नवीन लेखन...

उगाच काहीतरी -३ (बिस्किट्स नॉस्टॅल्जिया)

हल्लीच दुकानात बिस्किटांचे विविध प्रकार पाहत होतो. किती प्रकार, किती रंग, किती फ्लेवर्स काय नि काय. अचानकपणे आमचे दिवस आठवले.
त्यावेळेस ही बिस्किटांचे बरेच प्रकार असावेत पण आमच्या माहितीत हेच मुख्य होते.

१. जर कधीतरी तुमच्या पालकांनी आणले किंवा जर तुम्ही लहान मुले असलेल्या ओळखीच्यांकडे जात असाल तर पार्ले ग्लुको चे पाकीट सोबत नेले जायचे ( पार्ले G हे त्याचे नवीन नामकरण आहे )

२. जर तुम्ही कोण पेशंटला बघायला दवाखान्यात अथवा त्याच्या घरी जात असाल तर ब्रिटानिया चे मारी बिस्कीट चे पाकीट नेले जायचे. आजारपणाचा आणि मारी बिस्किटांचा काय एवढा संबंध होता काही कळत नाही.

३. कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी जर त्यांच्या सबॉर्डिनेट् च्या घरी जर गेले तर ब्रिटानिया चे नाईस किंवा पार्ले मोनॅको चे पॅकेट घेऊन जायचे. ( मला स्वतःला मोनॅको च्या पाकिटावरील टॉपिंग्ज च्या रेसिपी पाहून खूप खाव्याश्या वाटायच्या. पण त्यांच्यावरची एक कोथिंबीर सोडली तर इतर काय पदार्थ ठेवलेत काही कळायचं नाही. आता कळतय की ते चीझ, चेरी वगैरे असायचं, असो.) कधीतरी क्रॅक जॅक चा पुडा मिळायचा. त्यात अख्खे बिस्किट्स कमी आणि चुरा जास्त निघायचा.

४. बॉरबॉन बिस्किट्स हे नॉन परवडेबल वाटायचे म्हणून आमच्या पहोंच के बाहर होते पण इतर त्याव्यतिरिक्त इतर कुठलेही क्रीमचे आणि जामचा ठिपका ठेवलेले बिस्किट्स तुमच्यावर खूपच जास्त प्रेम करणारे लोक जसे , आजी आजोबा, हे आणायचे.

५, लहानपणी गावाला जाताना एस टी बस हायवे वर ज्या त्यांच्या ठराविक हॉटेलांवर थांबायची तिथे कधीच पार्ले अथवा ब्रिटानिया मिळायचे नाहीत पण तिथे साठे बिस्किट्स मिळायचे जे एवढे गोड़ असायचे की माझ्या पिढीच्या काही लोकांच्या डायबिटीस चे मूळ ते बिस्किट्स असू शकतील.

६. कुकीजचे बॉक्स हा प्रकार दिवाळी भेट म्हणूनच घरात यायचा. ते आम्ही एवढे पुरवून खायचो की दिवाळी फराळापेक्षाही ते जास्त चालायचे. आणि त्याचा तो सजावटी बॉक्स पुढच्या दिवाळी पर्यंत घरात रहायचा. जास्त करून शिवण कामाचं साहित्यच त्यात ठेवलं जायचं. अजूनही तसा डबा कुठे दिसला तर त्यात बिस्किट्स नसून सुई , दोऱ्यांची रीळ, बटणं, असेच काही सामान असेल असं वाटतं.

७. आणि मग ते होतेच १० पैसे, चार आणे, आठ आणे वाले षट्कोनी आकाराचे जीरा बिस्कीट किंवा मग ते रंगीत क्रीम चा ठिपका असलेले गोल
बिस्किटं.

बस्स्स!! इथेच आमचं बिस्किटांचं जनरल नॉलेज संपायचं. अजूनही बिस्किट्स घ्यायचे झाले तर एवढ्या सगळ्या ऑप्शन्स मधून हेच निवडले जातात आणि आता मुलगी पण हेच प्रेफर करते ( अपवाद ओरियो) . सो द पारंपरिक बिस्कीट स्टोरी कंटिन्युज.

–अमोल पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..