पाणबुडी ( submarine ) म्युझियम – भारतीय नौदलाचे गौरवस्थान

भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र राज्यातील विशाखापटटम ( वैझ्याग ) हे पुरातन काळापासूनचे महत्वाचे बंदर. ब्रिटीश राज्यकर्त्यानी मोठी गोदी बांधून समुद्र व्यापार मार्गाचे महत्वाचे ठिकाण तयार केले. आज भारतीय नौदलात त्याचे अनन्य साधारण महत्व असून सबमरीन्सचा महत्वाचा बेस येथे आहे.

शाळेतील विज्ञानाच्या पेपर मध्ये पाणबुडी, पेरीस्कोप यावर हमखास प्रश्न असत. दुसरे महायुद्ध,भारत पाक युद्धातील पाकिस्तानी गाझी सबमरीन यावर अनेक युद्धपट पाहिलेले असल्याने या विषयी खूप उत्सुकता व आवड, त्यामुळे नौदलाच्या ह्या गौरवस्थानाला भेट देण्याचा पक्का निश्चय केला होता. या उमेदीने विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीच वरील सबमरीन म्युझियम पाहून डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्येक भारतीय नागरीकाने त्याला भेट देऊन मानाचा मुजरा दिलाच पाहिजे अशी ही विशेष जागा आहे. आशिया खंडातील अशा तऱ्हेचे हे एकमेव म्युझियम आहे.

INS KURSURA ही रशियात बांधलेली FOXTROT CLASS SUBMARINE भारतीय नौदलात १९६९ सालात सामील झाली व त्यानंतर २००१ सालापर्यंत भारतीय किनाऱ्याच्या सौरक्षण मोहिमेत व पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात महत्वाची कामगिरी बजावली होती. २००१ सालात ती नौदलामधून नियमाप्रमाणे निवृत्त झाली. त्या नंतर अनेक चर्चा ,राजकारण यातील निष्कर्षातून तीचे म्युझियम करण्याचा निर्णय घेण्यात आला.चक्रे वेगात फिरू लागली.खोल समुद्रातून तिला काठावर वाळूत भक्कमपणे उभी ठेवणे,वादळ, सुनामीच्या लाटा, भूकंप यात ती व्यवस्थित राहील याची काळजी घेण्याचे महाकाय शिव धनुष्य यशस्वीत्या नाविक दलाने पेलले.

प्रथम पाणबुडीच्या मुख्य सांगाड्याला ( hull ) eye bolts ( rings ) वेल्डिंग करून जोडल्या गेल्या.त्याला अतिशय जड मजबूत वायर्स जोडून Heavy hydrolic winch ने किनाऱ्यावरील ओल्या वाळूत खेचत आणली गेली.ओल्या वाळूतून खेचणे म्हणजे महा दिव्य काम होते. नंतर अनेक पद्धतीचे टेकू दिले गेले. अनेक वर्षे पाण्यात राहिल्याने मुख्य सांगाडा गंजला होता.त्याला काळ्या स्पेशल रंगाचे ३ कोट द्यावे लागले. ती पाहण्याकरता वयस्कर माणसे , लहान मुले वर चढून आत उतरणार ,त्य करता भक्कम पायऱ्या असणारा जिना करावा लागला. आतमध्ये संपूर्ण वातानुकुलीत वातावरण ठेवण्याची व्यवस्था, व आत भरपूर विजेचे दिवे लावले गेले .

हा संपूर्ण प्रकल्प पुरा करण्यासाठी अनेक नौदल अधिकारी दिवस रात्र जीवावर उदार होऊन काम करीत होते. या कामावर नेतृत्व करणारे होते पुण्याचे आनंद सरदेसाई ज्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाल्याने आम्हाला आखो देखा हाल जाणून घेता आला हा सुवर्ण योगच म्हणायचा.

याचे उद्घाटन ९ ऑगस्ट २००२ साली झाले. हा प्रकल्प उभारण्यास अंदाजे ६५०० कोटी रुपये खर्च आला. गेल्या १७ वर्षात लाखो पर्यटकानी उदंड प्रतिसाद दिला आहे.

अशी ही सबमरीन आहे तरी कशी याचा खालील तक्ता वाचाल तर छाती दडपून जाईल. नौदलाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

