दक्षिणेचे सुपरस्टार कमल हासन

दक्षिणेचे सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेले कमल हासन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५४ रोजी परमकुडी, चेन्नई येथे झाला.

१९५९ मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी कलतूर कन्नम्मा या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. १९७५ साली ‘अपूर्व रागंगल’ हा त्यांचा पहिला लीड हीरो असलेला सिनेमा होता. यामध्ये त्यांनी त्यांच्या वयापेक्षा मोठ्या स्त्रीच्या प्रियकराची भूमिका वठवली होती.

बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते. हा सिनेमा यशस्वी ठरला होता. त्यानंतर त्यांनी ‘सागर’, ‘गिरफ्तार’, ‘जरा सी जिंदगी’, ‘राज तिलक’, ‘एक नई पहेली’, ‘देखा प्यार तुम्हारा’, ‘चाची ४२०’, ‘हे राम’, ‘विश्वरूपम्’ यांसह ब-याच हिंदी सिनेमांत अभिनय केला होता. त्यांनी अभिनय केलेले मूंद्रम पिरै (इ.स. १९८२), नायगन(इ.स. १९८७), हे राम (इ.स. २०००), विरुमांदी (इ.स. २००४), दशावतारम्‌ (इ.स. २००८) हे चित्रपट विशेष गाजले. कमल हासनच्या अनेक चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्या निघाल्या आहेत. काही चित्रपट तर मूळ हिंदीमध्येच काढलेले आहेत. कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

कमल हासन यांनी १९७८ साली वाणी गणपतीसोबत पहिले लग्न केले होते. दहा वर्षे हे लग्न टिकले आणि १९८८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अभिनेत्री सारिकाची त्यांच्या आयुष्यात एन्ट्री झाली. कमल आणि सारिका यांनी १९८८ मध्ये लग्न केले.

त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. २०१४ मध्ये कमल हासन यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मानित केले.

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2129 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड

अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ ...

विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर ...

जलग्राम : जळगाव

मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर ...

Loading…