नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे  – भाग चार

 

नियम नाही तर आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक दोन

“शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते.”

शरीराकडून ज्या प्रक्रिया केल्या जात असतात, त्या शरीरासाठी योग्य असतात. जसे, मल विसर्जन मूत्र विसर्जन, उलटी, ठसका, शिंक येणे, इथपासून ते अगदी ताप येणे, पू होणे, वेदना होणे, इथपर्यंत शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी निर्माण केल्या जातात. जर या प्रक्रिया झाल्या नसत्या तर काय काय झाले असते ? जरा विचार करून पहा.

समजा, आपण कोणतेही सरबत अथवा दूध, ताक, अशी सात्विक पेय घेतली तर शरीराला आनंद होतो.
या पेयांची चव वास, या गोष्टी मनाला आनंददायी असतात. याचा शरीराला उपयोग होणार असतो, हे शरीराला कळत असते. म्हणून याच्या विरोधी प्रक्रिया शरीराकडून निर्माण होत नाहीत.

आज उपलब्ध असलेली कोल्ड्रींक्स प्यालो तर लगेच ढेकरा यायला सुरवात होतात, तीव्र झिणझिण्या नाकात येतात. येतात म्हणजे जे नको असते, हानीकारक विषारी असते, ते विषारी वायु अथवा रसायने लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी त्याने निर्माण केलेली प्रक्रिया असते.

समजा चुकुन राॅकेल प्यायले गेले तर ? लगेचच उलट्या सुरू होतील. ज्याच्या भविष्यात होणाऱ्या भयंकर दुष्परिणामांचा विचार करून तो उलट्या निर्माण करतो. राॅकेलचा किंवा नको असलेल्या द्रव्याचा शेवटचा अंश शिल्लक असेपर्यंत उलटीची भावना होतच रहाणार ! वरून बाहेर पडणाऱ्या उलटीमधे जर तेवढी क्षमता नसेल तर जुलाब सुरू होतात आणि उरलेले विषारी अंश, अधोमार्गाने बाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करतो. त्यासाठी तो आपल्याला वारंवार सावध करत असतो. वेदना निर्माण करणे, पोटात ढवळणे, चक्कर आल्यासारखी वाटणे, हातापायाला कंप सुटणे, घाम येणे, पोटात दुखणे, इ. अशी अनेक लक्षणे तो दाखवतो. जेणेकरून आपले लक्ष बाह्य गोष्टीमधून कमी होऊन, आपण बाहेरून सावध होऊन, आतमधे विशेष गांभीर्याने लक्ष दिले जावे. म्हणजे तो जेव्हा आपल्याकडून मदत मागतोय त्या प्रत्येक वेळी त्याला हरप्रकारे त्याला मदत करावी.

काही वेळा आपल्याला कळत नाही, एखादा पदार्थ खाणे, यावेळी योग्य आहे की अयोग्य. किंवा काही वेळा कोणताही विचार न करता किंवा चुकुन ‘अभक्ष्य’ भक्षण केले जाते, ( याला शास्त्रीय भाषेत असात्मेंद्रियार्थ संयोग किंवा प्रज्ञापराध म्हणतात.) अशा वेळी देखील तो आतमधे जागरूक राहून काही लक्षणे निर्माण करून, बाहेरून मदत मागत असतो. ही मदत जर आपण वेळीच पोचवली नाही, तर त्याच्यावरचा, आतील यंत्रणेवरचा ताण आपण नकळत वाढवित असतो.

काही कारणांनी पित्त वाढले आहे, आणि उलटी होतेय असे वाटतेय तर काय जाणावे ? आणि काय करावे ? सर्व प्रथम बाहेरील लक्ष आतमधे द्यावे. विवेक वापरावा. आतमधे काय चालले आहे, याचा अंदाज घ्यावा आणि जर ढवळत असेल तर उलटी होण्यासाठी जे आवश्यक आहे ते लगेचच करावे, गरम पाणी, मीठ पाणी, इ. पिऊन उलटी करावी, तयार झालेला अतिरिक्त आम, बुळबुळीत कफ, कडू आंबट पित्त पडून गेले की बरे वाटते.

हीट उलटी जर औषधे घेऊन थांबवली तर मात्र त्याच्या प्रक्रियेत आपण जाणूनबुजुन अडथळा करतो आणि भविष्यातील नवीन रोगांची सुरवात करून ठेवतो.

याचाच अर्थ शरीरातील या प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहेत, म्हणून शरीराकडून घडवल्या जातात. म्हणजेच शरीराचे नियम ओळखणे हे जास्ती महत्त्वाचे. आणि हे बदल घडवणारा कोण ? तर आत्मा. त्याच्या इच्छेने हे सर्व केले जाते. मन, इंद्रिये यांच्या सहाय्याने तो या सर्व आवश्यक प्रक्रिया करीत असतो. त्यात आपला सहभाग खूप कमीच असतो.

त्याच्याकडून केल्या जाणाऱ्या या प्रक्रियेला, आपली बुद्धी वापरून अनावश्यक विरोध निर्माण करणे म्हणजे भविष्यातील रोग. तर त्याचे संदेश ओळखून, तो सांगतोय तशी त्याला मदत करणे, हे आपले वर्तमानातील कर्तव्य आहे.

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

13.04.2017

 

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..