नवीन लेखन...

अतिवृष्टी आणि “मुंबईकर”….!

पावसाने एका झटक्यात सगळ्यांना ‘मुंबईकर’ बनवले. आता कोणी मराठी नाही, आता कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही.! भिजणारी माणसेच.., मदत मागणारी माणसेच..आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसेच.! उद्या ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीट होईल. फक्त एक करा. ह्या पावसाने दिलेला ओलावा असाच जपून ठेवा.! शेजाऱ्यांची सुद्धा निटशी ओळख नसणार्या मुंबईकरांच्या घराचे दरवाजे आज अनोळखी लोकांसाठी उघडे आहेत. संकटात मदतीला धावून जाण्याच्या या वृत्तीला माझा सलामच…!

गल्लोगल्लीतील गणेशोत्सव मंडळाने आपापल्या परीने अल्पपोहार, जेवणाची सोय केली, गुरूद्वारेत लंगर चालू आहेत, राहण्याची सोय आहे. काही चर्च सुद्धा अडकलेल्या लोकांसाठी खुल्या आहेत. मुस्लिम बांधव ही त्यांच्या परीने मदत करत आहेत. हे सगळेच कौतुकास्पद आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे व चर्चगेट स्टेशनवर एक १७-१८ वर्षाची मुलीने जवळपास १०० च्यावर बिस्कीटचे पुडे आणून तिथे उभ्या असणाऱ्या प्रवांशाना एक-एक वाटले.

काल झालेल्या मुंबईतील अतिवृष्टीमुळे मुंबई पूर्णपणे थांबली असता..जागो जागी जर कर्तव्यावर कोणी दिसत होते तर ते होते “मुंबई पोलीस” संपूर्ण मुंबईकरांच्या वतीने कर्तव्यावर असलेल्या सर्व पोलीस बांधवाना मानाचा मुजरा.. प्रत्येकजण आपापल्या परीने सरकारच्याही चार पाऊले पुढे होऊन मदत करत आहे. माझ्यासारख्या बाहेरून या शहरात आलेल्या व्यक्तीला पण आता मी ही ‘मुंबईकर’ असल्याची जाणीव होत आहे.

मुंबई शहर व उपनगरात अतिवृष्टी व असामान्य परिस्थिती मुळे मुंबईची जिवनवाहीनी असलेल्या रेल्वेच्या तीनही मार्गावरील सेवा प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळे कामावरुन घरी जाणारे चाकरमनी, महिला व वयोवृध्द प्रवाशी अनेक ठिकाणी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यामध्येच अडकून पडले होते. या प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल व उरण या सर्व मार्गांवर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी असतानाही व या वाहतूक कोंडीत उपक्रमाच्या ५० हून अधिक बसेस अडकल्या असतानाही रात्री १२ वाजेपर्यंत ५२ जादा बसेसव्दारे बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. नेहमी जास्त पाऊस झाल्यावर उपक्रमाचे उत्पन्न कमी होते. परंतू २९ ऑगस्ट रोजी सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देवून प्रवाशांना अतिरिक्त बस सेवा दिली.

काल मुंबईत पावसानं जे झालं त्याचा आपण सर्वांनीच विचार करायला हवा. काल पाऊस खूप झाला पण इतका नाही की एक शहर कोसळून पडावं. २६ जुलै २००५ ला ९४४ मिमि पाऊस पडला होता तर कालचा पाऊस ३१५ मिमि होता. इतका पाऊस खरं तर आपण झेलायला पाहिजे. तशी आपली तयारी पाहिजे. पाऊस पाणी वाहून नेण्याची क्षमता किती..? कचरा, राडारोडा ह्याचं नियोजन कसं करावं..? Metro city मुंबई सारख्या शहराची लोकसंख्या पेलण्याची क्षमता किती आहे..?, लोकसंख्येची घनता..अशा कित्येक गोष्टींचा विचार करावा लागतो. तो आपण करत नाही.. बेफिकीर रहातो आणि, सगळ्याचंच खापर प्रशासनावर किंवा राजकारण्यांवर फोडतो. नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे हे पहायला पाहिजे. अनधिकृत बांधकाम आपल्या भागात होत असेल तर आपण जागरूक आहोत का.? आपल्या आसपासच्या सार्वजनिक बांधकामाची काळजी आपण आपल्या घरातल्या वस्तूंसारखी आपुलकीनं घेतो का..? चुकीच्या गोष्टी चालल्या असतील तर वेळ काढून लोक प्रतिनिधींना कळवतो का..? त्यांच्यावर दबाव टाकतो का..?

आपण घरात साधं ओला-सुका असं कचरा वर्गीकरण करत नाही, मग आपण कुणाला काय बोलणार..? अशी नैसर्गिक संकटं येतात तेंव्हा लक्षात घ्यावं की आपण सर्वसाधारण जागरूक नाही, तत्पर नाही..म्हणतात ना संकटं येऊ नयेत म्हणून समाज काय करतो किंवा आल्यावर तो कसा वागतो त्यावर समाजाची लायकी ठरते. आपण सर्वांनी मिळून ही लायकी वाढवली पाहिजे इतकंच मला या परिस्थितीवरून जाणवलं.

मुंबईत काल सरासरी २०० मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद झाली असून पावसाच्या पाण्यात मिसळलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलमुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागला अशी माहिती मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी आज दिलीय. मुंबई आणि उपनगरांमध्ये एकूण २३ ठिकाणी २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली असून काल दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सर्वात जास्त पाऊस कोसळला असल्याचेही आयुक्त म्हणाले. याबरोबरच भांडुप, माटुंगा, वरळी आणि कुर्ला येथे एका तासात १०० मिमी पावसाची नोंद झाली. कालच्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अजॉय मेहता यांनी पत्रकार परिषदेत मुंबई आणि उपनगरातील स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ३ हजार ७५६ दशलक्ष लिटर पाणी काढले गेले.

काल मुंबई आणि उपनगरांमध्ये मुंबई महापालिकेचे एकूण ३० हजार कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. मुंबईभर वेळेत पाणी उपसा व्हावा यासाठी एकूण ३१३ पंप लावण्यात आले होते.तसेच २२९ पंपांद्वारे पिक अवरमध्ये पाणी बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. याबरोबरच सिव्हरेज लाइनचे पाणी बाहेर काढण्यासाठी पालिकेकडे असलेल्या ११० पंपांचा उपयोग काल पाणी उपसण्यासाठी करण्यात आला. पालिकेचा अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. मात्र एवढी मोठी यंत्रणा कामाला लागल्यानंतर देखील पाण्यात मिसळलेले प्लास्टिक आणि थर्माकोल अशामुळे पाण्याचा निचरा होण्यास मोठा विलंब लागला अशी माहितीही आयुक्तांनी यावेळी बोलताना दिली.

— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..