तर असे आहेत बोलके आकडे.-

लांबी ९१.३ मीटर
उंची ११.९ मीटर
व्यास ८ मीटर
तीन भव्य आकाराचे पंखे
पाण्याच्या पृष्ठभागावर असतानाचे वजन १९४५ टन
पाण्याखाली असतानाचे वजन २४६९ टन
७ विभागात संपूर्ण पाणबुडीची आखणी.
एका विभागातून दुसऱ्या भागात जाताना पावले जपून टाकावी लागतात.
संपूर्ण air conditioning system,भरपूर विजेचे दिवे
Number of batteries 448
Weight of each battery 652 kg.
पेरीस्कोप म्हणजे सबमरीनचा मुख्य डोळाच म्हणायचा . त्याची उंची ९ मीटर
Main armament torpedoes number22
समुद्रात २८० मीटर खोल जाऊन प्रवास करू शकते.
Diesel engines 3 capacity of each 2000 HP
साठवलेले इंधन ४३९ टन
साठवलेले पिण्याचे पाणी ३६ टन
High pressure air bottles 54
Presssure in each bottle 200kg/cm square
नांगराची खोली ६० मीटर
नांगराच्या साखळीची लांबी १७६ मीटर
समुद्राच्या पृष्ठभागावरून जातानाचा वेग १६.६ नॉटसं
खोल जातानाचा वेग ९ नॉटसं
एकूण नौसैनिक संख्या ७२
Number of ballast tanks 10

ही पाणबुडी खोल समुद्रात सलग ४८ तास समुद्राच्या वर न येता आपल्या कामगिरीवर जात असे आणि एकदा बंदर सोडले की सलग दोन महिने समुद्रातच भ्रमण करावे लागे.अशा प्रवासात मुख्य कमतरता शुद्ध पिण्याच्या पाण्याची असते. हे पाणी पिण्याकरता,स्वयंपाकघरात, आणि फक्त तोंड धुण्यासाठी वापरतात, २ महिने अंघोळ विसरावी लागते,७० ते ७५ सैनिकाना फक्त दोन टॉयलेटस प्रत्येकाला ४ तासाच्या कामाच्या दोन पाळ्या, सूर्यप्रकाश विसरून जायचे. ही सर्व माहिती नाविक दलाचे सेवानिवृत्त अधिकारी देत होते. माहितीचा सतत ओघ,निरनिराळी मशीन्स,झोपण्यासाठी बंक बेड्स, ८० लोकांचा नाष्टा व दोन वेळचे जेवण करण्यासाठी छोटेसे किचन.

( galley ) ,अन्नधान्याचे कोठार .small operation थीयेटर where emergency operations like appendix, abscess drainage can be performed .या सर्व जागांवर काम करणाऱ्यांचे उत्तम पुतळे करून ठेवल्याने पहाणाऱ्यांना चांगली कल्पना येते. एका जागी मुख्य शस्त्र torpedo रचलेले. अशा अनेक गोष्टी ९१ मीटर लांबीच्या सबमरीनच्या ७ विभागात ज्या पद्धतीने ठेवलेल्या आहेत, तो आराखडा पाहून आपण थक्कच होतो.एका विभागातून दुसऱ्या विभागात जाण्यास चिंचोळा मार्ग असूनही आतील आखणी कशी केली असेल? अशा जागेत २ महिने सतत वावरायचे सर्वच अचंबित करणारे आहे.जवळ जवळ ४० मिनिटे कानावर सतत माहिती पुरवली जात होती .सर्व दालने एकसे एक सरस. आपले डोके आणि पाय सांभाळत आमचा सबमरीन प्रवास कधी संपला ते कळलेच नाही. बाहेरच्या जगाशी संबंध पूर्णपणे तुटला होता. आम्ही जणु खोल समुद्रातून प्रवास करत आहोत असे वाटत होते.

आता तर आपल्या नाविक दलात याहून प्रगत असलेल्या अनेक सबमरीनचा काफिला आपल्या किनाऱ्याच्या बाजूनी व अनेक देशांच्या बंदराची अचूक माहिती गोळा करीत असतात.With the help of periscope, video cameras, and other ultra modern equipments the detail mapping is done of our enemy ports and other important installations.This information is very useful at the time of war situations or other calamities.They have special commando force which can reach near enemy installations through deep sea and destroy them with special missiles and bombs.

बाहेरच्या बाजूस उत्तम माहिती फलक लावलेले आहेत. प्रवेश फी माफक. बघण्यासाठी शेकडो शाळातील मुले व मुलींच्या रांगा पाहून मनाला अतिशय आनंद वाटला.पुढच्या पिढीने सुध्या खरोखर हे नाविक दलाचे गौरव स्थान आवर्जून पाहावे.

या म्युझियमच्या बरोबर समोरील रस्त्यावर नाविक दलाच्या विमानावरील अतिशय उत्तम म्युझियम असून तेथे भले मोठे विमान उभे केलेले असून त्या बद्दलची माहिती अनेक models मार्फत एक निष्णात अधिकारी देतात व पुढे आपण जिन्यावरून विमानात शिरतो आणी तेथील अनुभव तर वर्णनातीत आहे.

नाविक दलाला त्रिवार वंदन करीत आपली पावले डोळ्याचे पारणे फिटविणाऱ्या रामकृष्ण बीचकडे वळतात.

— डॉ अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 44 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड

अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ ...

विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर ...

जलग्राम : जळगाव

मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर ...

Loading…