या काळात फ्रिजपण नव्हते आणि कोल्ड्रींक्सही नव्हती.

कार्बन डाय ऑक्साईड सारखे विषारी वायु, जे आपण उच्छ्वासावाटे बाहेर सोडतो, जे शरीरात राहिले तर शरीराचे नक्की नुकसान होणार असते असे आजचे विज्ञान पण सांगते, ते कार्बोनेटेड वाॅटर आपण गरज म्हणून पितोय कि गंमत म्हणून ????

शास्त्रकार द्रष्टे होते, त्यांना माहिती होते, आमची पुढची अतिबुद्धिमान पिढी पाण्याबरोबर जीवघेणे खेळ खेळत आपले आयुष्य पणाला लावू पहात आहे………

निदान त्यांच्या पुढील पिढीच्या सुरक्षित आरोग्यासाठी तरी चार ओळी खरडून ठेवाव्यात, म्हणून जस्ट टाईमपास म्हणून लिहिले असावे कदाचित. एकतर त्यांच्या दौतीतली शाई संपत नसावी, किंवा बोरूच्या टोकाला, केवळ धार काढावी म्हणून बहुतेक लिहून ठेवण्याचे कर्म त्यांना सुचले असणार !

ही कोल्ड्रींक्स हे विष आहेत, हे वारंवार सिद्ध झालेले असताना, त्यात बुडबुडे दिसताना, त्यांच्या पिण्यामुळे दात, हिरड्या, जीभ यांना झिणझिण्या येत असताना, पिल्यानंतर जीवघेणी ढेकर येत असताना, आपल्याला त्याची गरज नसताना, हे फेसयुक्त अतिथंड पाणी प्यायची काय हौस आहे, काही कळत नाही.

विनाशकाले विपरीत बुद्धी. दुसरं काय ?
शास्त्रकारांनी याच श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे,
फेनिलं, जन्तुम्, अतप्तम्, दन्त अग्राह्यम्, अति शैत्यतः न पिबेत् !

पण लक्षात कुणी घ्यायचे ?
शास्त्रावर विश्वास नाही, शास्त्रकारांवर विश्वास नाही.
आधुनिक विज्ञान सांगते तेही व्यवहार्य वाटत नाही.
अंगवळणी पडले आहे, एवढे सवयीचे गुलाम झालो आहोत ?

एवढं माहित असून पिणार असाल तर प्या. आणि भोगा आपल्या कर्माची फळे !
दुसरं काय म्हणणार ना ?

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
23.12.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..