शेंगा आणि टरफलं

लोकमान्य टिळक लहानपणी म्हणाले होते.

“मी शेंगा खाल्ल्या नाहीत… मी टरफलं उचलणार नाही”
आता बाकीच्या व्यक्ती काय म्हणाल्या असत्या बघा:

महात्मा गांधी:
“मी शेंगा खाल्ल्या आणि मीच टरफलं उचलणार आणि दुसर्याने शेंगा खाल्ल्या तर ती पण टरफलं मीच उचलणार”

बाळासाहेब ठाकरे:
“यांच्या बापाचा माल आहे काय? शेंगा फ़क्त मराठी माणसालाच खायला मिळाल्या पाहिजेत आणि खाताना टरफलं सांडली तर त्याला सरकार जबाबदार असेल”
जय महाराष्ट्र!

शरद पवार:
“महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असल्याने कुणी कुणाला शेंगा खाण्यापासून रोकू शकत नाही…
यात शेतकरयांचं भलं आहे आणि उरलेल्या टरफलांपासून alcohol बनवता येईल का याबद्दल विचार करण्यासाठी सरकार लवकरच समिति नेमेल”

नरेंद्र मोदी:
“मित्रोंssss….
शेंग खाने का वर्णन तो हमारे वेदों में भी किया हुआ है….
चाहे हिन्दू हो या मुस्लिम या सीख़ हो या ईसाई हो सबने शेंग खानी चाहिए…
और सबने अपने आसपास का टरफल उठा के भारत को स्वच्छ रखना चाहिए”

सोनिया गांधी:
“अमने चार साल पहले एक सपना देका ता की देश के हर एक नौजवान को शेंग खाने का मौका मिलना चाइये…
और कांगरेस ने ये सपना पूरा किया.
और ”
दिग्विजय जी ये तरफल कौन सा फल होता है??”
दान्यवाद…

मनमोहन सिंह:
“……….
………..
………..
………..
………..
…………
…..!!!”
देवेन्द्र फडणवीस:
“हे बघा….
महाराष्ट्रात शेंगा खायच्या की नाही याचा निर्णय आम्ही आदरणीय मोदीजींना विचारून उदया जाहिर करू आणि टरफलांबाबत नाथाभौ काय ते लवकरच सांगतील”

नितिन गडकरी :
“विदर्भाच्या लोकांवर वेळोवेळी अन्याय झाला आहे त्यामुळे आता आम्हाला खाण्यासाठी आमच्या वेगळ्या शेंगा पाहिजेत आणि टरफलांपासून आम्ही ऊर्जा निर्मिति करता येईल का याचा विचार करू ”

किरीट सोमय्या:
“या चेंगा काण्याच्या कामात प्रछंड ब्रष्टाचार जाला आहे असा माजा पश्त आरोप आहे आणि प्रमाणा पेक्चा जास्त तरफलं जमा केल्याबद्दल बुजबलांना अटक ज़ालीच पायजे”

छगन भुजबळ:
“या शेंगा आमच्या वडिलोपार्जित असुन माझ्याकडे सर्व शेंगा आणि टरफलांचा हिशोब आहे आणि शेंगा खायचा निर्णय सर्वांचा असताना मला एकट्यालाच लक्ष्य केले जात आहे तरीही मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे”

अण्णा हजारे:
“हे पहा असं आहे की ….
या शेंगांच्या कामात खुपच अनियमितता आढळून येत आहे ,एका शेंगेत एकच दाणा दुसऱ्या शेंगेत तीन तर तिसरीत दोन….
आणि टरफलं पण अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत….
तर असं आहे आणि याची चौकशी तर झालीच पाहिजे नाहीतर मी उपोषणाला बसणार”

उद्धव ठाकरे:
“आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांचे पालन आम्ही करू आणि सर्व शिवसैनिकांना शेंगा खाणे बंधनकारक करू आणि टरफलां बाबत संजय राउत “सामना” मध्ये लिहितील”

राज ठाकरे:
“या सर्व परप्रांतियांनी इथे येऊन शेंगांचे भाव वाढवून ठेवलेत आता काय करायचं आपल्या मराठी मुलांनी, सरकारला मराठी मुलांसाठी शेंगा राखीव ठेवल्याच पाहिजेत नाहीतर राज्यभर खळ्ss खट्याक होईल….
आणि टरफलं फेका त्या अबु आजमी च्या बंगल्या बाहेर…
जय महाराष्ट्र”

अबु आजमी:
“देखिये इस्लाम में किधर भी नहीं लिखा है की मुस्लिमो ने शेंग खाना जरुरी है…..
और ये टरफल क्या होता है
मुझे नहीं पता”

अजित पवार:
“ज्या शेतात या शेंगा आढळून आल्या, ते शेत माझ्या मालकीचं असल्याचा खोटा नाटा आरोप उगाचच होतोय…
आरोप सिदध झाल्यास शेंगा खायच् सोडून देईल”

तटकरे:
“जसं दादा म्हणतिल,
तसं”

राहुल गांधी:
“देखो भैया…
आज देश का गरीब क्या चाहता है …
वो खाली शेंग ही तो खाना चाहता है …
और ये सरकार क्या कर रही है …
हमारे सामने टरफल फेक रही है ….
हमे इसके खिलाफ आवाज उठाना चाहिए….
बोलो हाँ – आवाज उठाना चाहिए …”

रामदास आठवले:
“मी नक्की खाणार शेंगाsss…
“मी नक्की खाणार शेंगाsss…
कॉँग्रेस-राष्ट्रवादीला देणार ठेंगा…
और किसीने टरफलं नहीं उचल्या…
और किसीने टरफलं नहीं उचल्या…
तो विनाकारण करुंगा मैं दंगा .”

साध्वी प्राची:
“हर हिंदु ने चार चार गोनी शेंग खानी ही चाहिए और जिसको नहीं खानी वो पाकिस्तान चला जाये”

अरविंद केजरीवाल:
“सुनो भई….
ये शेंग खाने का सवाल नहीं है …
ये आम आदमी के हक़ का सवाल है ..
और कोई अगर आपको दिल्ली में शेंग खाने के लिए मना करे तो हमारे helpline पर फोन करो…
और इस काम में अण्णाजी भी हमारे साथ है”

निखिल वागळे:
“भाई जगताप तुम्ही शांत रहा….
मी शेंगा खायच्या की नाही याबाबत प्रेक्षकांची मतं मागवणार आहे आणि टरफलांचा विषय आपण ब्रेक नंतर घेऊ…
पाहत रहा point blank”

प्रसन्न जोशी:
“एकूणच काय…
तर शेंग खाण्यापासून सुरु झालेला हा विषय गंभीर वळणावर येऊन पोचलाय, बघुया सरकार काय करतय …
तुर्तास येथेच थांबूया,
तुम्ही बघत राहा
ABP माझा..!”

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-1776-Amravati-Ridhpur-Krishna-Temple

महानुभवांची काशी – रिध्दपूर

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथे श्री गोविंदप्रभु यांची समाधी ...
p-3099-Akola-Balapur-Baladevi

अकोल्याच्या बाळापूरची ग्रामदेवता श्री बाळादेवी

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुरातन आणि ऐतिहासिक ...
p-1772-balapur-fort-featured

औरंगजेबाचे सैन्य स्थळ : बाळापूर

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील हे एक ऐतिहासिक पुरातन शहर आहे. मन ...
p-2778-Konkan-Laterite

कोकणचा गाभा असलेली जांभी मृदा (लॅटेराईट)

सतत ओला व कोरडा ॠतू आलटून पालटून असणा-या व २००० ...
Guest Author यांच्याविषयी... 124 लेख
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*